आंबोलीत माशाची नवी प्रजाती आंबोली (सिंधुदुर्ग) - आंबोली हिरण्यकेशी येथे गोड्या पाण्यातील माशाची नवी प्रजाती शोधून काढण्यात आली आहे. स्थानिक भाषेत तांबोशी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माशाला "हिरण्यकेशी' असे नाव देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हे संशोधन केले आहे.  हा मासा श्री. ठाकरे यांच्यासह डॉ. प्रवीणराज जयसिंम्हन, शंकर बालसू ब्रमनिहन यांनी शोधला आहे. पश्‍चिम घाटातील जैवविविधतेच्या हॉटस्पॉटमधील सर्वांत टॉप असणाऱ्या सह्याद्रीतील पर्वतरांगेत नैसर्गिक अनेक प्रकारच्या जीवजाती आहेत. त्यांचा खजाना आहे. आंबोलीतही पशु-पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे, त्याचबरोबर जलचरांचाही खजिना आहे. आंबोलीत असे संशोधन करण्यासाठी बरेच संशोधक, निसर्ग अभ्यासक येत असतात आणि त्यांच्या अभ्यासातून वेगवेगळ्या प्रजाती पुढे येत असतात. अशाच प्रकारे गतवर्षी पालीची एक नवीन प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली होती.  आंबोली येथील पाण्यात ही वेगळ्या प्रकारची मत्स्य संपदा आहे. येथील पाण्यात तांबोशी हा गोल्ड फिशसारखा अंगावर लालसर पट्टे असणारा आणि संत्र्याच्या रंगासारखा अंगाने बारीक असणारा मासा आंबोलीत नदीत सापडतो. त्यातीलच त्याच प्रवर्गातील वेगळा दिसणारा एक मासा हिरण्यकेशी तळीत ठाकरे यांना आढळून आला. हा मासा हिरण्यकेशी येथील झऱ्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आहे. तो स्वच्छ पाण्यात राहतो. त्यामुळे येथील तळीच्या तुळशीच्या पटांगणात तो विहार करताना दिसून येतो. आंबोलीत ठाकरे यांनी शोधलेल्या या माशामुळे येथील जलसंपत्तीतही एक मानाचा तुरा रोवला आहे. आंबोलीवासीयांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे.  तेजस ठाकरे आणि आंबोली  आंबोलीत तेजस ठाकरे आले की हेमंत ओगले यांच्या हॉटेलमध्ये निवास करतात. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला भेट किंवा पुष्पगुच्छ स्वीकारत नाहीत. आंबोलीत येतात ते निसर्ग संशोधन आणि निसर्ग सानिध्यासाठी. त्यांचे येथे येणेही वारंवार असते; मात्र यात कोणताही तामझाम नसतो.  देखणी संपदा  नव्याने जगासमोर आलेला हिरण्यकेशी हा मासा आंबोली वायंगणी नदीत भागात आढळून येतो. आंबोलीत याला तांबोशी म्हणून ओळखतात. आणखीही लाल आणि भगव्या प्रकारच्या वेगवेगळ्या तांबोशी मिळतात.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 16, 2020

आंबोलीत माशाची नवी प्रजाती आंबोली (सिंधुदुर्ग) - आंबोली हिरण्यकेशी येथे गोड्या पाण्यातील माशाची नवी प्रजाती शोधून काढण्यात आली आहे. स्थानिक भाषेत तांबोशी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या माशाला "हिरण्यकेशी' असे नाव देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने हे संशोधन केले आहे.  हा मासा श्री. ठाकरे यांच्यासह डॉ. प्रवीणराज जयसिंम्हन, शंकर बालसू ब्रमनिहन यांनी शोधला आहे. पश्‍चिम घाटातील जैवविविधतेच्या हॉटस्पॉटमधील सर्वांत टॉप असणाऱ्या सह्याद्रीतील पर्वतरांगेत नैसर्गिक अनेक प्रकारच्या जीवजाती आहेत. त्यांचा खजाना आहे. आंबोलीतही पशु-पक्षी, प्राणी, कीटक, फुलपाखरे, त्याचबरोबर जलचरांचाही खजिना आहे. आंबोलीत असे संशोधन करण्यासाठी बरेच संशोधक, निसर्ग अभ्यासक येत असतात आणि त्यांच्या अभ्यासातून वेगवेगळ्या प्रजाती पुढे येत असतात. अशाच प्रकारे गतवर्षी पालीची एक नवीन प्रजाती तेजस ठाकरे यांनी शोधली होती.  आंबोली येथील पाण्यात ही वेगळ्या प्रकारची मत्स्य संपदा आहे. येथील पाण्यात तांबोशी हा गोल्ड फिशसारखा अंगावर लालसर पट्टे असणारा आणि संत्र्याच्या रंगासारखा अंगाने बारीक असणारा मासा आंबोलीत नदीत सापडतो. त्यातीलच त्याच प्रवर्गातील वेगळा दिसणारा एक मासा हिरण्यकेशी तळीत ठाकरे यांना आढळून आला. हा मासा हिरण्यकेशी येथील झऱ्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात आहे. तो स्वच्छ पाण्यात राहतो. त्यामुळे येथील तळीच्या तुळशीच्या पटांगणात तो विहार करताना दिसून येतो. आंबोलीत ठाकरे यांनी शोधलेल्या या माशामुळे येथील जलसंपत्तीतही एक मानाचा तुरा रोवला आहे. आंबोलीवासीयांनी यामुळे आनंद व्यक्त केला आहे.  तेजस ठाकरे आणि आंबोली  आंबोलीत तेजस ठाकरे आले की हेमंत ओगले यांच्या हॉटेलमध्ये निवास करतात. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला भेट किंवा पुष्पगुच्छ स्वीकारत नाहीत. आंबोलीत येतात ते निसर्ग संशोधन आणि निसर्ग सानिध्यासाठी. त्यांचे येथे येणेही वारंवार असते; मात्र यात कोणताही तामझाम नसतो.  देखणी संपदा  नव्याने जगासमोर आलेला हिरण्यकेशी हा मासा आंबोली वायंगणी नदीत भागात आढळून येतो. आंबोलीत याला तांबोशी म्हणून ओळखतात. आणखीही लाल आणि भगव्या प्रकारच्या वेगवेगळ्या तांबोशी मिळतात.  संपादन - राहुल पाटील   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2T0BPDJ

No comments:

Post a Comment