तरुणांनो कोव्हिडला हलक्यात घेऊ नका! 40 वर्षाखालील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; तापाकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात मुंबई  : 40 वर्षांखालील तरुणांना कोव्हिडच्या लक्षणांकडे दुर्लक्षित करणे महागात पडू शकते. कारण, ज्या तरुणांनी कोव्हिडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन स्वत:च घरगुती पद्धतीने उपचार केले त्यांची संख्या रुग्णालयातील आययीसूमध्ये असलेल्या 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे असे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कामात दिरंगाई खपवून नाही घेणार; आयुक्त बांगर यांचे आरोग्य विभागाला दमवजा सूचना अंधेरी इथे राहणाऱ्या 40 वर्षाखालील एका व्यक्तीवर वांद्रे येथील लिलावती रुग्णालयातील आयसीयूमध्ये 27 सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत. त्याला 16 सप्टेंबरपासून ताप येत असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. आणि तो त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेत होता. त्याच्या 10 दिवसांनंतर जेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला तेव्हा त्याने कोव्हिड 19 ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्याचा आजार बळावला होता. आणि त्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करुन उपचार घ्यावे लागत आहेत. लिलावती रुग्णालयातील ज्येष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी सांगितलं की, जेव्हा त्याला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती फारच नाजूक होती. शिवाय, त्याच्या ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी झाली होती. त्याचा सिटीस्कॅन काढल्यानंतर फुप्फुसाला व्हायरसचा मोठा परिणाम झाला होता. त्याला तात्काळ आयसीयूमध्ये पाठवलं आणि हाय फ्लो नेझल ऑक्सिजन थेरेपी आणि रेमेडेसिवीर दिली. त्याला 10 दिवसांपासून ताप आहे हे जेव्हा त्याच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितलं तेव्हा धक्का बसला आणि तरी देखील त्याने कोविड 19 ची चाचणी करुन घेतली नव्हती. त्याच्या कुटुंबियांना असं वाटलं की त्याला श्वास घ्यायला त्रास होत नाही म्हणजे कोव्हिड नसून व्हायरल फिवर असेल म्हणून कुटुंबाने ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हाथरस प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांना उत्तरप्रदेशात पाठवा; शिवसेना आमदाराची मागणी डॉ. नागवेकरांचे असे म्हणणे आहे की, ही एकमेव अशी केस नाही. असे बरेचसे रुग्ण आहेत जे 40 वर्षे वयोगटाच्या खाली आहेत जे कोव्हिडला हलक्यात घेऊन आयसीयूमध्ये दाखल होतात. लिलावती आणि ग्लोबल रुग्णालयाच्या आयसीयू बेड पैकी 35 टक्के बेड्स हे 40 वर्षांखालील तरुणांनी भरलेले आहेत. सुरुवातीच्या लॉकडाऊन मध्ये अशा केसेस आढळत नव्हत्या. हा मुद्दया जेव्हा कोव्हिड टास्कच्या बैठकीत मांडला गेला तेव्हा एका डॉक्टरने असे सांगितले की, 40 वर्षाखालील तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. तर, दुसऱ्या डॉक्टरने सांगितले की, 35 ते 45 वयोगटातील लोकांनी 30 टक्के आयसीयू बेड्स व्यापले आहेत. डॉ. नागवेकर सध्या 56 कोविड रुग्णांना लिलावती आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार देत आहेत. त्यानुसार, एक बाब स्पष्ट आहे की, या महामारीत प्रत्येक तापावर हा कोव्हिड19 म्हणून उपचार केले पाहिजे. चाचण्या करुन घेण्यासाठी उशीर करु नये. शिवाय, कोणत्याही तापावर स्वत: उपचार घेऊ नका. यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (आरोग्य) यांनी सांगितले की, 40 वर्षाखालील रुग्ण कोव्हिडच्या विळख्यात येण्याचे प्रमाण वाढले असून आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या महामारीला अनेक लोकांनी हतक्यात घेतले आहे. मास्क न घालणे, सोशल डिस्टस्टिंग न पाळणे अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. मास्क न घालणार्या 17 हजार 037 लोकांकडून सप्टेंबरपर्यंत पालिकेने 58 लाख रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे, आम्ही वारंवार लोकांना विनंती करत आहोत की विनाकारण घराबाहेर फिरु नका आणि काही लक्षणे आढळल्यास कोविड 19 ची चाचणी करुन घ्यावी. ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 2, 2020

