मिरज पूर्व भागात कमी उंचीचे पूल बांधल्याने संताप सांगली : मिरज पूर्व भागातून गेलेल्या दिघंची ते हेरवाड या नव्या राज्य मार्गावरील मोठ्या ओढ्यांवर कमी उंचीचे पूल बांधले जात असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रमुख राज्य मार्गावर उंचीचे बांधावेत, ओढ्याच्या दोन टोकांशी समांतर पूल असले पाहिजेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्याबाबत कॉंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.  त्यासाठी या विभागाने या "हायब्रीड' योजनेच्या निधीशिवाय स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यावर लवकर निर्णय झाल्यास कमी उंचीच्या पुलांवर नाहक खर्च होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.  या राज्य मार्गावर सलगरे, बेळंकी, शिपूर, पायाप्पाचीवाडी, एरंडोली, मल्लेवाडी, टाकळी येथे मोठे पूल आहेत. आढओढ्यावरील पूल सर्वात धोकादायक आणि मोठा आहे. या सर्व ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही टोकांना समांतर पूल बांधले तरच पावसाळ्यात विनाअडथळा वाहतूक सुरु राहू शकणार आहे. याबाबत एरंडोली, मल्लेवाडी ग्रामपंचायतीसह मिरज पूर्व भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला आहे. त्याबाबत सकारात्मक धोरण ठरवावे आणि या राज्य मार्गाला पूरमुक्त ठेवण्यासाठी उंच पूल बांधावेत, अशी मागणी केली आहे.  भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रविकांत साळुंखे म्हणाले, ""सलगरेपासून मिरजेपर्यंत या रस्त्यावरील ओढ्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. रस्ता दोन दिवस बंद होता. नवीन पूल केल्यानंतर हीच परिस्थिती राहणार असेल तर उपयोग काय? छोटे पूल न करता एकदात उंचीचे पूल बांधावेत.'' कॉंग्रेसतर्फे धनराज सातपुते, अमोल पाटील, सुनिल पाटील, फक्रुद्दीन नांद्रेकर, सुनिल गुळवणे, स्वराज्य पाटील यांनी निवेदन दिले आहे.  महिलेचा बळी गेला  दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने ओढ्याला प्रचंड पाणी आले आहे. कमी उंचीचा पूल असल्याने मल्लेवाडी येथे एक महिला वाहून गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. दोघांना वाचवण्यात यश आले. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते बंद होतात. यावर पुन्हा कमी उंचीचे पूल बांधणे काय कामाचे, असा सवाल करण्यात आला आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 20, 2020

मिरज पूर्व भागात कमी उंचीचे पूल बांधल्याने संताप सांगली : मिरज पूर्व भागातून गेलेल्या दिघंची ते हेरवाड या नव्या राज्य मार्गावरील मोठ्या ओढ्यांवर कमी उंचीचे पूल बांधले जात असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रमुख राज्य मार्गावर उंचीचे बांधावेत, ओढ्याच्या दोन टोकांशी समांतर पूल असले पाहिजेत, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. त्याबाबत कॉंग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.  त्यासाठी या विभागाने या "हायब्रीड' योजनेच्या निधीशिवाय स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्यासाठी खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्याकडेही मागणी करण्यात आली आहे. त्यावर लवकर निर्णय झाल्यास कमी उंचीच्या पुलांवर नाहक खर्च होणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.  या राज्य मार्गावर सलगरे, बेळंकी, शिपूर, पायाप्पाचीवाडी, एरंडोली, मल्लेवाडी, टाकळी येथे मोठे पूल आहेत. आढओढ्यावरील पूल सर्वात धोकादायक आणि मोठा आहे. या सर्व ठिकाणी ओढ्याच्या दोन्ही टोकांना समांतर पूल बांधले तरच पावसाळ्यात विनाअडथळा वाहतूक सुरु राहू शकणार आहे. याबाबत एरंडोली, मल्लेवाडी ग्रामपंचायतीसह मिरज पूर्व भागातील नागरिकांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला आहे. त्याबाबत सकारात्मक धोरण ठरवावे आणि या राज्य मार्गाला पूरमुक्त ठेवण्यासाठी उंच पूल बांधावेत, अशी मागणी केली आहे.  भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य रविकांत साळुंखे म्हणाले, ""सलगरेपासून मिरजेपर्यंत या रस्त्यावरील ओढ्यांच्या पुलावरून पाणी वाहत होते. रस्ता दोन दिवस बंद होता. नवीन पूल केल्यानंतर हीच परिस्थिती राहणार असेल तर उपयोग काय? छोटे पूल न करता एकदात उंचीचे पूल बांधावेत.'' कॉंग्रेसतर्फे धनराज सातपुते, अमोल पाटील, सुनिल पाटील, फक्रुद्दीन नांद्रेकर, सुनिल गुळवणे, स्वराज्य पाटील यांनी निवेदन दिले आहे.  महिलेचा बळी गेला  दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने ओढ्याला प्रचंड पाणी आले आहे. कमी उंचीचा पूल असल्याने मल्लेवाडी येथे एक महिला वाहून गेली. त्यात तिचा मृत्यू झाला. दोघांना वाचवण्यात यश आले. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते बंद होतात. यावर पुन्हा कमी उंचीचे पूल बांधणे काय कामाचे, असा सवाल करण्यात आला आहे.   संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/37q4pqd

No comments:

Post a Comment