तब्बल एक कोटी खर्चून साकारतेय सरकारी शाळा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत या दोघांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून शहरातील खासकीलवाडा येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 चे काम पूर्णत्वास आले आहे. ही शाळा जिल्ह्यातील सर्वांत पहिली एक मजली अद्ययावत अशी प्राथमिक शाळा असून भविष्यात जिल्ह्यासाठी ती रोल मॉडेल ठरणार आहे.  जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व जास्त पटसंख्या असणाऱ्या अनेक शाळा आहेत. अशाच एका दर्जेदार शाळांपैकी शहरातील खासकीलवाडा येथील क्रमांक 4 शाळेचे नाव घेता येईल. या शाळेचे विद्यार्थी शिक्षण तसेच शालेय उपक्रमांमध्ये नेहमी पुढे असल्याने या शाळेचे नाव तालुका आता जिल्हा पातळीवर चमकले आहे. शाळेची इमारत छोटी व जीर्ण झाल्याने हे शाळा नव्याने बांधून मिळावी, अशी मागणी गेली दहा वर्ष शाळा व्यवस्थापन समिती व तेथील नागरिकांकडून होत होती. शाळा नव्याने बांधताना फक्त दोन वर्गखोल्या नको तर पूर्ण इमारत पाडून त्या ठिकाणी अद्यावत शाळा बांधून मिळावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता त्यावेळचे पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी यामध्ये विशेष लक्ष घालताना शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद बांधकाम अभियंता यांना सोबत घेऊन महत्वाचा निर्णय घेत सगळ्यात प्रथम इमारत निर्लेखित करण्याचे काम केले. त्यानंतर या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हापरिषद पातळीवर मंजुरीसाठी पाठवण्यात आला. योगायोगाने त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे रेश्‍मा सावंत यांच्या रूपाने तालुक्‍याकडे होते आणि त्याच्या पलिकडेही योगायोग म्हणजे आमदार केसरकर यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यामुळे या शाळेसाठी बनवण्यात आलेल्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून सावंत यांनी मंजुरी दिली तर पालकमंत्री या नात्याने केसरकर यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जवळपास 99 लाख रुपयांचा निधी या शाळेसाठी मंजूर झाल्यानंतर अपुऱ्या जागेत योग्य प्लॅन करून जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता अमित कल्याणकर यांनी जी प्लस वन असे एक मजली व आठ वर्गखोल्या असलेल्या इमारतीचे काम टेंडर काढत दीड वर्षापूर्वी सुरू केले. आज हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.  जिल्ह्यामध्ये प्रथमत: शासनाच्या प्राथमिक शाळांपैकी अध्यावत असलेली एक मजली ही पहिलीच शाळा ठरणार असून शाळेची रचना लक्षात घेता ही शाळा इमारत पूर्णतः आरसीसी पद्धतीची आहे. आठ वर्गखोल्यांशिवाय शिक्षकांसाठी वेगळी रूम, मुख्याध्यापकांसाठी वेगळी रूम, स्वतंत्र संगणक रूम, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल, मुला मुलींसाठी दोन्ही मजल्यावर टॉयलेट बाथरूमची सोय, वर्ग खोल्यांच्या बाहेर प्रशस्त व्हरांडा तर इमारतीच्या खाली स्ट्रील्ड अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्था आहे. अशा पध्दतीची जिल्ह्यात ही पहिलीच शाळा असून याचे सर्व श्रेय हे आमदार केसरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या सावंत, माजी पंचायत समिती सभापती मडगावकर, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक वर्ग व नागरिक यांना जाते. त्यामुळे या शाळेची असलेली प्रगती अजुन रुंदावत जाण्याबरोबरच भविष्यात जिल्ह्यासाठी एक वेगळा रोल मॉडेल ठरणार आहे.  येत्या नोव्हेंबरपर्यंत शाळेचे काम पूर्ण करून त्याचा ताबा शिक्षण विभागाकडे देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत लाईट फिटिंगचे काम राहिले आहे. जवळपास दीड वर्षांमध्ये शाळेचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये ही पहिलीच अद्यावत प्राथमिक शाळा आहे.  - अमित कल्याणकर, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता  सभापती असताना या शाळेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळा इमारत निर्लेखनापासून त्याचे काम पूर्णत्वास नेण्यापर्यंत पाठपुरावा करण्याची संधी प्राप्त झाली. आज हे काम पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. ज्याप्रमाणे यापूर्वीही या शाळेने विविध शालेय उपक्रमात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला, त्याचप्रमाणे यापुढेही शाळेने यशाचा आलेख उंचावत ठेवावा.  - रवींद्र मडगावकर, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य, पंचायत समिती, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

