परतीच्या पावसाचा तडाखा! कवठ्यात शेतमाल भिजला; पाटणला शेतकरी दुहेरी संकटात कवठे (जि. सातारा) : कवठे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरात मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची लगबग अंतिम टप्प्यात असून, शेतशिवारात सोयाबीन मळणीची कामे सुरू होती.   लवकर घेवडा, सोयाबीन तसेच कडधान्याची पिके काढलेल्या शेतकऱ्यांची रब्बी पिकासाठी पेरणीपूर्व मशागतीची कामासाठी धांदल सुरू होती. अचानकपणे आलेल्या पावसाने शेतीच्या कामात खोळंबा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची काढलेली पिके पावसाने शेतामध्येच भिजल्याने मोठे नुकसान झाले. हा पाऊस ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे. ऐन हंगामात शेतकरी विचारतात, कुठे गेला युरिया?  खरीप पिकांच्या काढणीत व्यत्यय  पाटण : तालुक्‍यात शनिवापासून सुरू झालेल्या पावसाने खरीप पिकांच्या काढणीत खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने तालुक्‍याला झोडपून काढले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला. कापणी केलेली व पावसामुळे शेतात भिजलेल्या पिकांची मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. परतीच्या पावसाचा जावळीसह महाबळेश्वरला तडाखा; स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम मात्र, रविवारी दुपारी दीड वाजता पावसास सुरुवात झाली. हलक्‍या पावसाच्या सरी पडत होत्या. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पाऊस पूर्ण थांबल्याशिवाय शेतकरी पुन्हा पिकांची काढणी करणार नाही. पावसामुळे कापणी केलेली पिके शेतात व काढणीसाठी शेतकरी व्यस्त असल्याने उन्हात वाळविण्यासाठी घातलेले धान्य भिजले. खरिपाची काढणी करता येत नाही व ढगाळ वातावरणामुळे काढलेले धान्य वाळविता येत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.  Edited By : Siddharth Latkar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 11, 2020

परतीच्या पावसाचा तडाखा! कवठ्यात शेतमाल भिजला; पाटणला शेतकरी दुहेरी संकटात कवठे (जि. सातारा) : कवठे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिसरात मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्याची लगबग अंतिम टप्प्यात असून, शेतशिवारात सोयाबीन मळणीची कामे सुरू होती.   लवकर घेवडा, सोयाबीन तसेच कडधान्याची पिके काढलेल्या शेतकऱ्यांची रब्बी पिकासाठी पेरणीपूर्व मशागतीची कामासाठी धांदल सुरू होती. अचानकपणे आलेल्या पावसाने शेतीच्या कामात खोळंबा झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची काढलेली पिके पावसाने शेतामध्येच भिजल्याने मोठे नुकसान झाले. हा पाऊस ज्वारी, गहू, हरभरा आदी रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असल्याने समाधानही व्यक्त होत आहे. ऐन हंगामात शेतकरी विचारतात, कुठे गेला युरिया?  खरीप पिकांच्या काढणीत व्यत्यय  पाटण : तालुक्‍यात शनिवापासून सुरू झालेल्या पावसाने खरीप पिकांच्या काढणीत खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शनिवारी सायंकाळी परतीच्या पावसाने तालुक्‍याला झोडपून काढले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पहाटेपासून पावसाचा जोर कमी झाला. कापणी केलेली व पावसामुळे शेतात भिजलेल्या पिकांची मळणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. परतीच्या पावसाचा जावळीसह महाबळेश्वरला तडाखा; स्ट्रॉबेरी लागवडीवर परिणाम मात्र, रविवारी दुपारी दीड वाजता पावसास सुरुवात झाली. हलक्‍या पावसाच्या सरी पडत होत्या. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत होता. पाऊस पूर्ण थांबल्याशिवाय शेतकरी पुन्हा पिकांची काढणी करणार नाही. पावसामुळे कापणी केलेली पिके शेतात व काढणीसाठी शेतकरी व्यस्त असल्याने उन्हात वाळविण्यासाठी घातलेले धान्य भिजले. खरिपाची काढणी करता येत नाही व ढगाळ वातावरणामुळे काढलेले धान्य वाळविता येत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.  Edited By : Siddharth Latkar News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2GF7kk9

No comments:

Post a Comment