ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी शेतीच्या कामावर, मोबाईल खरेदीच्या रकमेसाठी कापूस वेचणीला औरंगाबाद : आमचे सर म्हणत्यात, मोबाईलवर अभ्यास पाठवलाय! पण माझ्या वडिलांकडे मोठा मोबाईल नाही. शेतात कापूस चांगला आल्यावर तुला नवीन मोबाईल घेऊन देईल, असं माझे वडील म्हणले होते. पण, जास्त पावसाने कापसाची बोंडं काळी पडली. आता मोबाईल घेता येणार नाही. म्हणून मीच दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचायला जात असल्याचे माधुरी दाभाडे या विद्यार्थिनीने सांगितले. अवास्तव शुल्क आकारल्याने जैन इंटरनॅशनल शाळेत तोडफोड करणाऱ्या मनसेच्या ‘त्रिकूटां’ना जामिन मंजूर कोरोनाने शाळा बंद आहे, ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नाही. कापसाचे पीक अतिपावसामुळे हातचे गेल्याने परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. मोबाईल घेण्यासाठी माधुरी दररोज रोजंदारीवर शेतात कापूस वेचणीच्या कामाला जात आहे. दिवसभर आठ ते दहा तास काबाड कष्ट केल्यानंतर त्या कोवळ्या जिवाला दीडशे रुपये मिळतात. शाळा बंद असल्याने जिह्यामधील खेड्यांतील ७० टक्के विद्यार्थी सध्या शेतात राबताना दिसत आहे. तर दुसरीकडे सारिका शिंदे आणि तिच्या मैत्रिणीची कथा वेगळी नाही. ऑनलाइन शिक्षण घ्यायचे म्हणजे मोबाईल पाहिजे, त्याला इंटरनेटची सोय म्हणजे दर महिन्याला तीनशे रुपये, त्यात गरीब मजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा जगण्याचाही प्रश्‍न आहे. तिथे ऑनलाइन शिक्षणाचं सोंग कसे साजरे करायचं? हा प्रश्न असल्यामुळे सगळ्या विद्यार्थिनी उन्हातान्हात शेतात राबत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघे ठार, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू कोरोना लॉकडाउनने शेतकऱ्यांच्या शेतातच फळ, पालेभाज्या सडून गेल्या. अतिवृष्टीने सोयाबीन, कापसाची पीक पाण्यात आडवी झाली. जिथे पोटापाण्याचा प्रश्‍न, तिथे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल कुठून घेणार? असा प्रश्‍न सर्वच शेतकरी पालकांना पडला आहे. मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान पालकांना पाहवत नाही. शेतकरी पालकांचीही मुलांना मोबाईल घेऊन देण्याची खूप इच्छा आहे; पण गरिबीच्या परिस्थितीपुढे करणार काय? ऑनलाइन शिक्षणाचा कुणाला फायदा? कोरोनाने शाळा बंद असल्याने, शासन व शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. नोकरदार वर्गातील मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळत असले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी या ऑनलाइन शिक्षणाचे भांडवल केले आहे. ऑनलाइन क्लास, परीक्षांच्या नावाखाली शाळांकडून लूट सुरू आहे. तर ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा फायदाच दिसत नाही. खेड्यामध्ये मोबाईल, इंटरनेटची सुविधा नाही. जिथे एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, तिथे ऑनलाइन शिक्षण काय घेणार? असा प्रश्न आहे. ऑनलाइन शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये दरी निर्माण केली. ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कधी मोबाईल घेणार? आणि कधी ऑनलाइन शिक्षणात सहभागी होणार? हाच मोठा प्रश्‍न आहे.   स्वतःच्या शिक्षणासाठी मुलांचे असे शेतात कामाला जाणे पाहवत नाही; पण काय करणार? पावसाने हातचे पीक गेले. लॉकडाउनमध्ये शेतातच माल सडून पडला त्यामुळे तोटा झाला आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल पाहिजे असा हट्ट करणारी मुलगी देखील आता काहीच बोलत नाही. - विजय केसकर , शेतकरी     संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 18, 2020

ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थी शेतीच्या कामावर, मोबाईल खरेदीच्या रकमेसाठी कापूस वेचणीला औरंगाबाद : आमचे सर म्हणत्यात, मोबाईलवर अभ्यास पाठवलाय! पण माझ्या वडिलांकडे मोठा मोबाईल नाही. शेतात कापूस चांगला आल्यावर तुला नवीन मोबाईल घेऊन देईल, असं माझे वडील म्हणले होते. पण, जास्त पावसाने कापसाची बोंडं काळी पडली. आता मोबाईल घेता येणार नाही. म्हणून मीच दुसऱ्याच्या शेतात कापूस वेचायला जात असल्याचे माधुरी दाभाडे या विद्यार्थिनीने सांगितले. अवास्तव शुल्क आकारल्याने जैन इंटरनॅशनल शाळेत तोडफोड करणाऱ्या मनसेच्या ‘त्रिकूटां’ना जामिन मंजूर कोरोनाने शाळा बंद आहे, ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नाही. कापसाचे पीक अतिपावसामुळे हातचे गेल्याने परिस्थिती अजूनच बिकट झाली आहे. मोबाईल घेण्यासाठी माधुरी दररोज रोजंदारीवर शेतात कापूस वेचणीच्या कामाला जात आहे. दिवसभर आठ ते दहा तास काबाड कष्ट केल्यानंतर त्या कोवळ्या जिवाला दीडशे रुपये मिळतात. शाळा बंद असल्याने जिह्यामधील खेड्यांतील ७० टक्के विद्यार्थी सध्या शेतात राबताना दिसत आहे. तर दुसरीकडे सारिका शिंदे आणि तिच्या मैत्रिणीची कथा वेगळी नाही. ऑनलाइन शिक्षण घ्यायचे म्हणजे मोबाईल पाहिजे, त्याला इंटरनेटची सोय म्हणजे दर महिन्याला तीनशे रुपये, त्यात गरीब मजुरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा जगण्याचाही प्रश्‍न आहे. तिथे ऑनलाइन शिक्षणाचं सोंग कसे साजरे करायचं? हा प्रश्न असल्यामुळे सगळ्या विद्यार्थिनी उन्हातान्हात शेतात राबत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून दोघे ठार, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू कोरोना लॉकडाउनने शेतकऱ्यांच्या शेतातच फळ, पालेभाज्या सडून गेल्या. अतिवृष्टीने सोयाबीन, कापसाची पीक पाण्यात आडवी झाली. जिथे पोटापाण्याचा प्रश्‍न, तिथे ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल कुठून घेणार? असा प्रश्‍न सर्वच शेतकरी पालकांना पडला आहे. मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान पालकांना पाहवत नाही. शेतकरी पालकांचीही मुलांना मोबाईल घेऊन देण्याची खूप इच्छा आहे; पण गरिबीच्या परिस्थितीपुढे करणार काय? ऑनलाइन शिक्षणाचा कुणाला फायदा? कोरोनाने शाळा बंद असल्याने, शासन व शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय निवडला. नोकरदार वर्गातील मुलांना ऑनलाइन शिक्षण मिळत असले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी या ऑनलाइन शिक्षणाचे भांडवल केले आहे. ऑनलाइन क्लास, परीक्षांच्या नावाखाली शाळांकडून लूट सुरू आहे. तर ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाचा फायदाच दिसत नाही. खेड्यामध्ये मोबाईल, इंटरनेटची सुविधा नाही. जिथे एक वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, तिथे ऑनलाइन शिक्षण काय घेणार? असा प्रश्न आहे. ऑनलाइन शिक्षणाने विद्यार्थ्यांमध्ये दरी निर्माण केली. ही वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कधी मोबाईल घेणार? आणि कधी ऑनलाइन शिक्षणात सहभागी होणार? हाच मोठा प्रश्‍न आहे.   स्वतःच्या शिक्षणासाठी मुलांचे असे शेतात कामाला जाणे पाहवत नाही; पण काय करणार? पावसाने हातचे पीक गेले. लॉकडाउनमध्ये शेतातच माल सडून पडला त्यामुळे तोटा झाला आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल पाहिजे असा हट्ट करणारी मुलगी देखील आता काहीच बोलत नाही. - विजय केसकर , शेतकरी     संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/355HvSo

No comments:

Post a Comment