ऑनलाइन शॉपिंगचा बाजारपेठेला फटका, दिवाळीच्या तोंडावरही ग्राहक फिरकेना अमरावती : कोरोना संक्रमणाची गती व बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी बाजारपेठांतील व्यवसायाला अजून उभारी आलेली नाही. युवावर्गासह उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांनी ऑनलाइन खरेदीला पसंती दिली आहे, तर शेतीचे पावसाने नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहक बाजारपेठेकडे फिरकलेला नाही. याचा एकूणच परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाला असून महानगरातील बाजार अजूनही ठप्पच आहे. दसरा-दिवाळी या सणांच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.  नवरात्रीनंतर दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली आहे. ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी सवलतींचा वर्षाव केल्याने ग्राहक देखील आकर्षित होत आहेत. कोरोना संक्रमणामुळे लॉकडाउन आणि नंतर अनलॉकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेतील कापडासंह इलेक्‍ट्रॉनिक साहित्य पडून होते. त्यामुळे ग्राहकांनी नव्या स्टॉकच्या खरेदीसाठी बाजारपेठेपेक्षा ऑनलाइन खरेदीला पसंती दिली आहे. यामध्ये तरुणपिढी व उच्चशिक्षितांची संख्या तुलनेने अधिक आहे. अगदी कपड्यांपासून ते मोबाईल व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे ऑनलाइन खरेदी केले जात आहेत. हेही वाचा - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा... दरवर्षी, साधारणतः दसरा-दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर नागरिकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, गेल्या काही वर्षांत बाजारपेठेतील जवळपास चाळीस टक्के गर्दी ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी आपल्याकडे खेचली आहे. विशेष म्हणजे, विदेशी बनावटीच्या वस्तू सहज ऑनलाइन उपलब्ध असून घरपोच मिळत आहेत. त्याशिवाय महागड्या उपकरणांसाठी ऑनलाइन शॉपिंगमध्ये कर्जाची अथवा इएमआयची सोय आहे. मात्र, ऑनलाइनच्या खरेदीचा स्थानिक बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसत असून सणासुदीच्या काळात कोट्यवधींचा त्यांचा व्यवसाय हिरावला जाऊ लागला आहे. हेही वाचा - नागपुरात ‘कोविशिल्ड’ लसीची चाचणी जोमात; २० जणांचे... व्यवसाय बुडतोय - ऑनलाइन शॉपिंगमुळे मोबाइल विक्रेत्यांना अधिक फटका बसू लागला आहे. या कंपन्यांनी सर्व नियम मोडून किरकोळ बाजारच मोडीत काढण्याची मोहीम सुरू केली आहे. सवलतींच्या वर्षावामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा ग्राहक दुरावत आहे. याविरोधात ऑल इंडिया मोबाइल रिटेलर असोसिएशनने कनफेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे, असे ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे विदर्भ उपाध्यक्ष बादल कुळकर्णी यांनी सांगितले. कॅट ई ऑनलाइन व्यासपीठ सुरू करणार - कनफेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटने ऑनलाइन शॉपिंगमध्ये सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांसाठी भारत ई -मार्केट ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, असे कॅटचे अध्यक्ष भरतीया यांनी सांगितले आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनाही आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सेवा देणे गरजेचे आहे, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व कॅटचे सदस्य सुरेश जैन यांनी सांगितले.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 21, 2020

ऑनलाइन शॉपिंगचा बाजारपेठेला फटका, दिवाळीच्या तोंडावरही ग्राहक फिरकेना अमरावती : कोरोना संक्रमणाची गती व बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी बाजारपेठांतील व्यवसायाला अजून उभारी आलेली नाही. युवावर्गासह उच्च व मध्यमवर्गीय नागरिकांनी ऑनलाइन खरेदीला पसंती दिली आहे, तर शेतीचे पावसाने नुकसान झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहक बाजारपेठेकडे फिरकलेला नाही. याचा एकूणच परिणाम बाजारपेठेतील उलाढालीवर झाला असून महानगरातील बाजार अजूनही ठप्पच आहे. दसरा-दिवाळी या सणांच्या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिकांना ग्राहकांची प्रतीक्षा आहे.  नवरात्रीनंतर दसरा-दिवाळी या सणासुदीच्या काळात ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली आहे. ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी सवलतींचा वर्षाव केल्याने ग्राहक देखील आकर्षित होत आहेत. कोरोना संक्रमणामुळे लॉकडाउन आणि नंतर अनलॉकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून स्थानिक बाजारपेठेतील कापडासंह इलेक्‍ट्रॉनिक साहित्य पडून होते. त्यामुळे ग्राहकांनी नव्या स्टॉकच्या खरेदीसाठी बाजारपेठेपेक्षा ऑनलाइन खरेदीला पसंती दिली आहे. यामध्ये तरुणपिढी व उच्चशिक्षितांची संख्या तुलनेने अधिक आहे. अगदी कपड्यांपासून ते मोबाईल व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे ऑनलाइन खरेदी केले जात आहेत. हेही वाचा - छे छेऽऽ पेपर तर ‘नीट’ दिला; सहाशे गुणांची अपेक्षा... दरवर्षी, साधारणतः दसरा-दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदर नागरिकांची बाजारात खरेदीसाठी गर्दी होते. मात्र, गेल्या काही वर्षांत बाजारपेठेतील जवळपास चाळीस टक्के गर्दी ऑनलाइन शॉपिंग कंपन्यांनी आपल्याकडे खेचली आहे. विशेष म्हणजे, विदेशी बनावटीच्या वस्तू सहज ऑनलाइन उपलब्ध असून घरपोच मिळत आहेत. त्याशिवाय महागड्या उपकरणांसाठी ऑनलाइन शॉपिंगमध्ये कर्जाची अथवा इएमआयची सोय आहे. मात्र, ऑनलाइनच्या खरेदीचा स्थानिक बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसत असून सणासुदीच्या काळात कोट्यवधींचा त्यांचा व्यवसाय हिरावला जाऊ लागला आहे. हेही वाचा - नागपुरात ‘कोविशिल्ड’ लसीची चाचणी जोमात; २० जणांचे... व्यवसाय बुडतोय - ऑनलाइन शॉपिंगमुळे मोबाइल विक्रेत्यांना अधिक फटका बसू लागला आहे. या कंपन्यांनी सर्व नियम मोडून किरकोळ बाजारच मोडीत काढण्याची मोहीम सुरू केली आहे. सवलतींच्या वर्षावामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचा ग्राहक दुरावत आहे. याविरोधात ऑल इंडिया मोबाइल रिटेलर असोसिएशनने कनफेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या माध्यमातून मोहीम सुरू केली आहे, असे ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशनचे विदर्भ उपाध्यक्ष बादल कुळकर्णी यांनी सांगितले. कॅट ई ऑनलाइन व्यासपीठ सुरू करणार - कनफेडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटने ऑनलाइन शॉपिंगमध्ये सहभागी होण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांसाठी भारत ई -मार्केट ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, असे कॅटचे अध्यक्ष भरतीया यांनी सांगितले आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी स्थानिक व्यापाऱ्यांनाही आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सेवा देणे गरजेचे आहे, असे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व कॅटचे सदस्य सुरेश जैन यांनी सांगितले.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dLYrRP

No comments:

Post a Comment