राज्यात थंडीची हुडहुडी ओसरली  पुणे - राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. रविवारी मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तसेच मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा किंचित वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सध्या राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले असून, रविवारी सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद वाशीम येथे 16 अंश सेल्सिअसइतकी झाली.   वाचा :  पैशांसाठी टॉर्चर केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या  बंगालच्या उपसागरात व तमिळनाडूमध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे याचा परिणाम राज्यावर होत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये किमान तापमानात वाढ होत असून, थंडीचा कडाका कमी झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ व कोकण गोव्यात किमान तापमान सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने वाढले. तसेच मराठवाड्यात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत सुमारे 3 अंश सेल्सिअसने वाढल्याचे भारतीय हवामान खात्याने नमूद केले.   वाचा : कोयते उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक दरम्यान, पुणे शहर व परिसरातील किमान तापमानातही वाढ होत असून, शिवाजीनगर येथील वेधशाळेत शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात 17.4 अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे 18.6 अंश सेल्सिअसइतके किमान तापमान नोंदले गेले. तसेच पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहणार असून, त्यानंतर मात्र अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने दिला. त्याचबरोबर किमान तापमानातही हलके चढ-उतार येण्याची शक्‍यता आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

राज्यात थंडीची हुडहुडी ओसरली  पुणे - राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. रविवारी मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तसेच मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा किंचित वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सध्या राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले असून, रविवारी सर्वाधिक कमी किमान तापमानाची नोंद वाशीम येथे 16 अंश सेल्सिअसइतकी झाली.   वाचा :  पैशांसाठी टॉर्चर केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या  बंगालच्या उपसागरात व तमिळनाडूमध्ये असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे याचा परिणाम राज्यावर होत आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये किमान तापमानात वाढ होत असून, थंडीचा कडाका कमी झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्र, विदर्भ व कोकण गोव्यात किमान तापमान सरासरीपेक्षा 1.6 ते 3 अंश सेल्सिअसने वाढले. तसेच मराठवाड्यात 3 ते 5 अंश सेल्सिअसने वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीच्या तुलनेत सुमारे 3 अंश सेल्सिअसने वाढल्याचे भारतीय हवामान खात्याने नमूद केले.   वाचा : कोयते उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक दरम्यान, पुणे शहर व परिसरातील किमान तापमानातही वाढ होत असून, शिवाजीनगर येथील वेधशाळेत शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात 17.4 अंश सेल्सिअस, तर लोहगाव येथे 18.6 अंश सेल्सिअसइतके किमान तापमान नोंदले गेले. तसेच पुढील दोन दिवस शहरातील हवामान कोरडे राहणार असून, त्यानंतर मात्र अंशतः ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान खात्याने दिला. त्याचबरोबर किमान तापमानातही हलके चढ-उतार येण्याची शक्‍यता आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2UrFFX8

No comments:

Post a Comment