राज्यभरात आजपासून क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियान; आठ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी होणार मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान' मंगळवार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख 25 हजार 230 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  'आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी ग्रामीण भागातील 6 कोटी 82 लाख 23 हजार 398 आणि शहरी भागातील 1 कोटी 84 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आणि कुष्ठरोगाचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास त्यांना आरोग्यविषयक अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचसोबत त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरिता 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.  दरम्यान, नुकताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती; तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरिकांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले.  हेही वाचा - APMC बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान, कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा औषधोपचार मोफत!  सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे; तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण औषधोपचार मोफत करणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले Tuberculosis, leprosy research campaign across the state from today More than eight crore citizens will be investigated ----------------------------------------------------------- ( संपादन  - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

राज्यभरात आजपासून क्षय, कुष्ठरुग्ण शोध अभियान; आठ कोटींहून अधिक नागरिकांची तपासणी होणार मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान' मंगळवार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले जाणार आहे. याअंतर्गत राज्यातील सुमारे 8 कोटी 66 लाख 25 हजार 230 लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.  'आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी ग्रामीण भागातील 6 कोटी 82 लाख 23 हजार 398 आणि शहरी भागातील 1 कोटी 84 लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालकमंत्री, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. रोग शास्त्रीय अभ्यासानुसार क्षय आणि कुष्ठरोगाचे रुग्ण निदान व औषधोपचारापासून वंचित राहिल्यास त्यांना आरोग्यविषयक अनेक गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. त्याचसोबत त्यांच्या सहवासातील इतर निरोगी लोकांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांचा शोध आणि त्यांच्यावर उपचार करण्याकरिता 1 डिसेंबरपासून घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे.  दरम्यान, नुकताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मोहिमेसाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समिती; तर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समन्वय समिती नेमण्यात आली आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. घरी येणाऱ्या पथकास तपासणीसाठी सहकार्य करून नागरिकांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले.  हेही वाचा - APMC बाहेर अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान, कोरोनाच्या नियमांचे तीनतेरा औषधोपचार मोफत!  सर्वेक्षण पथकात आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागातील सर्व घरांचे; तर शहरी भागात निवडक भागाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. रोगनिदान झाल्यास संपूर्ण औषधोपचार मोफत करणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले Tuberculosis, leprosy research campaign across the state from today More than eight crore citizens will be investigated ----------------------------------------------------------- ( संपादन  - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3mqL25g

No comments:

Post a Comment