'अंतिम' परीक्षेसाठी दिल्लीतील अधिकाऱ्याचा पुण्यात तळ; बुधवारी परीक्षा पार पडली सुरळीत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ संपत नसल्याने यासाठी अखेर लंडनमध्ये असलेल्या एजन्सीच्या प्रमुखांशी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. एजन्सीकडून होणाऱ्या चुकांची माहिती देण्यात आलीच, पण यातून तोडगा काढा अशी भूमिका मांडण्यात आली. अखेर परीक्षेचा कारभार दिल्लीतून पाहणाऱ्या अधिकाऱ्यास पुण्यात यावे लागले आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया संपेपर्यंत या अधिकाऱ्याचा तळ पुण्यात असणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी 'सकाळ'ने विद्यार्थ्यांची बाजू सतत मांडली आहे. - Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!​ पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा 12 ऑक्‍टोबरपासून सुरू झाली, पण गेल्या नऊ दिवसांपासून अनेक तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच एजन्सीचे सर्व्हर दोन दिवस क्रॅश झाल्याने टिकेची झोड उठली. त्याचमुळे विद्यापीठाने एजन्सीच्या लंडनमध्ये असलेल्या प्रमुखांशी आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. पुणे विद्यापीठाने परीक्षेत येत असलेल्या अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवत त्यावर त्वरीत तोडगा काढण्याची सूचना केली. यावेळी परीक्षेत येणाऱ्या अडचणींबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये कम्युनीकेशन गॅप असल्याने व्यवस्थित माहितीच मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यावेळी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करत सर्व लहान मोठ्या तक्ररींकडे व्यवस्थित लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन विद्यापीठाला दिले आहे. तसेच विद्यापीठाची परीक्षा आणखी काही दिवस चालणार असल्याने कोणतीही अडचण त्वरीत सुटावी यासाठी दिल्लीतील एक तज्ज्ञ पुणे विद्यापीठात दाखल झाले आहेत. परीक्षा संपेपर्यंत ते इथेच राहणार आहेत. - राज्य सरकारनं माझ्यावर जबाबदारी सोपवावी : संभाजीराजे छत्रपती सर्व्हरमधील जंक फाईल्स क्लिअर बुधवारी पुणे विद्यापीठातर्फे 179 विषयांची परीक्षा तीन सत्रात घेण्यात आली. पण एखाद दुसऱ्या विषयातील अडचणी सोडता इतर विषयांची परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच व्यवस्थित परीक्षा झाली आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर रात्रभर बसून एजन्सीने सर्व्हरमधील जंक फाईल्स काढून टाकल्या. तसेच सर्व्हरवर लोड येऊ नये, म्हणून प्रत्येक सत्रात वेळ वाढून दिला आहे. ठराविक वेळेनुसार विद्यार्थी लॉगइन करतील, अशी व्यवस्था केल्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडली. - चोरीची शिक्षा भोगून बाहेर आले होते; पुन्हा चोरीमुळेच तुरुंगात गेले!​ "ऑनलाइन परीक्षेत येणाऱ्या अडचणींसंदर्भात लंडन येथील एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा केली, त्यांना होणाऱ्या चुका लक्षात आणून दिल्याने त्यांनी त्या सोडविण्यासाठी लगेच पाऊले उचलली. त्यामुळे बुधवारी परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. पुढील परीक्षाही याच पद्धतीने व्हावी यासाठी एजन्सीचे एक अधिकारी पुण्यात आले आहेत. परीक्षा संपेपर्यंत ते इथे व्यवस्थेवर लक्ष ठेऊन असतील.'' - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा विभाग बुधवारच्या परीक्षेतील घडामोडी - 179 विषयांची परीक्षा 1.24 लाख विद्यार्थ्यांनी दिली. - ऑनलाइन 1.6 लाख तर ऑफलाइनसाठी 18 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती - बीबीएच्या मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमऐवजी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर आला. - इंजिनीयरींग बॅगलॉगच्या परीक्षेत प्रश्‍नातील आकृत्या गायब - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 21, 2020

