गोळवणचा बेपत्ता मुलगा सहा वर्षांनी सापडला मालवण (सिंधुदुर्ग) - गेली सहा वर्षे बेपत्ता असलेल्या अरुण विजय गावडे (वय 24, रा. गोळवण) या युवकाचा शोध घेण्यास कट्टा पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांना यश मिळाले. सहा वर्षांनी भेट झालेल्या मुलाला पाहून आई, वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला.  तालुक्‍यातील गोळवण गावातील अरुण गावडे हा युवक जून 2014 मध्ये आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर आजपर्यंत गेली सहा वर्षे त्याचा कोणताच पत्ता नव्हता. आई, वडिलांना फोन नाही ना अन्य कोणताही संपर्क नाही. त्यामुळे त्याच्या आई, वडीलांनी कट्टा पोलिस ठाण्यात मुलगा हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती.  सहा वर्षे लोटली; परंतु मुलाचा कोणताही पत्ता लागला नाही. पोलिस ठाण्यातील अंमलदार बदलले; पण तरीही त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. मुलगा परत यावा यासाठी आई वडिलांनी अनेक उपास, नवस केले. अखेर त्याच्या हाकेला परमेश्वर धावला तो कट्टा पोलिस ठाण्यातील पोलिस रुक्‍मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड यांच्या रूपाने. अरुण गावडे याचे जुन्या मोबाईल नंबरचे सिमकार्ड मुदत संपल्याने बंद होणार होते. त्यासाठी त्या सिमकार्डवर रिचार्ज करण्यासाठी कंपनीकडून फोन आला आणि तो फोन त्याच्या घरी आला. ही माहिती त्याच्या आई, वडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन दिली.  अन्‌ पत्ता मिळाला  कट्टा पोलिसांनी पुन्हा त्या कंपनीला संपर्क साधून त्या सिमकार्डचे लोकेशन मिळवले आणि त्यानुसार अरुण गावडे याचा पणजी येथे एका हॉटेलमध्ये पत्ता मिळाला. त्यानुसार सर्व जाबजबाब पूर्ण करुन त्याला आज गोवा येथून सिंधुदुर्गात आणून मालवण कट्टा येथे पोलिस ठाण्यात त्याच्या आई, वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. सहा वर्षांनी एकुलत्या एक मुलाची भेट झाल्यानंतर आई, वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. या प्रसंगाने खाकी वर्दीही गहिवरली. पोलिस हे खरोखरच परमेश्वर ठरल्याचे भावुक मत अरुणच्या आई, वडिलांनी व्यक्त केले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, October 20, 2020

गोळवणचा बेपत्ता मुलगा सहा वर्षांनी सापडला मालवण (सिंधुदुर्ग) - गेली सहा वर्षे बेपत्ता असलेल्या अरुण विजय गावडे (वय 24, रा. गोळवण) या युवकाचा शोध घेण्यास कट्टा पोलिस दूरक्षेत्राच्या पोलिसांना यश मिळाले. सहा वर्षांनी भेट झालेल्या मुलाला पाहून आई, वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला.  तालुक्‍यातील गोळवण गावातील अरुण गावडे हा युवक जून 2014 मध्ये आपल्या आई वडिलांना कामानिमित्त गोवा येथे जात असल्याचे सांगून निघून गेला होता. त्यानंतर आजपर्यंत गेली सहा वर्षे त्याचा कोणताच पत्ता नव्हता. आई, वडिलांना फोन नाही ना अन्य कोणताही संपर्क नाही. त्यामुळे त्याच्या आई, वडीलांनी कट्टा पोलिस ठाण्यात मुलगा हरवला असल्याची तक्रार दाखल केली होती.  सहा वर्षे लोटली; परंतु मुलाचा कोणताही पत्ता लागला नाही. पोलिस ठाण्यातील अंमलदार बदलले; पण तरीही त्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. मुलगा परत यावा यासाठी आई वडिलांनी अनेक उपास, नवस केले. अखेर त्याच्या हाकेला परमेश्वर धावला तो कट्टा पोलिस ठाण्यातील पोलिस रुक्‍मांगद मुंडे, योगेश सरफदार आणि संतोष पुटवाड यांच्या रूपाने. अरुण गावडे याचे जुन्या मोबाईल नंबरचे सिमकार्ड मुदत संपल्याने बंद होणार होते. त्यासाठी त्या सिमकार्डवर रिचार्ज करण्यासाठी कंपनीकडून फोन आला आणि तो फोन त्याच्या घरी आला. ही माहिती त्याच्या आई, वडिलांनी पोलिस ठाण्यात जाऊन दिली.  अन्‌ पत्ता मिळाला  कट्टा पोलिसांनी पुन्हा त्या कंपनीला संपर्क साधून त्या सिमकार्डचे लोकेशन मिळवले आणि त्यानुसार अरुण गावडे याचा पणजी येथे एका हॉटेलमध्ये पत्ता मिळाला. त्यानुसार सर्व जाबजबाब पूर्ण करुन त्याला आज गोवा येथून सिंधुदुर्गात आणून मालवण कट्टा येथे पोलिस ठाण्यात त्याच्या आई, वडीलांच्या स्वाधीन करण्यात आले. सहा वर्षांनी एकुलत्या एक मुलाची भेट झाल्यानंतर आई, वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला. या प्रसंगाने खाकी वर्दीही गहिवरली. पोलिस हे खरोखरच परमेश्वर ठरल्याचे भावुक मत अरुणच्या आई, वडिलांनी व्यक्त केले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34cNHJ4

No comments:

Post a Comment