तब्बल एक कोटी खर्चून साकारतेय सरकारी शाळा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत या दोघांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून शहरातील खासकीलवाडा येथे तब्बल 1 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 4 चे काम पूर्णत्वास आले आहे. ही शाळा जिल्ह्यातील सर्वांत पहिली एक मजली अद्ययावत अशी प्राथमिक शाळा असून भविष्यात जिल्ह्यासाठी ती रोल मॉडेल ठरणार आहे.  जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या व जास्त पटसंख्या असणाऱ्या अनेक शाळा आहेत. अशाच एका दर्जेदार शाळांपैकी शहरातील खासकीलवाडा येथील क्रमांक 4 शाळेचे नाव घेता येईल. या शाळेचे विद्यार्थी शिक्षण तसेच शालेय उपक्रमांमध्ये नेहमी पुढे असल्याने या शाळेचे नाव तालुका आता जिल्हा पातळीवर चमकले आहे. शाळेची इमारत छोटी व जीर्ण झाल्याने हे शाळा नव्याने बांधून मिळावी, अशी मागणी गेली दहा वर्ष शाळा व्यवस्थापन समिती व तेथील नागरिकांकडून होत होती. शाळा नव्याने बांधताना फक्त दोन वर्गखोल्या नको तर पूर्ण इमारत पाडून त्या ठिकाणी अद्यावत शाळा बांधून मिळावी, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता त्यावेळचे पंचायत समिती सभापती रवींद्र मडगावकर यांनी यामध्ये विशेष लक्ष घालताना शाळा व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद बांधकाम अभियंता यांना सोबत घेऊन महत्वाचा निर्णय घेत सगळ्यात प्रथम इमारत निर्लेखित करण्याचे काम केले. त्यानंतर या इमारतीसाठी प्रस्ताव तयार करून तो जिल्हापरिषद पातळीवर मंजुरीसाठी पाठवण्यात आला. योगायोगाने त्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे रेश्‍मा सावंत यांच्या रूपाने तालुक्‍याकडे होते आणि त्याच्या पलिकडेही योगायोग म्हणजे आमदार केसरकर यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. त्यामुळे या शाळेसाठी बनवण्यात आलेल्या नव्या इमारतीच्या प्रस्तावाला जिल्हा परिषद अध्यक्षा म्हणून सावंत यांनी मंजुरी दिली तर पालकमंत्री या नात्याने केसरकर यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला. जवळपास 99 लाख रुपयांचा निधी या शाळेसाठी मंजूर झाल्यानंतर अपुऱ्या जागेत योग्य प्लॅन करून जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता अमित कल्याणकर यांनी जी प्लस वन असे एक मजली व आठ वर्गखोल्या असलेल्या इमारतीचे काम टेंडर काढत दीड वर्षापूर्वी सुरू केले. आज हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.  जिल्ह्यामध्ये प्रथमत: शासनाच्या प्राथमिक शाळांपैकी अध्यावत असलेली एक मजली ही पहिलीच शाळा ठरणार असून शाळेची रचना लक्षात घेता ही शाळा इमारत पूर्णतः आरसीसी पद्धतीची आहे. आठ वर्गखोल्यांशिवाय शिक्षकांसाठी वेगळी रूम, मुख्याध्यापकांसाठी वेगळी रूम, स्वतंत्र संगणक रूम, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल, मुला मुलींसाठी दोन्ही मजल्यावर टॉयलेट बाथरूमची सोय, वर्ग खोल्यांच्या बाहेर प्रशस्त व्हरांडा तर इमारतीच्या खाली स्ट्रील्ड अंडरग्राउंड पार्किंगची व्यवस्था आहे. अशा पध्दतीची जिल्ह्यात ही पहिलीच शाळा असून याचे सर्व श्रेय हे आमदार केसरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या सावंत, माजी पंचायत समिती सभापती मडगावकर, शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक वर्ग व नागरिक यांना जाते. त्यामुळे या शाळेची असलेली प्रगती अजुन रुंदावत जाण्याबरोबरच भविष्यात जिल्ह्यासाठी एक वेगळा रोल मॉडेल ठरणार आहे.  येत्या नोव्हेंबरपर्यंत शाळेचे काम पूर्ण करून त्याचा ताबा शिक्षण विभागाकडे देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत लाईट फिटिंगचे काम राहिले आहे. जवळपास दीड वर्षांमध्ये शाळेचे काम पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यामध्ये ही पहिलीच अद्यावत प्राथमिक शाळा आहे.  - अमित कल्याणकर, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता  सभापती असताना या शाळेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे शाळा इमारत निर्लेखनापासून त्याचे काम पूर्णत्वास नेण्यापर्यंत पाठपुरावा करण्याची संधी प्राप्त झाली. आज हे काम पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. ज्याप्रमाणे यापूर्वीही या शाळेने विविध शालेय उपक्रमात तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला, त्याचप्रमाणे यापुढेही शाळेने यशाचा आलेख उंचावत ठेवावा.  - रवींद्र मडगावकर, माजी सभापती तथा विद्यमान सदस्य, पंचायत समिती, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IBLMFH

No comments:

Post a Comment