"इझी मनी'च्या हव्यासापोटी तरुणाई वाममार्गाकडे सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव येथील गीतांजली मळगावकर घातपात प्रकरण "इझी मनी' आणि त्याच्या दुष्परिणामांच्या भयानक वास्तवाला सावंतवाडीसारख्या सुसंस्कृत शहरात वाचा फोडणारे ठरले आहे. या प्रकरणाचा थेट संबंध नसला तरी या निमित्ताने बेकायदा दारू वाहतूक आणि त्यात ओढल्या गेलेल्या तरुण पिढीकडे बोट दाखवले जात आहे. शहराच्या संस्कृतीमध्ये निर्माण झालेले प्रदूषण पुढे आले आहे. अशा गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांसह हे प्रकार रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस व इतर यंत्रणेनेही यावर विचार करण्याची वेळ आली आहे.  घरकाम करणाऱ्या गीतांजली मळगावकर यांच्या बेपत्ता प्रकरणापासून या सगळ्याची सुरवात झाली. आंबोली घाटात एका महिलेचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह सापडला. याचा शोध मळगावकर बेपत्ता प्रकरणाकडे येऊन थांबला. यात सावंतवाडी परिसरातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बाहेर आलेले वास्तव सुसंस्कृत सावंतवाडीला हादरा देणारे ठरले. या प्रकरणात दोघे अल्पवयीन आणि अन्य दोघे तरुण आहेत. मळगावकर यांचे वय 48च्या दरम्यान होते. हे चौघेही मळगावकर यांना घेऊन फिरायला गेले होते. कोलगावच्या जंगलात यातील मुख्य संशयिताशी अनैतिक संबंधादरम्यान मळगावकर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. इतक्‍या कमी वयाच्या संशयितांना असे दुर्गुण का सुचावे? याचे उत्तर "इझी मनी'मध्ये आहे. त्यांच्याकडे सहजगत्या सहा-सात लाखांची गाडी उपलब्ध होती.  या सगळ्या प्रकरणामुळे अवैध दारू वाहतुकीतून तरुण पिढीकडे येत असलेल्या "इझी मनी'चा विषय चर्चेला आला आहे. यातील संशयितांचा अशा गुन्ह्यात समावेश होता का? हा तपासाचा भाग आहे. कदाचित नसेलही; मात्र अशा प्रकारांसाठी त्यांच्याकडे पैसा आला कोठून, हा तर प्रश्‍न आहेच.  या प्रकरणाच्या निमित्ताने अवैध दारूचे विष सावंतवाडी परिसरात किती वाईट पद्धतीने पसरले आहे, याचा कानोसा घेतल्यास सुसंस्कृत सावंतवाडीची मान शरमेने खाली जाईल, अशी स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यातून पूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीची पाळेमुळे बांदा, सावंतवाडी, माणगाव आदी भागांत पसरली आहेत. यात प्रामुख्याने तरुणांना टार्गेट केले जात आहे. हे नेटवर्क समजून घेतल्यास या तरुणांचा कसा वापर होतो हे लक्षात येईल. प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये बेकायदा दारू वाहतुकीसाठी छोट्या मोटारी वापरल्या जातात. बरीचशी सुरक्षा यंत्रणा हप्ते देऊन बांधलेली असते. दारू वाहतुकीसाठी मोटारी उपलब्ध असतात; पण ती चालवायला कोणीतरी लागतो. अशा वेळी पैशाच्या मागे असलेल्या तरुणांना हेरून त्यांना यात अडकवले जाते.  अगदी 18 ते 25 वर्षांची अनेक मुले यात गुरफटली आहेत. गोव्यातून सुरू होणारा अशा गाडीचा प्रवास 70-80 किलोमीटरचाच असतो. याच्या बदल्यात त्यांना दोन-तीन हजार दिले जातात. शिवाय दारू आणि इतर शौक पुरवण्याचे गाजरही दाखवले जाते. अनेक जण नशेत बेदरकारपणे गाड्या चालवतात. यातून अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.  