नॅशनल पार्कमध्ये गाड्यांना बंदी, स्थानिक आदिवासी संघटनांचा विरोध मुंबई:  बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांना प्रवेशबंदी लादल्याने उद्यानात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवरील स्थानिक आदिवासींच्या रोजीरोटीचा प्रश्न उत्पन्न होईल, असा दावा तेथील आदिवासी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर यांनी केला आहे.  खासगी वाहने आता उद्यानाबाहेरील वाहनतळावर उभी करावी लागतील. तेथून इलेक्ट्रिक बसमधून पर्यटकांना फिरविले जाईल. येथील आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी नागरिक सध्या आपल्या गाड्यांमधून पर्यटकांना फिरवितात. त्यातूनच त्यांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालतो, आता या नव्या रचनेमुळे स्थानिक आदिवासींच्या गाड्या बंद होतील. त्यामुळे आदिवासींच्या गाड्या सुरुच ठेवाव्यात किंवा आम्हाला पर्यायी रोजगाराचे साधन द्यावे, अशी मागणी बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष असलेल्या ठाकूर यांनी केली आहे.  अधिक वाचाः  भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळेच घटना घडल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट आता अडीचशे वाहनक्षमता असलेल्या वाहनतळावर पर्यटकांची खासगी वाहने उभी राहतील. त्यांना 16 नव्या इलेक्ट्रिक बसमधून आतमध्ये फिरविले जाईल.  येथील 40-50 आदिवासी रहिवाशांनी कर्ज काढून सीएनजीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ओम्नी गाड्या घेतल्या आहेत. आता त्यांचे हे उपजिविकेचे साधन बंद पडण्याची भीती आहे. अशा स्थितीत आमच्या गाड्या उद्यानातही चालविण्याची परवानगी द्यावी, किंवा या नव्या वाहनतळाचे कंत्राट आदिवासी नागरिकांना द्यावे किंवा या नव्या इलेक्ट्रिक बसचे काम आम्हाला द्यावे, अन्यथा आम्हाला पर्यायी रोजगार द्यावा, असेही ठाकूर यांनी सांगितले. अधिक वाचाः  मुंबईकरांच्या गर्दीपुढे एसटीच्या फेऱ्या कमीच; ठाणे, कल्याण, पनवेल मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लॉकडाऊनचे सहा महिने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी पर्वणीचे ठरले. प्रदूषण घटल्याने निसर्ग बहरू लागला तर प्राण्यांना ही मुक्त संचार करत मोकळा श्वास घेता आला. आता लवकरच उद्यान सर्वसांमान्यासाठी खुलं होणार असले तरी प्रदुषणमुक्तीच्या दिशेने पावले उचलण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.  त्यासाठी खासगी वाहनांना उद्यानात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल पार्कमध्ये खासगी वाहनांना बंदी बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणारेय. गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा प्रशासनाने गांभिर्याने घेतला. यापुढे खासगी वाहनांची सोय उद्यानाबाहेर तयार केलेल्या वाहनतळामध्ये केली जाईल. एकावेळी  २५० हून अधिक वाहने उभी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय गरजेनुसार त्याची क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.  खासगी वाहनांसह बेस्ट बसेस देखील बंद करण्याचा विचार सुरू आहे. पर्यटकांच्या दळणवळणाकरिता उद्यानाअंतर्गत पर्यावरण पूरक 16 इल्केट्रिकल बस कार्यान्वित करणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांनी दिली. या बस 'नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून उद्यान प्रशासनाला मिळणारेत. कॉर्पोरेशनकडून उभारण्यात येणारा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प' राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्याला छेदून जात आहे. त्यासाठी पर्यावरणीय उपाययोजनाअंतर्गत या 16 बस देण्यात येणार आहेत. --------------------- (संपादनः पूजा विचारे) Ban on vehicles in National Park protests by local tribal organizations News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 10, 2020

