सिंधुदुर्गातील प्रश्नांकडे महसूलमंत्र्यांचे वेधले लक्ष सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील विविध महत्वाच्या प्रश्‍नांवर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधत चर्चा केली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य येण्यासाठी महसूलमंत्र्यांना सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण त्यांनी दिले. श्री. थोरात यांनी जिल्हा दौऱ्यावर येण्याचे मान्य केले आहे.  श्री. गावडे यांनी नुकतीच मंत्रालयात श्री. थोरात यांची भेट घेतली. दरम्यान, नारायण राणे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जिल्हा कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी बाळा गावडे सक्रिय आहेत. उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने निष्ठावंतांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान गावडे यांनी पेलले आहे. गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या अल्प कालावधीत पक्षासाठी केलेले काम आणि धडपड पाहून जिल्ह्याला क्रियाशील जिल्हाध्यक्ष मिळाल्याचे गौरवोद्वार प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी काढले. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघही कॉंग्रेस पक्ष काबीज करेल आणि सावंतवाडीत आमदारही कॉंग्रेससाच असेल, असा विश्‍वास गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख उपस्थित होते.  विविध विषय चर्चेत  यावेळी झालेल्या चर्चेत आंबोली, चौकुळ, गेळे येथील समस्या व धनगर समाजाचे प्रश्‍न, शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज ग्रुपच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये अन्याय न होता स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याविषयी, स्थानिक शेतकऱ्यांबाबत, मच्छीमाऱ्यांचे प्रश्‍न या सर्वांविषयी महसूलमंत्र्यांशी चर्चा केली. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 5, 2020

सिंधुदुर्गातील प्रश्नांकडे महसूलमंत्र्यांचे वेधले लक्ष सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यातील विविध महत्वाच्या प्रश्‍नांवर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधत चर्चा केली. कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य येण्यासाठी महसूलमंत्र्यांना सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण त्यांनी दिले. श्री. थोरात यांनी जिल्हा दौऱ्यावर येण्याचे मान्य केले आहे.  श्री. गावडे यांनी नुकतीच मंत्रालयात श्री. थोरात यांची भेट घेतली. दरम्यान, नारायण राणे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर जिल्हा कॉंग्रेसला उभारी देण्यासाठी बाळा गावडे सक्रिय आहेत. उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने निष्ठावंतांना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान गावडे यांनी पेलले आहे. गावडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाच्या अल्प कालावधीत पक्षासाठी केलेले काम आणि धडपड पाहून जिल्ह्याला क्रियाशील जिल्हाध्यक्ष मिळाल्याचे गौरवोद्वार प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी काढले. त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघही कॉंग्रेस पक्ष काबीज करेल आणि सावंतवाडीत आमदारही कॉंग्रेससाच असेल, असा विश्‍वास गावडे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा प्रवक्ते इर्शाद शेख उपस्थित होते.  विविध विषय चर्चेत  यावेळी झालेल्या चर्चेत आंबोली, चौकुळ, गेळे येथील समस्या व धनगर समाजाचे प्रश्‍न, शिरोडा वेळागर येथील नियोजित ताज ग्रुपच्या पंचतारांकीत हॉटेलमध्ये अन्याय न होता स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याविषयी, स्थानिक शेतकऱ्यांबाबत, मच्छीमाऱ्यांचे प्रश्‍न या सर्वांविषयी महसूलमंत्र्यांशी चर्चा केली. संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2F4TSoT

No comments:

Post a Comment