बाऊन्सर नियुक्तीचा प्रस्ताव अखेर मागे; निविदांमध्ये घोटाळ्याचा भाजप, समाजवादीचा आरोप  मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने खासगी बाऊन्सर नियुक्त करण्याचा 32 कोटी रुपयांचा प्रस्ताव मागे घेतला आहे. या निविदा प्रक्रियेचा फेरविचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर 190 कोटी रुपयांची दुसरी निविदा प्रक्रियाही रद्द होण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही निविदांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप भाजपसह समाजवादी पक्षाने केला होता.  आदिवासींचे जव्हारमधून पोटापाण्यासाठी स्थलांतर; आर्थिक कोंडी कायम महानगरपालिकेचा स्वतःचा सुरक्षारक्षक विभाग असून, त्यात 3500 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत महानगरपालिका खासगी सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता असल्यास राज्य सुरक्षा महामंडळाची मदत घेत होती; मात्र कोव्हिडकाळात पालिकेने मुख्यालयात खासगी बाऊन्सरची नियुक्ती केली होती. आता तब्बल तीन हजार खासगी बाऊन्सर नियुक्त करण्यात येणार होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात एका कंपनीने 22 कोटींमध्ये पालिकेच्या गरजेनुसार बाऊन्सर पुरविण्याची तयारी दाखवली होती, तर दुसऱ्या कंपनीने 32 कोटी रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दाखवली होती. पालिकेने 32 कोटी रुपयांचे कंत्राट भरणाऱ्या कंपनीला पालिकेने बाऊन्सर पुरविण्याचे काम देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला. तसा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या पटलावरही मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र प्रशासनाकडून चिटणीस विभागाला पाठविले आहे.  रिक्षाचालकांच्या 'पाम'वर करा तक्रारी, कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांनी तयार केले ऍप ही निविदा प्रक्रिया रद्द होण्याची शक्‍यता आहेच. त्याचबरोबर अशाप्रकारचे बाऊन्सर नियुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने दुसरी निविदा प्रक्रिया राबवली आहे. ही निविदा प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  प्रस्ताव मागे घेऊन काय उपयोग?  समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनीही खासगी बाऊन्सर नियुक्तीच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. पटलावर मांडलेला प्रस्ताव मागे घेणे म्हणजे त्यात घोटाळा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता फक्त प्रस्ताव मागे घेऊन चालणार नाही तर या निविदा प्रकरणाची संपूर्ण माहिती उघड झाली पाहिजे, अशी मागणी शेख यांनी केली.  --------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 26, 2020

बाऊन्सर नियुक्तीचा प्रस्ताव अखेर मागे; निविदांमध्ये घोटाळ्याचा भाजप, समाजवादीचा आरोप  मुंबई : महानगरपालिका प्रशासनाने खासगी बाऊन्सर नियुक्त करण्याचा 32 कोटी रुपयांचा प्रस्ताव मागे घेतला आहे. या निविदा प्रक्रियेचा फेरविचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर 190 कोटी रुपयांची दुसरी निविदा प्रक्रियाही रद्द होण्याची शक्‍यता आहे. या दोन्ही निविदांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप भाजपसह समाजवादी पक्षाने केला होता.  आदिवासींचे जव्हारमधून पोटापाण्यासाठी स्थलांतर; आर्थिक कोंडी कायम महानगरपालिकेचा स्वतःचा सुरक्षारक्षक विभाग असून, त्यात 3500 कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत महानगरपालिका खासगी सुरक्षारक्षकांची आवश्‍यकता असल्यास राज्य सुरक्षा महामंडळाची मदत घेत होती; मात्र कोव्हिडकाळात पालिकेने मुख्यालयात खासगी बाऊन्सरची नियुक्ती केली होती. आता तब्बल तीन हजार खासगी बाऊन्सर नियुक्त करण्यात येणार होते. त्यासाठी पहिल्या टप्प्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात एका कंपनीने 22 कोटींमध्ये पालिकेच्या गरजेनुसार बाऊन्सर पुरविण्याची तयारी दाखवली होती, तर दुसऱ्या कंपनीने 32 कोटी रुपयांमध्ये हे काम करण्याची तयारी दाखवली होती. पालिकेने 32 कोटी रुपयांचे कंत्राट भरणाऱ्या कंपनीला पालिकेने बाऊन्सर पुरविण्याचे काम देण्याचा निर्णय घेतला, असा आरोप भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केला. तसा प्रस्ताव तयार करून स्थायी समितीच्या पटलावरही मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, तसे पत्र प्रशासनाकडून चिटणीस विभागाला पाठविले आहे.  रिक्षाचालकांच्या 'पाम'वर करा तक्रारी, कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांनी तयार केले ऍप ही निविदा प्रक्रिया रद्द होण्याची शक्‍यता आहेच. त्याचबरोबर अशाप्रकारचे बाऊन्सर नियुक्त करण्यासाठी महानगरपालिकेने दुसरी निविदा प्रक्रिया राबवली आहे. ही निविदा प्रक्रियाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.  प्रस्ताव मागे घेऊन काय उपयोग?  समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनीही खासगी बाऊन्सर नियुक्तीच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. पटलावर मांडलेला प्रस्ताव मागे घेणे म्हणजे त्यात घोटाळा असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता फक्त प्रस्ताव मागे घेऊन चालणार नाही तर या निविदा प्रकरणाची संपूर्ण माहिती उघड झाली पाहिजे, अशी मागणी शेख यांनी केली.  --------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2TtyblO

No comments:

Post a Comment