असे सहज पैसे मिळू लागले, की ते खर्च करण्यासाठी नको ते मार्ग दिसू लागतात. हे तरुण अनैतिक कृत्य करणाऱ्यांच्याच संपर्कात असतात. त्यामुळे तेच त्यांना आयडॉल वाटू लागतात. तेही तशा पद्धतीने वागण्याच्या नादात नको त्या चैनीकडे वळतात. यातून कितीतरी अनैतिक प्रकार घडत आहेत. यातील काही घटना उघडही होत नाहीत. पालकांना आपला पाल्य वाईट मार्गाला लागला हे समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.  या सगळ्याला जबाबदार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर शोधणे कठीण आहे; मात्र अवैध दारू वाहतूक थोपवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर विचार करण्याची वेळ आली आहे. या आधी या यंत्रणेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची बरीच चर्चा झाली आहे. काही पोलिस यातून निलंबितही झाले आहेत; मात्र दारू वाहतूक थांबलेली नाही. उलट ती वाढतच आहे. आतापर्यंत दारू पिणाऱ्यांपुरते याचे दुष्परिणाम अवलंबून असल्याचा समज होता; पण आता तरुण पिढी यामुळे बरबाद होत आहे. याला आळा घालण्याची गरज आहे. असे धंदे उखडून टाकल्यास सामाजिक प्रदूषण कमी करता येणार आहे. यासाठी तपासी यंत्रणांची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गाच्या नव्या पोलिस अधीक्षकांकडून आता याबाबत जिल्हावासीयांच्या अपेक्षा आहेत.  आंबोली घाटात आढळलेल्या "त्या' महिलेचे खून प्रकरण अवैध धंद्याशी थेट जोडता येत नाही. याबाबत तपास सुरू आहे. शहरातील अवैध धंदे आणि गोवा बनावटीच्या दारूचा विचार केल्यास कारवाईचे सत्र सुरूच आहे.  - शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 5, 2020

"इझी मनी'च्या हव्यासापोटी तरुणाई वाममार्गाकडे सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - मळगाव येथील गीतांजली मळगावकर घातपात प्रकरण "इझी मनी' आणि त्याच्या दुष्परिणामांच्या भयानक वास्तवाला सावंतवाडीसारख्या सुसंस्कृत शहरात वाचा फोडणारे ठरले आहे. या प्रकरणाचा थेट संबंध नसला तरी या निमित्ताने बेकायदा दारू वाहतूक आणि त्यात ओढल्या गेलेल्या तरुण पिढीकडे बोट दाखवले जात आहे. शहराच्या संस्कृतीमध्ये निर्माण झालेले प्रदूषण पुढे आले आहे. अशा गोष्टींना खतपाणी घालणाऱ्यांसह हे प्रकार रोखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस व इतर यंत्रणेनेही यावर विचार करण्याची वेळ आली आहे.  घरकाम करणाऱ्या गीतांजली मळगावकर यांच्या बेपत्ता प्रकरणापासून या सगळ्याची सुरवात झाली. आंबोली घाटात एका महिलेचा कुजलेल्या स्थितीतील मृतदेह सापडला. याचा शोध मळगावकर बेपत्ता प्रकरणाकडे येऊन थांबला. यात सावंतवाडी परिसरातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बाहेर आलेले वास्तव सुसंस्कृत सावंतवाडीला हादरा देणारे ठरले. या प्रकरणात दोघे अल्पवयीन आणि अन्य दोघे तरुण आहेत. मळगावकर यांचे वय 48च्या दरम्यान होते. हे चौघेही मळगावकर यांना घेऊन फिरायला गेले होते. कोलगावच्या जंगलात यातील मुख्य संशयिताशी अनैतिक संबंधादरम्यान मळगावकर यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. इतक्‍या कमी वयाच्या संशयितांना असे दुर्गुण का सुचावे? याचे उत्तर "इझी मनी'मध्ये आहे. त्यांच्याकडे सहजगत्या सहा-सात लाखांची गाडी उपलब्ध होती.  