'यो यो रॅप सॉंग' ;चांदूररेल्वेचा तेजस जपतोय शिक्षणासोबत रॅपिंगचा छंद चांदूररेल्वे (जि.अमरावती)  ः प्रत्येकाला आयुष्यात कुठला तरी छंद असतो आणि तो असायला ही हवा, असाच एक छंद जोपासत चांदूररेल्वे शहरातील तेजस इमले या युवकाला रॅप सॉंग तयार करण्याचा छंद लागला. त्याच छंदातून त्याला आपले करिअर बनवायचे असल्याचे तो सांगत आहे. आजपर्यंत त्याने सहा ते सात रॅप सॉंग बनवून ते यू- ट्यूबवर टाकले आहे. विशेष म्हणजे त्याचे यू-ट्यूबवरील सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत आहेत. हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण' ना कुठला संगीत क्‍लास न घरात कोणी गायक, तरीही तेजस इमले याने यो यो हनी सिंग या गायकाला प्रेरित होत रॅप सॉंग स्वतःच लिहून ते शूट करण्याची कला अवगत केली आहे. पीपल्स कला मंच या सांस्कृतिक चळवळीत नाट्य व नृत्याचे धडे घेताना तेजस हा गायनाकडे आकर्षित झाल्याचे तो सांगतो.  त्यात रॅप सॉंगने त्याला जास्तच आकर्षित केले. सहा वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर गीत लिहून तो त्याला म्यूझिक आणि त्याचे व्हिडिओ शूट करून गाणे तयार करतो. तसं पाहिलं तर त्याचा हा छंद जरा महागडाच आणि तेजसची घरची परिस्थिती मोजकीच. तेजस स्वतः बलून डेकोरेशनचे काम करतो, तर वडील नगरपरिषदेत सफाई कामगार. त्यामुळे कधी कधी वडिलांसोबत तोही झाडू मारायला जातो आणि मिळालेल्या पैशातून आपला छंद जोपासतो.  एक गाणं बनवायला 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. पण कधीतरी आपलं एखादं गाण यू-ट्यूबवर हिट होईल आणि आपल्या करिअरची सुरुवात होईल, या अपेक्षेने आतापर्यंत विविध विषय घेऊन तेजस गीत लिहित आहे व कम्पोज करीत आहे.  अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा! त्याच्या गीताचे विषयही सामाजिकच असल्याचे दिसून येते. त्याला त्याच्या या छंदात पीपल्स कला मंचचे नेहमीच सहकार्य मिळते. शिवाय गावातील अनेक मित्रमंडळी त्याच्या या कार्याला मदत करीत असल्याचे तेजसने सांगितले. संपादन - अथर्व महांकाळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 11, 2020

 'यो यो रॅप सॉंग' ;चांदूररेल्वेचा तेजस जपतोय शिक्षणासोबत रॅपिंगचा छंद चांदूररेल्वे (जि.अमरावती)  ः प्रत्येकाला आयुष्यात कुठला तरी छंद असतो आणि तो असायला ही हवा, असाच एक छंद जोपासत चांदूररेल्वे शहरातील तेजस इमले या युवकाला रॅप सॉंग तयार करण्याचा छंद लागला. त्याच छंदातून त्याला आपले करिअर बनवायचे असल्याचे तो सांगत आहे. आजपर्यंत त्याने सहा ते सात रॅप सॉंग बनवून ते यू- ट्यूबवर टाकले आहे. विशेष म्हणजे त्याचे यू-ट्यूबवरील सबस्क्रायबर दिवसेंदिवस वाढत आहेत. हेही वाचा - मोबाईलवर पत्ता शोधताना झाला मित्राचा अपघात आणि दोन तरुणांनी थेट बनवले 'परिभ्रमण' ना कुठला संगीत क्‍लास न घरात कोणी गायक, तरीही तेजस इमले याने यो यो हनी सिंग या गायकाला प्रेरित होत रॅप सॉंग स्वतःच लिहून ते शूट करण्याची कला अवगत केली आहे. पीपल्स कला मंच या सांस्कृतिक चळवळीत नाट्य व नृत्याचे धडे घेताना तेजस हा गायनाकडे आकर्षित झाल्याचे तो सांगतो.  त्यात रॅप सॉंगने त्याला जास्तच आकर्षित केले. सहा वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांवर गीत लिहून तो त्याला म्यूझिक आणि त्याचे व्हिडिओ शूट करून गाणे तयार करतो. तसं पाहिलं तर त्याचा हा छंद जरा महागडाच आणि तेजसची घरची परिस्थिती मोजकीच. तेजस स्वतः बलून डेकोरेशनचे काम करतो, तर वडील नगरपरिषदेत सफाई कामगार. त्यामुळे कधी कधी वडिलांसोबत तोही झाडू मारायला जातो आणि मिळालेल्या पैशातून आपला छंद जोपासतो.  एक गाणं बनवायला 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. पण कधीतरी आपलं एखादं गाण यू-ट्यूबवर हिट होईल आणि आपल्या करिअरची सुरुवात होईल, या अपेक्षेने आतापर्यंत विविध विषय घेऊन तेजस गीत लिहित आहे व कम्पोज करीत आहे.  अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा! त्याच्या गीताचे विषयही सामाजिकच असल्याचे दिसून येते. त्याला त्याच्या या छंदात पीपल्स कला मंचचे नेहमीच सहकार्य मिळते. शिवाय गावातील अनेक मित्रमंडळी त्याच्या या कार्याला मदत करीत असल्याचे तेजसने सांगितले. संपादन - अथर्व महांकाळ News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35mNBiF

No comments:

Post a Comment