'अंतिम' परीक्षेसाठी दिल्लीतील अधिकाऱ्याचा पुण्यात तळ; बुधवारी परीक्षा पार पडली सुरळीत पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेतील गोंधळ संपत नसल्याने यासाठी अखेर लंडनमध्ये असलेल्या एजन्सीच्या प्रमुखांशी विद्यापीठातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. एजन्सीकडून होणाऱ्या चुकांची माहिती देण्यात आलीच, पण यातून तोडगा काढा अशी भूमिका मांडण्यात आली. अखेर परीक्षेचा कारभार दिल्लीतून पाहणाऱ्या अधिकाऱ्यास पुण्यात यावे लागले आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया संपेपर्यंत या अधिकाऱ्याचा तळ पुण्यात असणार आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी 'सकाळ'ने विद्यार्थ्यांची बाजू सतत मांडली आहे. - Positive Story : सर्वांत स्वस्त कोरोना टेस्टिंग कीट येणार बाजारात; आयआयटी खरगपूरची कमाल!​ पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा 12 ऑक्‍टोबरपासून सुरू झाली, पण गेल्या नऊ दिवसांपासून अनेक तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच एजन्सीचे सर्व्हर दोन दिवस क्रॅश झाल्याने टिकेची झोड उठली. त्याचमुळे विद्यापीठाने एजन्सीच्या लंडनमध्ये असलेल्या प्रमुखांशी आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधला. पुणे विद्यापीठाने परीक्षेत येत असलेल्या अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवत त्यावर त्वरीत तोडगा काढण्याची सूचना केली. यावेळी परीक्षेत येणाऱ्या अडचणींबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये कम्युनीकेशन गॅप असल्याने व्यवस्थित माहितीच मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यावेळी एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात सुधारणा करत सर्व लहान मोठ्या तक्ररींकडे व्यवस्थित लक्ष दिले जाईल, असे आश्‍वासन विद्यापीठाला दिले आहे. तसेच विद्यापीठाची परीक्षा आणखी काही दिवस चालणार असल्याने कोणतीही अडचण त्वरीत सुटावी यासाठी दिल्लीतील एक तज्ज्ञ पुणे विद्यापीठात दाखल झाले आहेत. परीक्षा संपेपर्यंत ते इथेच राहणार आहेत. - राज्य सरकारनं माझ्यावर जबाबदारी सोपवावी : संभाजीराजे छत्रपती सर्व्हरमधील जंक फाईल्स क्लिअर बुधवारी पुणे विद्यापीठातर्फे 179 विषयांची परीक्षा तीन सत्रात घेण्यात आली. पण एखाद दुसऱ्या विषयातील अडचणी सोडता इतर विषयांची परीक्षा सुरळीत पार पडली. परीक्षा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच व्यवस्थित परीक्षा झाली आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर रात्रभर बसून एजन्सीने सर्व्हरमधील जंक फाईल्स काढून टाकल्या. तसेच सर्व्हरवर लोड येऊ नये, म्हणून प्रत्येक सत्रात वेळ वाढून दिला आहे. ठराविक वेळेनुसार विद्यार्थी लॉगइन करतील, अशी व्यवस्था केल्यामुळे परीक्षा सुरळीत पार पडली. - चोरीची शिक्षा भोगून बाहेर आले होते; पुन्हा चोरीमुळेच तुरुंगात गेले!​ "ऑनलाइन परीक्षेत येणाऱ्या अडचणींसंदर्भात लंडन येथील एजन्सीच्या प्रमुखांशी चर्चा केली, त्यांना होणाऱ्या चुका लक्षात आणून दिल्याने त्यांनी त्या सोडविण्यासाठी लगेच पाऊले उचलली. त्यामुळे बुधवारी परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. पुढील परीक्षाही याच पद्धतीने व्हावी यासाठी एजन्सीचे एक अधिकारी पुण्यात आले आहेत. परीक्षा संपेपर्यंत ते इथे व्यवस्थेवर लक्ष ठेऊन असतील.'' - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा विभाग बुधवारच्या परीक्षेतील घडामोडी - 179 विषयांची परीक्षा 1.24 लाख विद्यार्थ्यांनी दिली. - ऑनलाइन 1.6 लाख तर ऑफलाइनसाठी 18 हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती - बीबीएच्या मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टीमऐवजी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पेपर आला. - इंजिनीयरींग बॅगलॉगच्या परीक्षेत प्रश्‍नातील आकृत्या गायब - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Tf5Ob1

No comments:

Post a Comment