थेट सरपंच निवड रद्दने पेडमध्ये इच्छुकांच्या आशेवर पाणी पेड : राज्य सरकारने जनतेतून थेट सरपंच निवड रद्द केल्याने पेड (ता. तासगाव) येथील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे.  पेड ग्रामपंचायतीची मुदत ही नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती ची निवडणूक ही शक्‍यतो डिसेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. फडणवीस सरकारने मागील तीन-चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा कायदा केल्याने अनेक इच्छुक आणि गेल्या एक ते दीड वर्षापासून जोरदार तयारी करत थेट जनतेतुन सरपंच होण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र नुकताच ठाकरे सरकारने जनतेतून सरपंच निवड रद्द करीत ती सदस्यातुन निवड करण्याची घोषणा नुकतीच केला आहे.  पेड ग्रामपंचायतीसाठी एकूण पाच प्रभाग असून त्यामधून 13 सदस्यांची निवड केली जाणार आहे. जवळपास पाच हजाराच्या आसपास मतदार आहेत तसेच यावर्षी पाच प्रभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.  विद्यमान सदस्यांबद्दल नाराजी  पेड ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य असून यातील काही सदस्यांनी आपल्या गटाच्या नेत्यांना न जुमानता सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सदस्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विकासासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन नेमका कोणता विकास केला हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. याचा मोठा फटका विद्यमान सदस्यांना बसण्याची शक्‍यता आहे.     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, November 10, 2020

थेट सरपंच निवड रद्दने पेडमध्ये इच्छुकांच्या आशेवर पाणी पेड : राज्य सरकारने जनतेतून थेट सरपंच निवड रद्द केल्याने पेड (ता. तासगाव) येथील इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा मोठा हिरमोड झाला आहे.  पेड ग्रामपंचायतीची मुदत ही नोव्हेंबर महिन्यात संपत आहे. त्यामुळे या ग्रामपंचायती ची निवडणूक ही शक्‍यतो डिसेंबर महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. फडणवीस सरकारने मागील तीन-चार वर्षांपूर्वी थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा कायदा केल्याने अनेक इच्छुक आणि गेल्या एक ते दीड वर्षापासून जोरदार तयारी करत थेट जनतेतुन सरपंच होण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. मात्र नुकताच ठाकरे सरकारने जनतेतून सरपंच निवड रद्द करीत ती सदस्यातुन निवड करण्याची घोषणा नुकतीच केला आहे.  पेड ग्रामपंचायतीसाठी एकूण पाच प्रभाग असून त्यामधून 13 सदस्यांची निवड केली जाणार आहे. जवळपास पाच हजाराच्या आसपास मतदार आहेत तसेच यावर्षी पाच प्रभागात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना मोठी कसरत करावी लागणार आहे.  विद्यमान सदस्यांबद्दल नाराजी  पेड ग्रामपंचायतीमध्ये 13 सदस्य असून यातील काही सदस्यांनी आपल्या गटाच्या नेत्यांना न जुमानता सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सदस्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून विकासासाठी एकत्र आले आहेत. त्यांनी एकत्र येऊन नेमका कोणता विकास केला हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. याचा मोठा फटका विद्यमान सदस्यांना बसण्याची शक्‍यता आहे.     संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35hcsnS

No comments:

Post a Comment