या सगळ्या प्रकरणामुळे अवैध दारू वाहतुकीतून तरुण पिढीकडे येत असलेल्या "इझी मनी'चा विषय चर्चेला आला आहे. यातील संशयितांचा अशा गुन्ह्यात समावेश होता का? हा तपासाचा भाग आहे. कदाचित नसेलही; मात्र अशा प्रकारांसाठी त्यांच्याकडे पैसा आला कोठून, हा तर प्रश्‍न आहेच.  या प्रकरणाच्या निमित्ताने अवैध दारूचे विष सावंतवाडी परिसरात किती वाईट पद्धतीने पसरले आहे, याचा कानोसा घेतल्यास सुसंस्कृत सावंतवाडीची मान शरमेने खाली जाईल, अशी स्थिती आहे. गेल्या काही वर्षांत गोव्यातून पूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीची पाळेमुळे बांदा, सावंतवाडी, माणगाव आदी भागांत पसरली आहेत. यात प्रामुख्याने तरुणांना टार्गेट केले जात आहे. हे नेटवर्क समजून घेतल्यास या तरुणांचा कसा वापर होतो हे लक्षात येईल. प्रामुख्याने सिंधुदुर्ग आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये बेकायदा दारू वाहतुकीसाठी छोट्या मोटारी वापरल्या जातात. बरीचशी सुरक्षा यंत्रणा हप्ते देऊन बांधलेली असते. दारू वाहतुकीसाठी मोटारी उपलब्ध असतात; पण ती चालवायला कोणीतरी लागतो. अशा वेळी पैशाच्या मागे असलेल्या तरुणांना हेरून त्यांना यात अडकवले जाते.  अगदी 18 ते 25 वर्षांची अनेक मुले यात गुरफटली आहेत. गोव्यातून सुरू होणारा अशा गाडीचा प्रवास 70-80 किलोमीटरचाच असतो. याच्या बदल्यात त्यांना दोन-तीन हजार दिले जातात. शिवाय दारू आणि इतर शौक पुरवण्याचे गाजरही दाखवले जाते. अनेक जण नशेत बेदरकारपणे गाड्या चालवतात. यातून अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.  असे सहज पैसे मिळू लागले, की ते खर्च करण्यासाठी नको ते मार्ग दिसू लागतात. हे तरुण अनैतिक कृत्य करणाऱ्यांच्याच संपर्कात असतात. त्यामुळे तेच त्यांना आयडॉल वाटू लागतात. तेही तशा पद्धतीने वागण्याच्या नादात नको त्या चैनीकडे वळतात. यातून कितीतरी अनैतिक प्रकार घडत आहेत. यातील काही घटना उघडही होत नाहीत. पालकांना आपला पाल्य वाईट मार्गाला लागला हे समजेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.  या सगळ्याला जबाबदार कोण? या प्रश्‍नाचे उत्तर शोधणे कठीण आहे; मात्र अवैध दारू वाहतूक थोपवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर विचार करण्याची वेळ आली आहे. या आधी या यंत्रणेत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची बरीच चर्चा झाली आहे. काही पोलिस यातून निलंबितही झाले आहेत; मात्र दारू वाहतूक थांबलेली नाही. उलट ती वाढतच आहे. आतापर्यंत दारू पिणाऱ्यांपुरते याचे दुष्परिणाम अवलंबून असल्याचा समज होता; पण आता तरुण पिढी यामुळे बरबाद होत आहे. याला आळा घालण्याची गरज आहे. असे धंदे उखडून टाकल्यास सामाजिक प्रदूषण कमी करता येणार आहे. यासाठी तपासी यंत्रणांची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्गाच्या नव्या पोलिस अधीक्षकांकडून आता याबाबत जिल्हावासीयांच्या अपेक्षा आहेत.  आंबोली घाटात आढळलेल्या "त्या' महिलेचे खून प्रकरण अवैध धंद्याशी थेट जोडता येत नाही. याबाबत तपास सुरू आहे. शहरातील अवैध धंदे आणि गोवा बनावटीच्या दारूचा विचार केल्यास कारवाईचे सत्र सुरूच आहे.  - शशिकांत खोत, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30xO5Q4

No comments:

Post a Comment