कोरोनाग्रस्ताच्या फुप्फुसाची तपासणी अवघ्या 16 सेकंदांत; अत्याधुनिक "सीटी इन ए बॉक्‍स' सेवेत दाखल मुंबई : कोरोना रुग्णाच्या फुप्फुसाची तपासणी आता अवघ्या 16 सेकंदांत करता येणार असून त्यामुळे संसर्गाचे निदानही लवकर होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोव्हिड केंद्रात अत्याधुनिक "सीटी इन ए बॉक्‍स' मशीन दाखल झाले असून त्यामुळे 16 सेकंदांत तपासणी शक्‍य आहे. मशीनमुळे संसर्गाचा प्रसारही रोखता येणे शक्‍य होणार आहे. शिवाय इतर संसर्गजन्य आजारांसाठी आवश्‍यक सिटी स्कॅन चाचण्याही करता येणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण मुंबई प्रदेश महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर भव्य कोव्हिड केंद्र उभारले आहे. तिथे आतापर्यंत हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी "सिटी इन ए बॉक्‍स' मशीन नुकतेच केंद्रात दाखल झाले. देशातील असे हे पहिलेच अत्याधुनिक मशीन आहे, ज्यात फुप्फुसाची तपासणी फक्त 16 सेकंदांत होऊ शकते.  मशीनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रुग्णाच्या तपासणीदरम्यान आणीबाणी उद्‌भवल्यास "पेशंट स्कॅन मोड' सुविधा आहे. मशीनच्या मदतीने फुप्फुसाची तपासणी करताना वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या थेट संपर्कात येत नाहीत. अशा सुविधेमुळे सामाजिक अंतर राखणे शक्‍य होते.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पालिकेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक सामाजिक संघटनाही पालिकेला मदत करत आहेत. त्यांच्या मदतीने पालिकेने कोरोना बाधित व इतर रुग्णांना योग्य उपचार मिळावेत म्हणून व्यवस्थेतही वाढ केली आहे. सामाजिक संघटनांच्या सहकार्यानेच "सिटी इन ए बॉक्‍स' सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ती पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.  नायरमधील 125 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस; चार महिने पाठपुरावा डॉक्‍टरांना घरबसल्या अहवाल तपासणे शक्‍य  अत्याधुनिक मशीनमुळे रुग्णाचे अत्यंत जलद सिटीस्कॅन करता येते. "सिटी इन ए बॉक्‍स' मशीन कंटेनरमध्ये असून मोबाईल पोर्टेबल आहे. त्यामुळे ते कोणत्याही रुग्णालयात हलवता येईल. एच आर, कार्डियाक, कॉंट्रास, मेंदू आदी अनेक प्रकारचे सिटीस्कॅन त्यात करता येते. मशीनमध्ये सर्व 34 स्लाईड असून त्या एकमेकांशी जोडलेल्या असल्याने डॉक्‍टरांना प्रतिबंधित भागात थांबण्याची गरज लागणार नाही. ते मोबाईलवर तपासणीचा अहवाल पाहूनही उपचार सांगू शकतात, अशी माहिती बीकेसी कोव्हिड केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी दिली.  ..........................................................  सुविधेची वैशिष्ट्ये  * "सिटी इन ए बॉक्‍स' अत्याधुनिक सुविधा असलेले मशीन  * इतर साथरोगांसाठी आवश्‍यक सिटी स्कॅन करता येते.  * सुरक्षाविषयक सुविधेसह रचना  * दुय्यम संसर्ग होत नाही आणि शारीरिक संपर्क टाळता येतो  * आणीबाणीच्या काळात "पेशंट स्कॅन मोड' सुविधा.  Coronary artery lung examination in just 16 seconds Introducing state-of-the-art "CT in a Box" service ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 26, 2020

