रस्त्यावरील खड्डे नव्हे हे तर यमदूतच, जागोजागी उखडली गिट्टी जलालखेडा (जि. नागपूर) ः सततच्या पावसामुळे मोवाड - मध्यप्रदेश सीमेपर्यंत मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णतः उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय सध्या पांढरे हत्ती बनले आहे. जलालखेडा, मोवाड ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत असलेल्या मार्गावरील खड्डे लगेच भरले नाही तर मार्गातील खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा श्रीराम युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मयूर दंधारे यांनी दिला आहे. बळीराजाच्या हृदयात भरली धडकी; हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्‍यता; परतीचा पाऊस धोक्याचा  जलालखेडा-मोवाड-बनगाव मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये- जा सुरू असते. विशेषतः तहसील कार्यालय नरखेड तसेच मध्यप्रदेशकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. परंतु रस्त्यावरील मोठमोठ्या खड्डयांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेतीचे टिप्पर वाहतात. त्यामुळे रस्त्याची जास्तच दुर्दशा झाली आहे. रस्तावरील डांबर उखडले असून, जागोजागी खड्डे पडले आहे. परिणामी हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.   अन्यथा खड्डयात वृक्षारोपण या रस्त्याचे काम १९९५ ते १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात झाले होते. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर करून रस्ता तयार केला होता. तेव्हापासून डागडुजी झालेली नाही. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून राहते. अशावेळी खड्डयाचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार पडून जखमी होतात. कित्येकांना गंभीर दुखापत झाली आहे. कोणाच्या कंबरेत, तर कोणाच्या पाठीत गॅप आली आहे. अशा मार्गावर वाहतूक करायची कशी, असा प्रश्न श्रीराम युवा सेनेने संबंधित विभागाला विचारला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत संबंधित विभागाने लक्ष दिले नाही तर त्या खड्डयात वृक्षारोपण करा, असे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे. सेल्फी विथ खड्डा उपक्रम झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी सेल्फी विथ खड्डा उपक्रम राबवत आहो. दिलेल्या दिवसात खड्डे बुजवले गेले नाही तर त्याच खड्डयात संबंधित विभागाच्या मंत्र्यांचा फोटो लावून हेच ते जबाबदार या आशयाचे फलक लावण्यात येईल मयूर दंढारे, जिल्हाध्यक्ष, श्री राम युवा सेना   रस्ता मंजूर   खासदार कृपाल तुमाने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून २०१८- २०१९ या आर्थिक वर्षामध्ये हा रस्ता मंजूर करून घेतला. पण, अजूनपर्यत टेंडर झाले नाही. यामुळे रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम थांबले आहे. दुरुस्ती कामाचे टेंडर आले असून, पावसामुळे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राजू हरणे, शिवसेना जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 16, 2020

रस्त्यावरील खड्डे नव्हे हे तर यमदूतच, जागोजागी उखडली गिट्टी जलालखेडा (जि. नागपूर) ः सततच्या पावसामुळे मोवाड - मध्यप्रदेश सीमेपर्यंत मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून अतिशय दुर्दशा झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णतः उखडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय सध्या पांढरे हत्ती बनले आहे. जलालखेडा, मोवाड ते मध्यप्रदेश सीमेपर्यंत असलेल्या मार्गावरील खड्डे लगेच भरले नाही तर मार्गातील खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा श्रीराम युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मयूर दंधारे यांनी दिला आहे. बळीराजाच्या हृदयात भरली धडकी; हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्‍यता; परतीचा पाऊस धोक्याचा  जलालखेडा-मोवाड-बनगाव मार्गावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये- जा सुरू असते. विशेषतः तहसील कार्यालय नरखेड तसेच मध्यप्रदेशकडे जाणारा मुख्य रस्ता असल्याने मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. परंतु रस्त्यावरील मोठमोठ्या खड्डयांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाट काढावी लागते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेतीचे टिप्पर वाहतात. त्यामुळे रस्त्याची जास्तच दुर्दशा झाली आहे. रस्तावरील डांबर उखडले असून, जागोजागी खड्डे पडले आहे. परिणामी हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे.   अन्यथा खड्डयात वृक्षारोपण या रस्त्याचे काम १९९५ ते १९९९ मध्ये युती सरकारच्या काळात झाले होते. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर करून रस्ता तयार केला होता. तेव्हापासून डागडुजी झालेली नाही. पावसामुळे खड्ड्यात पाणी साचून राहते. अशावेळी खड्डयाचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वार पडून जखमी होतात. कित्येकांना गंभीर दुखापत झाली आहे. कोणाच्या कंबरेत, तर कोणाच्या पाठीत गॅप आली आहे. अशा मार्गावर वाहतूक करायची कशी, असा प्रश्न श्रीराम युवा सेनेने संबंधित विभागाला विचारला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत संबंधित विभागाने लक्ष दिले नाही तर त्या खड्डयात वृक्षारोपण करा, असे आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे. सेल्फी विथ खड्डा उपक्रम झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी सेल्फी विथ खड्डा उपक्रम राबवत आहो. दिलेल्या दिवसात खड्डे बुजवले गेले नाही तर त्याच खड्डयात संबंधित विभागाच्या मंत्र्यांचा फोटो लावून हेच ते जबाबदार या आशयाचे फलक लावण्यात येईल मयूर दंढारे, जिल्हाध्यक्ष, श्री राम युवा सेना   रस्ता मंजूर   खासदार कृपाल तुमाने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून २०१८- २०१९ या आर्थिक वर्षामध्ये हा रस्ता मंजूर करून घेतला. पण, अजूनपर्यत टेंडर झाले नाही. यामुळे रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम थांबले आहे. दुरुस्ती कामाचे टेंडर आले असून, पावसामुळे काम रखडले आहे. त्यामुळे या रस्त्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राजू हरणे, शिवसेना जिल्हा प्रमुख, नागपूर ग्रामीण   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3j7ykG7

No comments:

Post a Comment