पोस्टाच्या सेवेमुळे पेन्शनर्स भारावले; घरी जाऊन डिजिटल हयात प्रमाणपत्राची नोंदणी पुणे - ‘वयाच्या चौदाव्या वर्षी पोस्टात नोकरीस लागलो. त्यावेळी माझ्याकडे तार वाटपाचे काम होते. नंतर परीक्षा देऊन ‘टेलिफोन एक्‍स्चेंज’मध्ये नोकरी लागली आणि टेलिफोन मेकॅनिक म्हणून सेवा बजावली. येत्या डिसेंबरमध्ये वयाचे नव्वद वर्षे पूर्ण होतील. सेवानिवृत्त होऊनही आता ३० वर्षे झाली. वयोमानानुसार पोस्टातही जाणे शक्‍य होत नाही. परंतु ‘जीपीओ’च्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन डिजिटल हयात प्रमाणपत्राची नोंदणी केली. याचा मनापासून आनंद झाला,’’ असे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रेय घोलप यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टपाल खात्याकडून रुग्णालयात किंवा अंथरुणावर खिळून असलेल्या पोस्ट आणि टेलिकॉम कार्यालयातील पेन्शनर्सना घरी अथवा रुग्णालयात जाऊन डिजिटल हयात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ऐंशी वर्षापुढील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पेन्शनची रक्‍कम वेळेवर मिळणार आहे. धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी पोस्ट आणि टेलिकॉम खात्यातील पेन्शनर्सना दरवर्षी हयात प्रमाणपत्र दाखल सादर करावे लागते. शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे शक्‍य होत नाही. अशा पेन्शनर्सना घरी जाऊन हयात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. एक नोव्हेंबरपासून इतर पेन्शनर्सना स्वारगेटजवळ लोकमान्य नगर, मार्केटयार्ड आणि शिवाजीनगर तीन डिव्हिजनसह जवळच्या पोस्ट कार्यालयात हयात प्रमाणपत्रासाठी नोंदणी होणार आहे. यासाठी कागदपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार उद्यापासून होणार सुरू; पुणेकरांनो, 'उत्साहासोबत जबाबदारीचेही भान ठेवा' पोस्टाच्या ॲपवर नोंदणी पोस्टाच्या ॲपवर आधारकार्ड आणि पेन्शन पासबुक क्रमांकावरून ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा बायोमेट्रिक मशिनवर थम्ब इम्प्रेशन येत नाही. त्यावेळी आय स्कॅनिंग करून ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोनामुळे पेन्शनर्ससाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. उद्या आम्हीही पेन्शनर्स होणार आहोत. रुटिन काम तर सर्वच करतात. परंतु ज्येष्ठांची सेवा केल्याचे समाधान वाटते.  - बी. पी. एरंडे, सीनियर पोस्ट मास्तर, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 4, 2020

पोस्टाच्या सेवेमुळे पेन्शनर्स भारावले; घरी जाऊन डिजिटल हयात प्रमाणपत्राची नोंदणी पुणे - ‘वयाच्या चौदाव्या वर्षी पोस्टात नोकरीस लागलो. त्यावेळी माझ्याकडे तार वाटपाचे काम होते. नंतर परीक्षा देऊन ‘टेलिफोन एक्‍स्चेंज’मध्ये नोकरी लागली आणि टेलिफोन मेकॅनिक म्हणून सेवा बजावली. येत्या डिसेंबरमध्ये वयाचे नव्वद वर्षे पूर्ण होतील. सेवानिवृत्त होऊनही आता ३० वर्षे झाली. वयोमानानुसार पोस्टातही जाणे शक्‍य होत नाही. परंतु ‘जीपीओ’च्या कर्मचाऱ्यांनी घरी येऊन डिजिटल हयात प्रमाणपत्राची नोंदणी केली. याचा मनापासून आनंद झाला,’’ असे सेवानिवृत्त कर्मचारी दत्तात्रेय घोलप यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टपाल खात्याकडून रुग्णालयात किंवा अंथरुणावर खिळून असलेल्या पोस्ट आणि टेलिकॉम कार्यालयातील पेन्शनर्सना घरी अथवा रुग्णालयात जाऊन डिजिटल हयात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. ऐंशी वर्षापुढील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे पेन्शनची रक्‍कम वेळेवर मिळणार आहे. धक्कादायक : नवरा- बायकोच्या भांडणात वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा बळी पोस्ट आणि टेलिकॉम खात्यातील पेन्शनर्सना दरवर्षी हयात प्रमाणपत्र दाखल सादर करावे लागते. शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे शक्‍य होत नाही. अशा पेन्शनर्सना घरी जाऊन हयात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. एक नोव्हेंबरपासून इतर पेन्शनर्सना स्वारगेटजवळ लोकमान्य नगर, मार्केटयार्ड आणि शिवाजीनगर तीन डिव्हिजनसह जवळच्या पोस्ट कार्यालयात हयात प्रमाणपत्रासाठी नोंदणी होणार आहे. यासाठी कागदपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार उद्यापासून होणार सुरू; पुणेकरांनो, 'उत्साहासोबत जबाबदारीचेही भान ठेवा' पोस्टाच्या ॲपवर नोंदणी पोस्टाच्या ॲपवर आधारकार्ड आणि पेन्शन पासबुक क्रमांकावरून ऑनलाइन नोंदणी करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांचा बायोमेट्रिक मशिनवर थम्ब इम्प्रेशन येत नाही. त्यावेळी आय स्कॅनिंग करून ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. कोरोनामुळे पेन्शनर्ससाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. उद्या आम्हीही पेन्शनर्स होणार आहोत. रुटिन काम तर सर्वच करतात. परंतु ज्येष्ठांची सेवा केल्याचे समाधान वाटते.  - बी. पी. एरंडे, सीनियर पोस्ट मास्तर, पुणे Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/33ry3ZY

No comments:

Post a Comment