आता आंजिवडे घाटासाठी लढा  माणगाव (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग-कोल्हापूर सर्वांत कमी अंतराने जोडणाऱ्या माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील आंजिवडे-पाटगाव घाट मार्गाला चालना मिळण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार घाट परिषदेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.  माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर हा मेळावा झाला. यावेळी या नव्या मार्गासाठीचा लढा उभारण्याचे नियोजन झाले. यावेळी राजकीय वजन वापरण्या बरोबरच शासनाचे जलद लक्ष वेधुन घेण्यासाठी मोर्चा, रास्तारोको, उपोषण आदी आंदोलनाचे मार्ग अवलंबण्याचे ठरले.  सिंधुदुर्गातून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे सर्व घाट मार्ग आता जीर्ण झालेले आहेत. या घाटातून सऱ्हास ठिकाणी दरडी कोसळत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. त्या घाटांची रूंदी वाढवणे सुद्धा कठीण आहे.  गेली वीस वर्ष आंजिवडे-पाडगांव दरम्यानच्या भैरीची पाणंद घाट मार्गाची मागणी लोक सातत्याने करत आहेत. गत सरकारच्या काळात त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. वनखात्याने या मार्गात येणारी झाडेझुडपे साफ करून ही शिवकालीन पाणंद रिकामी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात केवळ एकच मोठे वळण दिसत असून केवळ तीन-चार ठिकाणी लहान मोऱ्या बांधायला लागतात. आंजिवडे गवळीवाडी ते पायथा असे 1 किलोमीटर अंतर ग्रामपंचायतीला 23 नंबरला नोंद आहे तेथे कच्चा रस्ता तयार झाला असून खड्डीकरणासाठी शासनाने 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे केवळ तीन किलोमीटरचाच घाट मार्ग करणे शिल्लक आहे.  दरम्यान, यावेळी ऍड. किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, बाळ केसरकर, सगुन धुरी, दत्ता शिरसाट, प्रमोद धुरी, सचिन धुरी, आर. के. सावंत, जोसेफ डॉन्ट्‌स, श्रेया परब, प्रभाकर परब, प्रकाश मोरे, श्‍याम पावसकर, विजय पालकर, अजित परब, प्रमोद म्हाडगुत, शंकर कोराणे आदी उपस्थित होते.  संघटीत लढा देण्याबाबत चर्चा  या घाटाने कोल्हापूर सावंतवाडी अंतर 50 किलोमीटरने कमी पडत असल्याने येता जाता 100 किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. या घाट मार्गाने वेळ व इंधन वाचणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने या मागणीला थोडी मरगळ आली होती; मात्र आता लोकांनी या कामी शासनाचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे. तसे पक्षभेद विसरून सर्वांनी संघटीत होऊन लढा देण्याबाबत चर्चा झाली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, November 30, 2020

आता आंजिवडे घाटासाठी लढा  माणगाव (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्ग-कोल्हापूर सर्वांत कमी अंतराने जोडणाऱ्या माणगाव (ता. कुडाळ) खोऱ्यातील आंजिवडे-पाटगाव घाट मार्गाला चालना मिळण्यासाठी आता रस्त्यावरील लढाई लढण्याचा निर्धार घाट परिषदेच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.  माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथील बाळ केसरकर यांच्या फार्म हाऊसवर हा मेळावा झाला. यावेळी या नव्या मार्गासाठीचा लढा उभारण्याचे नियोजन झाले. यावेळी राजकीय वजन वापरण्या बरोबरच शासनाचे जलद लक्ष वेधुन घेण्यासाठी मोर्चा, रास्तारोको, उपोषण आदी आंदोलनाचे मार्ग अवलंबण्याचे ठरले.  सिंधुदुर्गातून कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे सर्व घाट मार्ग आता जीर्ण झालेले आहेत. या घाटातून सऱ्हास ठिकाणी दरडी कोसळत असल्याने ते मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. त्या घाटांची रूंदी वाढवणे सुद्धा कठीण आहे.  गेली वीस वर्ष आंजिवडे-पाडगांव दरम्यानच्या भैरीची पाणंद घाट मार्गाची मागणी लोक सातत्याने करत आहेत. गत सरकारच्या काळात त्याचे सर्वेक्षणही झाले आहे. वनखात्याने या मार्गात येणारी झाडेझुडपे साफ करून ही शिवकालीन पाणंद रिकामी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने केलेल्या सर्वेक्षणात केवळ एकच मोठे वळण दिसत असून केवळ तीन-चार ठिकाणी लहान मोऱ्या बांधायला लागतात. आंजिवडे गवळीवाडी ते पायथा असे 1 किलोमीटर अंतर ग्रामपंचायतीला 23 नंबरला नोंद आहे तेथे कच्चा रस्ता तयार झाला असून खड्डीकरणासाठी शासनाने 10 लाख रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे केवळ तीन किलोमीटरचाच घाट मार्ग करणे शिल्लक आहे.  दरम्यान, यावेळी ऍड. किशोर शिरोडकर, बाळ सावंत, आबा केसरकर, बाळ केसरकर, सगुन धुरी, दत्ता शिरसाट, प्रमोद धुरी, सचिन धुरी, आर. के. सावंत, जोसेफ डॉन्ट्‌स, श्रेया परब, प्रभाकर परब, प्रकाश मोरे, श्‍याम पावसकर, विजय पालकर, अजित परब, प्रमोद म्हाडगुत, शंकर कोराणे आदी उपस्थित होते.  संघटीत लढा देण्याबाबत चर्चा  या घाटाने कोल्हापूर सावंतवाडी अंतर 50 किलोमीटरने कमी पडत असल्याने येता जाता 100 किलोमीटर अंतराची बचत होणार आहे. या घाट मार्गाने वेळ व इंधन वाचणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने या मागणीला थोडी मरगळ आली होती; मात्र आता लोकांनी या कामी शासनाचे लक्ष वेधण्याचे ठरवले आहे. तसे पक्षभेद विसरून सर्वांनी संघटीत होऊन लढा देण्याबाबत चर्चा झाली.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36oRx2X

No comments:

Post a Comment