दिल्लीतील शाळा महिनाअखेरपर्यंत बंदच नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना संक्रमणामुळे सर्व सरकारी आणि खासगी शाळा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्येही शाळा सुरू करता येतील का? याबद्दल शंका व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  प्रशासकीय आणि जनजागृती या दोन्ही आघाड्यांवर वायू प्रदूषणाविरुद्ध एक महामोहीम सुरू करण्याची घोषणा आज केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याने या महिनाअखेरपर्यंत शाळा बंद राहतील असे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज जाहीर केले. ऑनलाइन वर्ग सुरू आहेत त्यांना त्याची व्याप्ती वाढविण्याचा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज सापडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मागच्या २४ तासात २२५८ नवे रुग्ण आढळले आणि ३४ कोरोना बाधितांचामृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त म्हणजे ३४४० आहे ही दिलाशाची बाब असली तरी, दिल्ली सरकारने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. दिल्लीतील सध्याची एकूण रुग्ण संख्या  २,८७,९३० आहे त्यापैकी २,५७,२२४ जणांनी कोरोनावर मात केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप प्रदूषणाविरुद्ध महामोहीम दर वर्षी हिवाळ्यात होणाऱ्या विषारी धुराच्या प्रदूषणातून दिल्लीला  मुक्त करण्यासाठी केजरीवाल सरकारने महामोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या सकाळी ११ वाजता परिवहन, महापालिका, पोलिस विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दिवाळीत फटाक्यांचा धूर करू नये, तसेच प्रदूषण वाढविणाऱ्या गोष्टी लोकांनी टाळाव्यात यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. दिल्लीच्या आसपास असलेली ११ विद्युतनिर्मिती केंद्रे आणि सुमारे २ हजार वीटभट्ट्या यांचाही  दिल्लीच्या प्रदूषणात वाटा असतो. त्यादृष्टीनेही केजरीवाल सरकार उपाययोजना करणार आहे. शेतातील काडीकचरा शेतातच जाळू नये यासाठी त्याचे खत करण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्मिती करण्यासाठी दिल्लीजवळ खराला येथे राज्य सरकारच्या पुढाकाराने रसायन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, October 4, 2020

दिल्लीतील शाळा महिनाअखेरपर्यंत बंदच नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना संक्रमणामुळे सर्व सरकारी आणि खासगी शाळा ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्येही शाळा सुरू करता येतील का? याबद्दल शंका व्यक्त केली जाते. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  प्रशासकीय आणि जनजागृती या दोन्ही आघाड्यांवर वायू प्रदूषणाविरुद्ध एक महामोहीम सुरू करण्याची घोषणा आज केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिल्लीत कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढू लागल्याने या महिनाअखेरपर्यंत शाळा बंद राहतील असे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज जाहीर केले. ऑनलाइन वर्ग सुरू आहेत त्यांना त्याची व्याप्ती वाढविण्याचा सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  दिल्लीमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज सापडण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. मागच्या २४ तासात २२५८ नवे रुग्ण आढळले आणि ३४ कोरोना बाधितांचामृत्यू झाला. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त म्हणजे ३४४० आहे ही दिलाशाची बाब असली तरी, दिल्ली सरकारने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे पुन्हा आवाहन केले आहे. दिल्लीतील सध्याची एकूण रुग्ण संख्या  २,८७,९३० आहे त्यापैकी २,५७,२२४ जणांनी कोरोनावर मात केल्याचे सरकारचे म्हणणे आहे. काँग्रेसला उत्तर प्रदेशात जातीय दंगली घडवायचीय; योगींचा गंभीर आरोप प्रदूषणाविरुद्ध महामोहीम दर वर्षी हिवाळ्यात होणाऱ्या विषारी धुराच्या प्रदूषणातून दिल्लीला  मुक्त करण्यासाठी केजरीवाल सरकारने महामोहीम सुरू करण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्या सकाळी ११ वाजता परिवहन, महापालिका, पोलिस विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. दिवाळीत फटाक्यांचा धूर करू नये, तसेच प्रदूषण वाढविणाऱ्या गोष्टी लोकांनी टाळाव्यात यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहे. दिल्लीच्या आसपास असलेली ११ विद्युतनिर्मिती केंद्रे आणि सुमारे २ हजार वीटभट्ट्या यांचाही  दिल्लीच्या प्रदूषणात वाटा असतो. त्यादृष्टीनेही केजरीवाल सरकार उपाययोजना करणार आहे. शेतातील काडीकचरा शेतातच जाळू नये यासाठी त्याचे खत करण्यासाठी आवश्यक असलेल्या निर्मिती करण्यासाठी दिल्लीजवळ खराला येथे राज्य सरकारच्या पुढाकाराने रसायन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना ते विनामूल्य उपलब्ध करून देण्याची योजना आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/36D6miZ

No comments:

Post a Comment