नॅशनल पार्कमध्ये गाड्यांना बंदी, स्थानिक आदिवासी संघटनांचा विरोध मुंबई:  बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात खासगी वाहनांना प्रवेशबंदी लादल्याने उद्यानात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवरील स्थानिक आदिवासींच्या रोजीरोटीचा प्रश्न उत्पन्न होईल, असा दावा तेथील आदिवासी संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर यांनी केला आहे.  खासगी वाहने आता उद्यानाबाहेरील वाहनतळावर उभी करावी लागतील. तेथून इलेक्ट्रिक बसमधून पर्यटकांना फिरविले जाईल. येथील आदिवासी पाड्यांमध्ये राहणारे आदिवासी नागरिक सध्या आपल्या गाड्यांमधून पर्यटकांना फिरवितात. त्यातूनच त्यांच्या कुटुंबांचा चरितार्थ चालतो, आता या नव्या रचनेमुळे स्थानिक आदिवासींच्या गाड्या बंद होतील. त्यामुळे आदिवासींच्या गाड्या सुरुच ठेवाव्यात किंवा आम्हाला पर्यायी रोजगाराचे साधन द्यावे, अशी मागणी बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष असलेल्या ठाकूर यांनी केली आहे.  अधिक वाचाः  भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण! अधिकाऱ्यांच्या हलगर्जीमुळेच घटना घडल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट आता अडीचशे वाहनक्षमता असलेल्या वाहनतळावर पर्यटकांची खासगी वाहने उभी राहतील. त्यांना 16 नव्या इलेक्ट्रिक बसमधून आतमध्ये फिरविले जाईल.  येथील 40-50 आदिवासी रहिवाशांनी कर्ज काढून सीएनजीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक ओम्नी गाड्या घेतल्या आहेत. आता त्यांचे हे उपजिविकेचे साधन बंद पडण्याची भीती आहे. अशा स्थितीत आमच्या गाड्या उद्यानातही चालविण्याची परवानगी द्यावी, किंवा या नव्या वाहनतळाचे कंत्राट आदिवासी नागरिकांना द्यावे किंवा या नव्या इलेक्ट्रिक बसचे काम आम्हाला द्यावे, अन्यथा आम्हाला पर्यायी रोजगार द्यावा, असेही ठाकूर यांनी सांगितले. अधिक वाचाः  मुंबईकरांच्या गर्दीपुढे एसटीच्या फेऱ्या कमीच; ठाणे, कल्याण, पनवेल मार्गावरील बस थांब्यावर प्रवाशांच्या रांगा लॉकडाऊनचे सहा महिने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी पर्वणीचे ठरले. प्रदूषण घटल्याने निसर्ग बहरू लागला तर प्राण्यांना ही मुक्त संचार करत मोकळा श्वास घेता आला. आता लवकरच उद्यान सर्वसांमान्यासाठी खुलं होणार असले तरी प्रदुषणमुक्तीच्या दिशेने पावले उचलण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.  त्यासाठी खासगी वाहनांना उद्यानात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल पार्कमध्ये खासगी वाहनांना बंदी बोरिवलीचे 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर उद्यानात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असणारेय. गाड्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा प्रशासनाने गांभिर्याने घेतला. यापुढे खासगी वाहनांची सोय उद्यानाबाहेर तयार केलेल्या वाहनतळामध्ये केली जाईल. एकावेळी  २५० हून अधिक वाहने उभी राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय गरजेनुसार त्याची क्षमता वाढवण्यावर भर देणार असल्याचे संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.  खासगी वाहनांसह बेस्ट बसेस देखील बंद करण्याचा विचार सुरू आहे. पर्यटकांच्या दळणवळणाकरिता उद्यानाअंतर्गत पर्यावरण पूरक 16 इल्केट्रिकल बस कार्यान्वित करणार असल्याची माहिती राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांनी दिली. या बस 'नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड'कडून उद्यान प्रशासनाला मिळणारेत. कॉर्पोरेशनकडून उभारण्यात येणारा 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प' राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर अभयारण्याला छेदून जात आहे. त्यासाठी पर्यावरणीय उपाययोजनाअंतर्गत या 16 बस देण्यात येणार आहेत. --------------------- (संपादनः पूजा विचारे) Ban on vehicles in National Park protests by local tribal organizations News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3jRZrGf

No comments:

Post a Comment