आंबडोसवासीयांना आता जलद आरोग्यसेवा ओरोस (सिंधुदुर्ग) - आंबडोस (ता. मालवण) गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्याचा ठराव गुरुवारी (ता.1) झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. गावच्या सरपंच राधा वरवडेकर यांनी लेखी स्वरुपात ही मागणी केली होती. आरोग्य सभापती सावी लोके यांनी हा ठराव मांडला होता. त्याला सभागृहाने मान्यता दिली. आता हा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत व नंतर सर्वसाधारण सभेत ठेवावा, अशी मागणी सरपंच वरवडेकर यांनी केली.  आंबडोस गाव मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते; परंतु मसूरे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून आंबडोस गाव 8 किलोमीटर अंतरावर आहे. चौके प्राथमिक आरोग्य केंद्र अवघे 2 किलोमीटवर आहे. या गावातील नागरिक बाजारनिमित्त चौके येथे जात असतात. जिल्ह्याच्या किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौके येथूनच जातात. गावातील लोकांची नियमित चौके येथे रहदारी असते. परिणामी उपचार घेण्यासाठी सुद्धा चौके प्रथामिक आरोग्य केंद्रात जातात; परंतु लहान मुलांचे डोस घेण्यासाठी किंवा येथील आशा स्वयंसेविकांना कामानिमित्त मसुरे येथेच जावे लागते. तब्बल 8 किलोमीटर अंतर असल्याने ही बाब खर्चिक ठरते. चौके प्राथमिक आरोग्य केंद्र नजदीक असल्याने आंबडोस गावातील नागरिकांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी सोइस्कर ठरणारे आहे. उपकेंद्रसुद्धा नजिक असलेल्या नांदरुख गावात आहे. आंबडोस गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यासाठी गेली अनेक वर्षे आंबडोस गाव मागणी करीत आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेतला होता. मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेतही ठराव झाला होता. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांच्याकडे लेखी प्रस्ताव पाठविला आहे.  सभापतींचा ठराव मान्य  याबाबत आरोग्य सभापती सावी लोके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे तसेच आमच्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी बांदेकर यांनी आरोग्य समिती, स्थायी समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय ठेवून तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंच वरवडेकर यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑक्‍टोबरच्या आरोग्य समिती सभेत सभापती लोके यांनी आंबडोस गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडा, असा ठराव मांडला. त्याला सभागृहाने मान्यता दिली.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

आंबडोसवासीयांना आता जलद आरोग्यसेवा ओरोस (सिंधुदुर्ग) - आंबडोस (ता. मालवण) गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्याचा ठराव गुरुवारी (ता.1) झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य समिती सभेत घेण्यात आला. गावच्या सरपंच राधा वरवडेकर यांनी लेखी स्वरुपात ही मागणी केली होती. आरोग्य सभापती सावी लोके यांनी हा ठराव मांडला होता. त्याला सभागृहाने मान्यता दिली. आता हा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत व नंतर सर्वसाधारण सभेत ठेवावा, अशी मागणी सरपंच वरवडेकर यांनी केली.  आंबडोस गाव मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते; परंतु मसूरे प्राथमिक आरोग्य केंद्रापासून आंबडोस गाव 8 किलोमीटर अंतरावर आहे. चौके प्राथमिक आरोग्य केंद्र अवघे 2 किलोमीटवर आहे. या गावातील नागरिक बाजारनिमित्त चौके येथे जात असतात. जिल्ह्याच्या किंवा तालुक्‍याच्या ठिकाणी जाण्यासाठी चौके येथूनच जातात. गावातील लोकांची नियमित चौके येथे रहदारी असते. परिणामी उपचार घेण्यासाठी सुद्धा चौके प्रथामिक आरोग्य केंद्रात जातात; परंतु लहान मुलांचे डोस घेण्यासाठी किंवा येथील आशा स्वयंसेविकांना कामानिमित्त मसुरे येथेच जावे लागते. तब्बल 8 किलोमीटर अंतर असल्याने ही बाब खर्चिक ठरते. चौके प्राथमिक आरोग्य केंद्र नजदीक असल्याने आंबडोस गावातील नागरिकांना वैद्यकीय सेवा घेण्यासाठी सोइस्कर ठरणारे आहे. उपकेंद्रसुद्धा नजिक असलेल्या नांदरुख गावात आहे. आंबडोस गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडण्यासाठी गेली अनेक वर्षे आंबडोस गाव मागणी करीत आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेतला होता. मालवण पंचायत समितीच्या मासिक सभेतही ठराव झाला होता. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांच्याकडे लेखी प्रस्ताव पाठविला आहे.  सभापतींचा ठराव मान्य  याबाबत आरोग्य सभापती सावी लोके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे तसेच आमच्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बाल कल्याण समिती सभापती माधुरी बांदेकर यांनी आरोग्य समिती, स्थायी समिती आणि जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विषय ठेवून तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी सरपंच वरवडेकर यांनी केली होती. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑक्‍टोबरच्या आरोग्य समिती सभेत सभापती लोके यांनी आंबडोस गाव चौके प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडा, असा ठराव मांडला. त्याला सभागृहाने मान्यता दिली.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iqqXsR

No comments:

Post a Comment