सावंतवाडीत विनामास्क लोकांना प्रशासनाचा हिसका सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाने लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली असली मास्क न वापरणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला तरी काही जणांकडून मास्क खिशात काढून ठेवण्यात येत आहे. गेल्या पाच महिन्यात स्थानिक वाहतूक पोलिसांकडून तब्बल 89 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.  मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय यांना फटका बसला आहे. सुरवातीला सोशल डिस्टनन्सिंग आणि मास्कचा वापर नागरिकांमध्ये होताना दिसून येत होता. कोरोनाची भीती असल्यामुळे बरेच नागरिक घराबाहेरही पडत नव्हते. जनता कर्फ्यू, लॉकडाऊन केल्यानंतर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसून येत होते; मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये नागरिकांमध्ये लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथिल झाल्यानंतर विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. स्थानिक वाहतूक पोलिसांकडून इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच मास्कचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 90 हजाराचा दंडही आकारण्यात आला आहे.  सर्वाधिक कारवाईही ऑक्‍टोबरमध्येच केली असून गेल्या अवघ्या पंधरा दिवसात वाहतूक पोलिसांनी 38 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मार्चपासून आतापर्यंतची ही सर्वाधिक कारवाई झाली असून पुढील पंधरा दिवसात आणखी कारवाई होणार असल्याने सर्वांत जास्त कारवाई या महिन्यात झाल्याचे ठळक दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसात 200 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये 110 जणांवर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई केली असून तब्बल 20 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलीस उन्हातानात विचार न करता शहरांमध्ये विना मास्क करणाऱ्यांवरही कारवाई करत आहेत. यासोबतच काही पालिका कर्मचाऱ्यांकडूनही कारवाई करण्यात येत आहे.  लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर जूनमध्ये तब्बल 123 जणांवर कारवाई करत 24 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला होता. मे आणि ऑगस्टमध्ये वाहतूक पोलिसांकडून फारशी कारवाई झाली नाही. यावरून या दोन महिन्यात नागरिकांकडून मास्क वापरणाऱ्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते; मात्र संपूर्ण अनलॉक झाल्यानंतर आता नागरिक मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहेत. प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम आणि सध्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत त्यांच्याही मार्गदर्शनातून येथील शहरातही वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई केली आहे.  महिना*गुन्हे*दंड  मे*3*600  जून*123*24700  जुलै*51*4800  ऑगस्ट*3*600  सप्टेंबर*106*20700  ऑक्‍टोबर*200*38400  एकूण*559*89800    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 19, 2020

सावंतवाडीत विनामास्क लोकांना प्रशासनाचा हिसका सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गेल्या काही दिवसात कोरोना व्हायरच्या प्रादुर्भावाने लागण झालेल्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात घटली असली मास्क न वापरणाऱ्यांच्या संख्येत मात्र वाढ होत आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला तरी काही जणांकडून मास्क खिशात काढून ठेवण्यात येत आहे. गेल्या पाच महिन्यात स्थानिक वाहतूक पोलिसांकडून तब्बल 89 हजार 800 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.  मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगधंदे, व्यवसाय यांना फटका बसला आहे. सुरवातीला सोशल डिस्टनन्सिंग आणि मास्कचा वापर नागरिकांमध्ये होताना दिसून येत होता. कोरोनाची भीती असल्यामुळे बरेच नागरिक घराबाहेरही पडत नव्हते. जनता कर्फ्यू, लॉकडाऊन केल्यानंतर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होताना दिसून येत होते; मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये नागरिकांमध्ये लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथिल झाल्यानंतर विना मास्क फिरणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. स्थानिक वाहतूक पोलिसांकडून इतर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासोबतच मास्कचा वापर करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये आतापर्यंत 90 हजाराचा दंडही आकारण्यात आला आहे.  सर्वाधिक कारवाईही ऑक्‍टोबरमध्येच केली असून गेल्या अवघ्या पंधरा दिवसात वाहतूक पोलिसांनी 38 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला आहे. मार्चपासून आतापर्यंतची ही सर्वाधिक कारवाई झाली असून पुढील पंधरा दिवसात आणखी कारवाई होणार असल्याने सर्वांत जास्त कारवाई या महिन्यात झाल्याचे ठळक दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसात 200 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये 110 जणांवर मास्क न वापरल्याप्रकरणी कारवाई केली असून तब्बल 20 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक पोलीस उन्हातानात विचार न करता शहरांमध्ये विना मास्क करणाऱ्यांवरही कारवाई करत आहेत. यासोबतच काही पालिका कर्मचाऱ्यांकडूनही कारवाई करण्यात येत आहे.  लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर जूनमध्ये तब्बल 123 जणांवर कारवाई करत 24 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला होता. मे आणि ऑगस्टमध्ये वाहतूक पोलिसांकडून फारशी कारवाई झाली नाही. यावरून या दोन महिन्यात नागरिकांकडून मास्क वापरणाऱ्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते; मात्र संपूर्ण अनलॉक झाल्यानंतर आता नागरिक मास्कशिवाय फिरताना दिसून येत आहेत. प्रशासनाकडून तसेच पोलिसांकडून कोरोना व्हायरसचा पुन्हा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम आणि सध्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत त्यांच्याही मार्गदर्शनातून येथील शहरातही वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई केली आहे.  महिना*गुन्हे*दंड  मे*3*600  जून*123*24700  जुलै*51*4800  ऑगस्ट*3*600  सप्टेंबर*106*20700  ऑक्‍टोबर*200*38400  एकूण*559*89800    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3khC4pY

No comments:

Post a Comment