सावंतवाडीत दोन लाखांचा दंड थकला सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत 4 लाख 68 हजार 900 एवढा दंड आकारला आहे; मात्र यातून 2 लाख 58 हजार 600 एवढाच दंड वसूल झाला असून 2 लाख 10 हजार एवढा दंड अद्यापही थकित आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर दरम्यान 2029 जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यापैकी 1 हजार 16 एवढ्या जणांनी आकारलेला दंड भरला आहे.  येथील पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतर्फे 1 जानेवारी ते 13 ऑक्‍टोबरमध्ये शहर व परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसविला आहे. दहा महिन्यांत तब्बल जवळपास साडेचार लाख रुपये एवढ्या दंडाची कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई वाहतूक परवाना सोबत न ठेवणाऱ्यांवर झाली आहे. आतापर्यंत 652 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांनी 1 लाख 30 हजार 400 एवढा दंड आकारला आहे. त्यापैकी 72 हजार रुपये दंड वसूल केला आहे. शहरामध्ये वाहन चालविताना वाहतूक परवाना सोबत नसणे, 16 वर्षांखालील अल्पवयीन युवकांकडून वाहन हाकणे, योग्य नंबर प्लेट न बसविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणे, वाहनाची कागदपत्रे सोबत न बाळगणे, काळ्या काचा बसवणे, भरधाव वेगाने गाडी हाकणे, ट्रिपल सीट गाडी हाकणे अशा विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते.  या कारवाईत 16 वर्षांखालील युवकांकडून वाहन हाकणे तसेच वाहतूक परवाना न काढणे आदी 132 जणांवर कारवाई शहर व परिसरामध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 65 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. वाहनाची कागदपत्रे सोबत न बाळगल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून तब्बल 253 जणांवर कारवाई झाली. यात 50 हजार 600 एवढा दंडही आकारण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांत मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर दरम्यान दोन ते तीन महिने लॉकडाउन व कर्फ्यू लागू झाल्याने शहर व परिसरात वाहतूक बंद असल्याने वाहन चालविणाऱ्याच्या संख्येत घट झाली होती; मात्र असे असतानाही शिथील झाल्यानंतर मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. वाहतूक पोलिसांकडून योग्य कामगिरी बजावत गेल्या महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांकडून चार लाख 68 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी 2 लाख 58 हजार 600 एवढा दंड वसुल करण्यात यश आले आहे. या कालावधीत पोलिसांकडून 2 हजार 29 एवढ्या जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 16 जणांनी केलेल्या कारवाईचा दंड भरला आहे. अद्यापपर्यंत 1 हजार 13 जणांनी केलेल्या कारवाईचा दंडच भरला नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये इतर केलेल्या कारवाईत पीयूसी मुदत संपल्याने 205 जणांवर कारवाई करण्यात आली असून 41 हजार रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावणाऱ्या 11 जणांवर कारवाई करण्यात आली असून 2 हजार 200 एवढा दंड आकारण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईतून 13 हजार 200 एवढा दंड गेल्या 10 महिन्यात आकारण्यात आला आहे.  कारवाईचे शिलेदार  वाहतूक पोलिसांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम तसेच सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्या तसेच येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे अंतर्गत पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सापळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील नाईक, पोलिस नाईक सखाराम भोई यांनी ही कारवाई केली आहे.  कारवाई*रक्कम*नागरिक  परवाना नसणे *1,30,400*652  अल्पवयीन युवक *65, 700*132  कागदपत्रे नसणे *50,600*253  पियुसी*41000*205  चुकीची नंबरप्लेट*2200*11  चुकी संबंधित*14600*76  ट्रिपल सिट*15800*79  भरधाव*10000*10  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 21, 2020

