हायवे कामात निष्काळजीपणा नको ः राऊत कुडाळ (सिंधुदुर्ग) - येथील हायवे रस्ता कामाची डेडलाईन 12 नोव्हेंबर आहे. काही प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्‍न आहेत ते तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. यापुढे कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असे सक्त आदेश ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिले. येथील बॉक्‍सवेलबाबत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी दिली.  येथील हायवेचे काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र शहरात राज हॉटेलसमोरील बॉक्‍सवेल तेथील प्रकल्पग्रस्त बबन परब, दीपक कदम, चंदु कदम, कुणाल कोचरेकर यांना त्रासदायक ठरणारा आहे. आज सायंकाळी लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी ठिकाणी पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, अतुल बंगे, विकास कुडाळकर, जयभारत पालव, गजानन कांदळकर, संजय पिंगुळकर, सचिन काळप, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, सुनील भोगटे, काका कुडाळकर, संजय भोगटे, मंदार परुळेकर, प्रकाश जैतापकर, मंदार शिरसाठ, अभय शिरसाट, राजू राऊळ, राजन नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, बांधकामच्या अधिकारी अनामिका जाधव, दिलीप बिल्डकॉनचे के. के. गौतम, श्री. शेख, श्री. मणेर, श्री. महाजन, राकेश म्हडदळकर, मुस्ताक शेख, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, वन विभागाचे राजेंद्र सावंत, शिवसेना पदाधिकारी, उद्योजक, प्रकल्पग्रस्त, अधिकारी उपस्थित होते.  खासदार राऊत म्हणाले, ""राज हॉटेल समोरील बॉक्‍सवेलचा प्रश्‍न याठिकाणी आहे. येथील प्रकल्पग्रस्त बबन कदम, दीपक कदम यांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जाईल, यासाठी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतची पाहणी करण्यात आली. उद्यापासून हॉटेल आर एसएन येथून सार्वजनिक बांधकाम विभाग भूभिअभिलेख जमीन मालक यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होणार आहे. याबाबत मोजणी करताना तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना त्याठिकाणी मांडा; मात्र कोणत्याही बाबतीत जबरदस्ती करू नका. या सर्व समस्यांनंतरच हायवेचे काम अधिक जलद गतीने करण्यात येईल. 12 नोव्हेंबर ही या शहरातील रस्ता कामाची डेडलाईन आहे; मात्र त्याठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांमुळे एक ते दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून दिलीप बिल्डकॉनने काम करावे. ज्या काही समस्या आहेत त्या मार्गी लावाव्यात.''  हद्दपारची भाषा राणेंना शोभत नाही  कोकणातून शिवसेनेचे 11 आमदार हद्दपार करणार, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले होते. याबाबत राऊत म्हणाले, ""नारायण राणे यांना हद्दपार हा शब्द शोभत नाही. ज्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला तो एका वर्षात विसर्जित करण्याची वेळ आली त्यांना हद्दपार करण्याचे काम जनतेने केले आहे. जनतेनी त्यांना निवडणूकीतून हद्दपार करून चांगले उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकट असूनही सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात शंभर कोटीचा निधी देण्यासाठी लवकरच त्यांची भेट घेवू.''  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, November 4, 2020

हायवे कामात निष्काळजीपणा नको ः राऊत कुडाळ (सिंधुदुर्ग) - येथील हायवे रस्ता कामाची डेडलाईन 12 नोव्हेंबर आहे. काही प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्‍न आहेत ते तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. यापुढे कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, असे सक्त आदेश ठेकेदार कंपनी व संबंधित अधिकाऱ्यांना लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी दिले. येथील बॉक्‍सवेलबाबत प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी दिली.  येथील हायवेचे काम अंतिम टप्प्यात आहे; मात्र शहरात राज हॉटेलसमोरील बॉक्‍सवेल तेथील प्रकल्पग्रस्त बबन परब, दीपक कदम, चंदु कदम, कुणाल कोचरेकर यांना त्रासदायक ठरणारा आहे. आज सायंकाळी लोकसभा शिवसेना गटनेते खासदार विनायक राऊत यांनी ठिकाणी पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली, शिवसेना जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब, संजय पडते, अतुल बंगे, विकास कुडाळकर, जयभारत पालव, गजानन कांदळकर, संजय पिंगुळकर, सचिन काळप, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद बांदिवडेकर, सुनील भोगटे, काका कुडाळकर, संजय भोगटे, मंदार परुळेकर, प्रकाश जैतापकर, मंदार शिरसाठ, अभय शिरसाट, राजू राऊळ, राजन नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, बांधकामच्या अधिकारी अनामिका जाधव, दिलीप बिल्डकॉनचे के. के. गौतम, श्री. शेख, श्री. मणेर, श्री. महाजन, राकेश म्हडदळकर, मुस्ताक शेख, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, वन विभागाचे राजेंद्र सावंत, शिवसेना पदाधिकारी, उद्योजक, प्रकल्पग्रस्त, अधिकारी उपस्थित होते.  खासदार राऊत म्हणाले, ""राज हॉटेल समोरील बॉक्‍सवेलचा प्रश्‍न याठिकाणी आहे. येथील प्रकल्पग्रस्त बबन कदम, दीपक कदम यांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला जाईल, यासाठी अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतची पाहणी करण्यात आली. उद्यापासून हॉटेल आर एसएन येथून सार्वजनिक बांधकाम विभाग भूभिअभिलेख जमीन मालक यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होणार आहे. याबाबत मोजणी करताना तुमच्या काही सूचना असतील त्या सूचना त्याठिकाणी मांडा; मात्र कोणत्याही बाबतीत जबरदस्ती करू नका. या सर्व समस्यांनंतरच हायवेचे काम अधिक जलद गतीने करण्यात येईल. 12 नोव्हेंबर ही या शहरातील रस्ता कामाची डेडलाईन आहे; मात्र त्याठिकाणी निर्माण झालेल्या समस्यांमुळे एक ते दोन महिन्यात हे काम पूर्ण झाले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून दिलीप बिल्डकॉनने काम करावे. ज्या काही समस्या आहेत त्या मार्गी लावाव्यात.''  हद्दपारची भाषा राणेंना शोभत नाही  कोकणातून शिवसेनेचे 11 आमदार हद्दपार करणार, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले होते. याबाबत राऊत म्हणाले, ""नारायण राणे यांना हद्दपार हा शब्द शोभत नाही. ज्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला तो एका वर्षात विसर्जित करण्याची वेळ आली त्यांना हद्दपार करण्याचे काम जनतेने केले आहे. जनतेनी त्यांना निवडणूकीतून हद्दपार करून चांगले उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकट असूनही सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजला मंजुरी दिली. यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात शंभर कोटीचा निधी देण्यासाठी लवकरच त्यांची भेट घेवू.''  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3etwbUq

No comments:

Post a Comment