तरुणांनो कोव्हिडला हलक्यात घेऊ नका! 40 वर्षाखालील रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ; तापाकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात मुंबई  : 40 वर्षांखालील तरुणांना कोव्हिडच्या लक्षणांकडे दुर्लक्षित करणे महागात पडू शकते. कारण, ज्या तरुणांनी कोव्हिडच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन स्वत:च घरगुती पद्धतीने उपचार केले त्यांची संख्या रुग्णालयातील आययीसूमध्ये असलेल्या 30 ते 40 टक्क्यांपर्यंत आहे असे काही वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कामात दिरंगाई खपवून नाही घेणार; आयुक्त बांगर यांचे आरोग्य विभागाला दमवजा सूचना अंधेरी इथे राहणाऱ्या 40 वर्षाखालील एका व्यक्तीवर वांद्रे येथील लिलावती रुग्णालयातील आयसीयूमध्ये 27 सप्टेंबरपासून उपचार सुरू आहेत. त्याला 16 सप्टेंबरपासून ताप येत असल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. आणि तो त्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक घेत होता. त्याच्या 10 दिवसांनंतर जेव्हा त्याला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला तेव्हा त्याने कोव्हिड 19 ची चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्याचा आजार बळावला होता. आणि त्याला थेट आयसीयूमध्ये दाखल करुन उपचार घ्यावे लागत आहेत. लिलावती रुग्णालयातील ज्येष्ठ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. वसंत नागवेकर यांनी सांगितलं की, जेव्हा त्याला रुग्णालयात आणलं गेलं तेव्हा त्याची प्रकृती फारच नाजूक होती. शिवाय, त्याच्या ऑक्सिजनची पातळी 93 टक्क्यांपेक्षा कमी झाली होती. त्याचा सिटीस्कॅन काढल्यानंतर फुप्फुसाला व्हायरसचा मोठा परिणाम झाला होता. त्याला तात्काळ आयसीयूमध्ये पाठवलं आणि हाय फ्लो नेझल ऑक्सिजन थेरेपी आणि रेमेडेसिवीर दिली. त्याला 10 दिवसांपासून ताप आहे हे जेव्हा त्याच्या कुटुंबियांनी आम्हाला सांगितलं तेव्हा धक्का बसला आणि तरी देखील त्याने कोविड 19 ची चाचणी करुन घेतली नव्हती. त्याच्या कुटुंबियांना असं वाटलं की त्याला श्वास घ्यायला त्रास होत नाही म्हणजे कोव्हिड नसून व्हायरल फिवर असेल म्हणून कुटुंबाने ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले. हाथरस प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांना उत्तरप्रदेशात पाठवा; शिवसेना आमदाराची मागणी डॉ. नागवेकरांचे असे म्हणणे आहे की, ही एकमेव अशी केस नाही. असे बरेचसे रुग्ण आहेत जे 40 वर्षे वयोगटाच्या खाली आहेत जे कोव्हिडला हलक्यात घेऊन आयसीयूमध्ये दाखल होतात. लिलावती आणि ग्लोबल रुग्णालयाच्या आयसीयू बेड पैकी 35 टक्के बेड्स हे 40 वर्षांखालील तरुणांनी भरलेले आहेत. सुरुवातीच्या लॉकडाऊन मध्ये अशा केसेस आढळत नव्हत्या. हा मुद्दया जेव्हा कोव्हिड टास्कच्या बैठकीत मांडला गेला तेव्हा एका डॉक्टरने असे सांगितले की, 40 वर्षाखालील तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. तर, दुसऱ्या डॉक्टरने सांगितले की, 35 ते 45 वयोगटातील लोकांनी 30 टक्के आयसीयू बेड्स व्यापले आहेत. डॉ. नागवेकर सध्या 56 कोविड रुग्णांना लिलावती आणि ग्लोबल रुग्णालयात उपचार देत आहेत. त्यानुसार, एक बाब स्पष्ट आहे की, या महामारीत प्रत्येक तापावर हा कोव्हिड19 म्हणून उपचार केले पाहिजे. चाचण्या करुन घेण्यासाठी उशीर करु नये. शिवाय, कोणत्याही तापावर स्वत: उपचार घेऊ नका. यावर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (आरोग्य) यांनी सांगितले की, 40 वर्षाखालील रुग्ण कोव्हिडच्या विळख्यात येण्याचे प्रमाण वाढले असून आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या महामारीला अनेक लोकांनी हतक्यात घेतले आहे. मास्क न घालणे, सोशल डिस्टस्टिंग न पाळणे अशा अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. मास्क न घालणार्या 17 हजार 037 लोकांकडून सप्टेंबरपर्यंत पालिकेने 58 लाख रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे, आम्ही वारंवार लोकांना विनंती करत आहोत की विनाकारण घराबाहेर फिरु नका आणि काही लक्षणे आढळल्यास कोविड 19 ची चाचणी करुन घ्यावी. ------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SiGcJM

No comments:

Post a Comment