सावंतवाडीत दोन लाखांचा दंड थकला सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत आतापर्यंत 4 लाख 68 हजार 900 एवढा दंड आकारला आहे; मात्र यातून 2 लाख 58 हजार 600 एवढाच दंड वसूल झाला असून 2 लाख 10 हजार एवढा दंड अद्यापही थकित आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर दरम्यान 2029 जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यापैकी 1 हजार 16 एवढ्या जणांनी आकारलेला दंड भरला आहे.  येथील पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतर्फे 1 जानेवारी ते 13 ऑक्‍टोबरमध्ये शहर व परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसविला आहे. दहा महिन्यांत तब्बल जवळपास साडेचार लाख रुपये एवढ्या दंडाची कारवाई केली आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाई वाहतूक परवाना सोबत न ठेवणाऱ्यांवर झाली आहे. आतापर्यंत 652 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये वाहतूक पोलिसांनी 1 लाख 30 हजार 400 एवढा दंड आकारला आहे. त्यापैकी 72 हजार रुपये दंड वसूल केला आहे. शहरामध्ये वाहन चालविताना वाहतूक परवाना सोबत नसणे, 16 वर्षांखालील अल्पवयीन युवकांकडून वाहन हाकणे, योग्य नंबर प्लेट न बसविणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, चुकीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणे, वाहनाची कागदपत्रे सोबत न बाळगणे, काळ्या काचा बसवणे, भरधाव वेगाने गाडी हाकणे, ट्रिपल सीट गाडी हाकणे अशा विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येते.  या कारवाईत 16 वर्षांखालील युवकांकडून वाहन हाकणे तसेच वाहतूक परवाना न काढणे आदी 132 जणांवर कारवाई शहर व परिसरामध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 65 हजार 700 रुपये दंड आकारण्यात आला. वाहनाची कागदपत्रे सोबत न बाळगल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांकडून तब्बल 253 जणांवर कारवाई झाली. यात 50 हजार 600 एवढा दंडही आकारण्यात आला आहे.  गेल्या काही दिवसांत मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उघडण्यात आला आहे. जानेवारी ते ऑक्‍टोबर दरम्यान दोन ते तीन महिने लॉकडाउन व कर्फ्यू लागू झाल्याने शहर व परिसरात वाहतूक बंद असल्याने वाहन चालविणाऱ्याच्या संख्येत घट झाली होती; मात्र असे असतानाही शिथील झाल्यानंतर मात्र वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. वाहतूक पोलिसांकडून योग्य कामगिरी बजावत गेल्या महिन्यात केलेल्या कारवाईमध्ये पोलिसांकडून चार लाख 68 हजार 900 रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी 2 लाख 58 हजार 600 एवढा दंड वसुल करण्यात यश आले आहे. या कालावधीत पोलिसांकडून 2 हजार 29 एवढ्या जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 1 हजार 16 जणांनी केलेल्या कारवाईचा दंड भरला आहे. अद्यापपर्यंत 1 हजार 13 जणांनी केलेल्या कारवाईचा दंडच भरला नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये इतर केलेल्या कारवाईत पीयूसी मुदत संपल्याने 205 जणांवर कारवाई करण्यात आली असून 41 हजार रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने नंबर प्लेट लावणाऱ्या 11 जणांवर कारवाई करण्यात आली असून 2 हजार 200 एवढा दंड आकारण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईतून 13 हजार 200 एवढा दंड गेल्या 10 महिन्यात आकारण्यात आला आहे.  कारवाईचे शिलेदार  वाहतूक पोलिसांनी तत्कालीन पोलिस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम तसेच सध्याचे पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांच्या तसेच येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे अंतर्गत पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण सापळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनील नाईक, पोलिस नाईक सखाराम भोई यांनी ही कारवाई केली आहे.  कारवाई*रक्कम*नागरिक  परवाना नसणे *1,30,400*652  अल्पवयीन युवक *65, 700*132  कागदपत्रे नसणे *50,600*253  पियुसी*41000*205  चुकीची नंबरप्लेट*2200*11  चुकी संबंधित*14600*76  ट्रिपल सिट*15800*79  भरधाव*10000*10  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ogrGBa

No comments:

Post a Comment