कोरोनाग्रस्ताच्या फुप्फुसाची तपासणी अवघ्या 16 सेकंदांत; अत्याधुनिक "सीटी इन ए बॉक्‍स' सेवेत दाखल मुंबई : कोरोना रुग्णाच्या फुप्फुसाची तपासणी आता अवघ्या 16 सेकंदांत करता येणार असून त्यामुळे संसर्गाचे निदानही लवकर होणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोव्हिड केंद्रात अत्याधुनिक "सीटी इन ए बॉक्‍स' मशीन दाखल झाले असून त्यामुळे 16 सेकंदांत तपासणी शक्‍य आहे. मशीनमुळे संसर्गाचा प्रसारही रोखता येणे शक्‍य होणार आहे. शिवाय इतर संसर्गजन्य आजारांसाठी आवश्‍यक सिटी स्कॅन चाचण्याही करता येणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मंगळवारी होणारी सुनावणी मान्य नाही : अशोक चव्हाण मुंबई प्रदेश महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर भव्य कोव्हिड केंद्र उभारले आहे. तिथे आतापर्यंत हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांचे निदान व व्यवस्थापन करण्यासाठी "सिटी इन ए बॉक्‍स' मशीन नुकतेच केंद्रात दाखल झाले. देशातील असे हे पहिलेच अत्याधुनिक मशीन आहे, ज्यात फुप्फुसाची तपासणी फक्त 16 सेकंदांत होऊ शकते.  मशीनमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. रुग्णाच्या तपासणीदरम्यान आणीबाणी उद्‌भवल्यास "पेशंट स्कॅन मोड' सुविधा आहे. मशीनच्या मदतीने फुप्फुसाची तपासणी करताना वैद्यकीय कर्मचारी रुग्णाच्या थेट संपर्कात येत नाहीत. अशा सुविधेमुळे सामाजिक अंतर राखणे शक्‍य होते.  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी पालिकेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अनेक सामाजिक संघटनाही पालिकेला मदत करत आहेत. त्यांच्या मदतीने पालिकेने कोरोना बाधित व इतर रुग्णांना योग्य उपचार मिळावेत म्हणून व्यवस्थेतही वाढ केली आहे. सामाजिक संघटनांच्या सहकार्यानेच "सिटी इन ए बॉक्‍स' सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ती पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.  नायरमधील 125 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस; चार महिने पाठपुरावा डॉक्‍टरांना घरबसल्या अहवाल तपासणे शक्‍य  अत्याधुनिक मशीनमुळे रुग्णाचे अत्यंत जलद सिटीस्कॅन करता येते. "सिटी इन ए बॉक्‍स' मशीन कंटेनरमध्ये असून मोबाईल पोर्टेबल आहे. त्यामुळे ते कोणत्याही रुग्णालयात हलवता येईल. एच आर, कार्डियाक, कॉंट्रास, मेंदू आदी अनेक प्रकारचे सिटीस्कॅन त्यात करता येते. मशीनमध्ये सर्व 34 स्लाईड असून त्या एकमेकांशी जोडलेल्या असल्याने डॉक्‍टरांना प्रतिबंधित भागात थांबण्याची गरज लागणार नाही. ते मोबाईलवर तपासणीचा अहवाल पाहूनही उपचार सांगू शकतात, अशी माहिती बीकेसी कोव्हिड केंद्राचे प्रमुख डॉ. राजेश डेरे यांनी दिली.  ..........................................................  सुविधेची वैशिष्ट्ये  * "सिटी इन ए बॉक्‍स' अत्याधुनिक सुविधा असलेले मशीन  * इतर साथरोगांसाठी आवश्‍यक सिटी स्कॅन करता येते.  * सुरक्षाविषयक सुविधेसह रचना  * दुय्यम संसर्ग होत नाही आणि शारीरिक संपर्क टाळता येतो  * आणीबाणीच्या काळात "पेशंट स्कॅन मोड' सुविधा.  Coronary artery lung examination in just 16 seconds Introducing state-of-the-art "CT in a Box" service ------------------------------------------------------ ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34w4VRZ

No comments:

Post a Comment