निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील `दुर्गा` कुडाळ (सिंधुदुर्ग) -  मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून पिंगुळी येथील श्रेया संजय बिर्जे या माड्याचीवाडी रायवाडी येथील वृद्ध निराधार यांच्या सेवेतच परमेश्‍वराचे रूप पाहत आहेत. जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून त्यांनी मानवसेवेचे बीज अविरत ठेवले आहे. सासरे सुरेश ऊर्फ दादा बिर्जे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा वसा त्यांनी सुरू ठेवला आहे.  माड्याचीवाडी रायवाडी येथील सुरेश बिर्जे जीवनआधार ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रम गेली पाच वर्षे वृद्ध निराधार यांची मानवसेवा करण्याचे काम अतिशय तन्मयतेने आपल्या घरातीलच सर्वजण आहेत. या भावनेने त्याची सेवा करत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सुरेश बिर्जे यांनी वृद्ध निराधार यांच्या सेवेसाठी पाच वर्षांपूर्वी त्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून श्री सुरेश बिर्जे जीवनआधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रमची स्थापना केली. या जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून याठिकाणी वृद्धांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी वृद्धासमवेत वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रमही याठिकाणी सुरू आहे.  याठिकाणी प्रवेश होताच निसर्गरम्य परिसर वृद्धाश्रमातील परिसर सुशोभित आहेच. शिवाय कोरोना महामारी संकटात या जिव्हाळा सेवाश्रमातील स्वच्छता टापटीपपणा आणि निराधार वृद्ध यांच्याशी असणाऱ्या जिव्हाळानी अनेकजण भेटी देणारे भारावून गेले आहेत. कोरोना नियमाचे पालनही या जिव्हाळामध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे बिर्जे कुटुंब हे येथील वृद्ध आश्रित नसून आपल्या परिवारातील आहेत. त्यांचे मायेने संगोपन करतात हे चित्र या ठिकाणी दिसते. सुरेश बिर्जे ट्रस्टच्या माध्यमातून या वृद्धांची सेवा करण्याचे महान कार्य होत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुरेश बिर्जे सारख्या व्यक्तीनी केवळ वृद्धांच्या सेवेसाठी हा जिव्हाळा सेवाश्रम निर्माण केला ते निश्‍चितच समाजाला दिशा देणारे प्रेरणा देणारे आहे.  संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे वृद्धाश्रमाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, ""आपण समाजात वावरतो समाजाचे देणे लागतो या भावनेतून या वृद्धाची सेवा करता यावी अशा या वृद्धांची सेवा करण्यात आपण परमेश्‍वराची सेवा करत असल्याचे एक समाधान मिळते. सध्या 25 वृद्ध या जिव्हाळामध्ये आहेत.''  अविरत सेवा  श्री. बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सून श्रेया बिर्जे यांनी सासऱ्याच्या पावलावर पाऊल ठेऊन निराधारांची सेवा करण्याचे काम हाती घेतले आहे. या सेवेतच परमेश्‍वररूपी सेवा मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत या जिव्हाळाला विविध संस्था, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील कलाकार, मान्यवरांनी भेटी देऊन येथील वृद्धाश्रमात त्यांच्याप्रति जिव्हाळा निर्माण केला आहे. ही सर्व माणसे आपले कुटुंब आहे, यासाठी श्रेया बिर्जेसह सुरेश बिर्जे, शोभा बिर्जे, राजू बिर्जे, साक्षी बिर्जे, संजय बिर्जे, संदीप बिर्जे, आर्या बिर्जे कार्यरत आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 23, 2020

निराधारात परमेश्वर पाहणाऱ्या पिंगुळीतील `दुर्गा` कुडाळ (सिंधुदुर्ग) -  मानवसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून पिंगुळी येथील श्रेया संजय बिर्जे या माड्याचीवाडी रायवाडी येथील वृद्ध निराधार यांच्या सेवेतच परमेश्‍वराचे रूप पाहत आहेत. जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून त्यांनी मानवसेवेचे बीज अविरत ठेवले आहे. सासरे सुरेश ऊर्फ दादा बिर्जे यांच्या पावलावर पाऊल ठेऊन समाजसेवेचा वसा त्यांनी सुरू ठेवला आहे.  माड्याचीवाडी रायवाडी येथील सुरेश बिर्जे जीवनआधार ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रम गेली पाच वर्षे वृद्ध निराधार यांची मानवसेवा करण्याचे काम अतिशय तन्मयतेने आपल्या घरातीलच सर्वजण आहेत. या भावनेने त्याची सेवा करत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सुरेश बिर्जे यांनी वृद्ध निराधार यांच्या सेवेसाठी पाच वर्षांपूर्वी त्यांना आधार देण्याच्या दृष्टिकोनातून श्री सुरेश बिर्जे जीवनआधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा सेवाश्रमची स्थापना केली. या जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून याठिकाणी वृद्धांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षी वृद्धासमवेत वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रमही याठिकाणी सुरू आहे.  याठिकाणी प्रवेश होताच निसर्गरम्य परिसर वृद्धाश्रमातील परिसर सुशोभित आहेच. शिवाय कोरोना महामारी संकटात या जिव्हाळा सेवाश्रमातील स्वच्छता टापटीपपणा आणि निराधार वृद्ध यांच्याशी असणाऱ्या जिव्हाळानी अनेकजण भेटी देणारे भारावून गेले आहेत. कोरोना नियमाचे पालनही या जिव्हाळामध्ये दिसून येत आहे. विशेष म्हणजे बिर्जे कुटुंब हे येथील वृद्ध आश्रित नसून आपल्या परिवारातील आहेत. त्यांचे मायेने संगोपन करतात हे चित्र या ठिकाणी दिसते. सुरेश बिर्जे ट्रस्टच्या माध्यमातून या वृद्धांची सेवा करण्याचे महान कार्य होत आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुरेश बिर्जे सारख्या व्यक्तीनी केवळ वृद्धांच्या सेवेसाठी हा जिव्हाळा सेवाश्रम निर्माण केला ते निश्‍चितच समाजाला दिशा देणारे प्रेरणा देणारे आहे.  संस्थापक अध्यक्ष दादा बिर्जे वृद्धाश्रमाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले, ""आपण समाजात वावरतो समाजाचे देणे लागतो या भावनेतून या वृद्धाची सेवा करता यावी अशा या वृद्धांची सेवा करण्यात आपण परमेश्‍वराची सेवा करत असल्याचे एक समाधान मिळते. सध्या 25 वृद्ध या जिव्हाळामध्ये आहेत.''  अविरत सेवा  श्री. बिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सून श्रेया बिर्जे यांनी सासऱ्याच्या पावलावर पाऊल ठेऊन निराधारांची सेवा करण्याचे काम हाती घेतले आहे. या सेवेतच परमेश्‍वररूपी सेवा मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत या जिव्हाळाला विविध संस्था, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील कलाकार, मान्यवरांनी भेटी देऊन येथील वृद्धाश्रमात त्यांच्याप्रति जिव्हाळा निर्माण केला आहे. ही सर्व माणसे आपले कुटुंब आहे, यासाठी श्रेया बिर्जेसह सुरेश बिर्जे, शोभा बिर्जे, राजू बिर्जे, साक्षी बिर्जे, संजय बिर्जे, संदीप बिर्जे, आर्या बिर्जे कार्यरत आहेत.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/31DYjPn

No comments:

Post a Comment