तीनशे आरोग्यसेविकांना भाऊबीज भेटीतून वगळले; कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा मुंबई : कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या 300 आरोग्यसेविकांना भाऊबीज भेटीमधून वगळण्यात आले. इतकेच नाही तर इतर आरोग्यसेविकांनाही 4400 रुपये भाऊबीज देऊन बोळवण केल्याचे सांगत आरोग्यसेविकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नाराज कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला महापालिका क्षेत्रात सुमारे चार हजार आरोग्यसेविका काम करतात. कोरोनाकाळात आरोग्यसेविकांनी कोरोनाविरोधातील लढ्यात चांगली कामगिरी केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत आरोग्यसेविकांमुळे मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवता आल्याचे म्हणाले. आरोग्यसेविका हा घटक महत्त्वाचा असून, तुटपुंजी भाऊबीज घोषित केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय 300 आरोग्यसेविकांना भाऊबीज रकमेच्या लाभातून वगळल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.    आरोग्यसेविकांना भाऊबीज रकमेतून वगळण्यात येणार नसून वगळलेल्या 300 आरोग्यसेविकांना भाऊबीज भेट देण्याबाबत घोषणा करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले होते; मात्र अद्याप तशी कोणतीही घोषणा केली नाही. किमान 15 हजार बोनस आरोग्यसेविकांना मिळणे क्रमप्राप्त होते. असे असताना त्यांची 4400 रुपयांवर बोळवण केली आहे. त्यातील 300 जणांना वगळण्यात आल्याने प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतापलेल्या आरोग्यसेविका कोणताही निर्णय घेऊ शकतात.  - ऍड. प्रकाश देवदास, अध्यक्ष,  महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना    ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

तीनशे आरोग्यसेविकांना भाऊबीज भेटीतून वगळले; कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा मुंबई : कोरोनाकाळात जीवाची पर्वा न करता सेवा देणाऱ्या 300 आरोग्यसेविकांना भाऊबीज भेटीमधून वगळण्यात आले. इतकेच नाही तर इतर आरोग्यसेविकांनाही 4400 रुपये भाऊबीज देऊन बोळवण केल्याचे सांगत आरोग्यसेविकांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे नाराज कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.  हेही वाचा - 'सत्ताधाऱ्यांनाच सतावतीये सरकार पडण्याची भीती'; प्रवीण दरेकर यांचा टोला महापालिका क्षेत्रात सुमारे चार हजार आरोग्यसेविका काम करतात. कोरोनाकाळात आरोग्यसेविकांनी कोरोनाविरोधातील लढ्यात चांगली कामगिरी केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत आरोग्यसेविकांमुळे मुंबईतील कोरोनावर नियंत्रण मिळवता आल्याचे म्हणाले. आरोग्यसेविका हा घटक महत्त्वाचा असून, तुटपुंजी भाऊबीज घोषित केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शिवाय 300 आरोग्यसेविकांना भाऊबीज रकमेच्या लाभातून वगळल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.    आरोग्यसेविकांना भाऊबीज रकमेतून वगळण्यात येणार नसून वगळलेल्या 300 आरोग्यसेविकांना भाऊबीज भेट देण्याबाबत घोषणा करण्यात येईल, असे महापौरांनी सांगितले होते; मात्र अद्याप तशी कोणतीही घोषणा केली नाही. किमान 15 हजार बोनस आरोग्यसेविकांना मिळणे क्रमप्राप्त होते. असे असताना त्यांची 4400 रुपयांवर बोळवण केली आहे. त्यातील 300 जणांना वगळण्यात आल्याने प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे संतापलेल्या आरोग्यसेविका कोणताही निर्णय घेऊ शकतात.  - ऍड. प्रकाश देवदास, अध्यक्ष,  महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना    ------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे )  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3kzchZB

No comments:

Post a Comment