भात लागले तरंगू, भुईमूगाला आले कोंब आजरा : आजरा तालुक्‍यात परतीच्या पावसाचा दणका सुरुच आहे. तालुक्‍यात बारा तासात सरासरी 56.6 मिमी पाऊस झाला. उतूरमध्ये तर काल सोमवार (ता.26) मध्यरात्री कोसळलेल्या पावसाने चांगलीच दैना उडवली. सहा तासात ढग फुटीसदृश्‍य 113 मिली मिटर पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे भात कापणी व भुईमुग काढणी ठप्प झाली असून शेतात कापून ठेवलेल्या भाताच्या कोवळ्या शेतवडीत साचलेल्या पाण्यात तरंगत आहेत. तालुक्‍यात भात कापणी पन्नास टक्के झाली असून उर्वरीत सुगी अडचणीत आली आहे.  तालुक्‍यात भुईमुग काढणीचे काम वेगाने सुरु आहे, पण पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने भुईमूग काढणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे शेंगांना कोंब उगवले आहेत. शेंगा वाळवण्यात उन्हाची अडचण असल्याने शेंगाना भुरी येवू लागली आहे.  धुळवाफ व कुरीची कापणी अंतिम टप्प्यात आहेत. रोपलावणीच्या भात कापणीला सुरवात झाली आहे, पण तालुक्‍यात परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. त्यामुळे भात कापणी, मळणीची कामे अडचणीत आली आहेत. सकाळी उन्हं पडले, तर संध्याकाळी पावसाला सुरवात होते. त्यामुळे सुगीची कामे कशी उरकावयाची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न आहे. गेले आठ दिवस तालुक्‍यात परतीचा पाऊस जोरात सुरू आहे. निम गरवी भाते कापणीला आली असून पावसाच्या माऱ्याने दाणे गळून पडत आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे कापलेल्या भाताच्या कोवळ्या पाण्यावर तरंगत आहेत. त्याचबरोबर गवत ही भिजले असून जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे.  पंचनाम्याला सुरवात  तालुक्‍यात पावसाने भात, भूईमुग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून 98 गावात पिकांच्या पंचनाम्याला सुरवात झाली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक पंचनाम्याच्या कामात व्यस्त आहेत.    संपादन - सचिन चराटी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 27, 2020

भात लागले तरंगू, भुईमूगाला आले कोंब आजरा : आजरा तालुक्‍यात परतीच्या पावसाचा दणका सुरुच आहे. तालुक्‍यात बारा तासात सरासरी 56.6 मिमी पाऊस झाला. उतूरमध्ये तर काल सोमवार (ता.26) मध्यरात्री कोसळलेल्या पावसाने चांगलीच दैना उडवली. सहा तासात ढग फुटीसदृश्‍य 113 मिली मिटर पाऊस झाला. दरम्यान, पावसामुळे भात कापणी व भुईमुग काढणी ठप्प झाली असून शेतात कापून ठेवलेल्या भाताच्या कोवळ्या शेतवडीत साचलेल्या पाण्यात तरंगत आहेत. तालुक्‍यात भात कापणी पन्नास टक्के झाली असून उर्वरीत सुगी अडचणीत आली आहे.  तालुक्‍यात भुईमुग काढणीचे काम वेगाने सुरु आहे, पण पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने भुईमूग काढणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे शेंगांना कोंब उगवले आहेत. शेंगा वाळवण्यात उन्हाची अडचण असल्याने शेंगाना भुरी येवू लागली आहे.  धुळवाफ व कुरीची कापणी अंतिम टप्प्यात आहेत. रोपलावणीच्या भात कापणीला सुरवात झाली आहे, पण तालुक्‍यात परतीच्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला आहे. त्यामुळे भात कापणी, मळणीची कामे अडचणीत आली आहेत. सकाळी उन्हं पडले, तर संध्याकाळी पावसाला सुरवात होते. त्यामुळे सुगीची कामे कशी उरकावयाची हा शेतकऱ्यांसमोर प्रश्‍न आहे. गेले आठ दिवस तालुक्‍यात परतीचा पाऊस जोरात सुरू आहे. निम गरवी भाते कापणीला आली असून पावसाच्या माऱ्याने दाणे गळून पडत आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे कापलेल्या भाताच्या कोवळ्या पाण्यावर तरंगत आहेत. त्याचबरोबर गवत ही भिजले असून जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे.  पंचनाम्याला सुरवात  तालुक्‍यात पावसाने भात, भूईमुग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून 98 गावात पिकांच्या पंचनाम्याला सुरवात झाली आहे. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक पंचनाम्याच्या कामात व्यस्त आहेत.    संपादन - सचिन चराटी News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jBLGdI

No comments:

Post a Comment