भातकापणीला वेग; पण पावसाचे मळभ बांदा (सिंधुदुर्ग) - पंचक्रोशीत सध्या भात कापणीच्या कामांना वेग आला आहे. चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर कापणी सुरू झाली आहे. त्यात काल (ता. 2) सकाळपासूनच थंड वाऱ्यासह पावसाचे मळभ होते. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यास नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे कापणी खोळंबली आहे.  दरवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने पीक चांगले आले. येथील पंचक्रोशीत दोन दिवसांपासून उकाडा आहे. त्यात परतीच्या पावसाचे संपूर्ण शेतावर मळभ आल्याने पाऊस लागल्यास कापणी करून ठेवलेले भात पाण्यात भिजून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापलेले भात गोळा करण्यास सुरूवात केली आहे. काही ठिकाणी उडवी करून ठेवण्यात बळीराजा मग्न दिसतो.  "घास' वाचविण्याची धडपड  गणेशोत्सव काळात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने सावंतवाडी तालुक्‍यात भात पीक जोमात आले आहे. सातार्डा, साटेली, न्हावेली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, शेर्ले गावात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कापणी खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेले पीक धोक्‍यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. वाया जाऊ नये, यासाठी पीक शेतातच झोडण्याची लगबग सुरू आहे.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

भातकापणीला वेग; पण पावसाचे मळभ बांदा (सिंधुदुर्ग) - पंचक्रोशीत सध्या भात कापणीच्या कामांना वेग आला आहे. चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानंतर कापणी सुरू झाली आहे. त्यात काल (ता. 2) सकाळपासूनच थंड वाऱ्यासह पावसाचे मळभ होते. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यास नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याने बळीराजा चिंतेत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे कापणी खोळंबली आहे.  दरवर्षीपेक्षा यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने पीक चांगले आले. येथील पंचक्रोशीत दोन दिवसांपासून उकाडा आहे. त्यात परतीच्या पावसाचे संपूर्ण शेतावर मळभ आल्याने पाऊस लागल्यास कापणी करून ठेवलेले भात पाण्यात भिजून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कापलेले भात गोळा करण्यास सुरूवात केली आहे. काही ठिकाणी उडवी करून ठेवण्यात बळीराजा मग्न दिसतो.  "घास' वाचविण्याची धडपड  गणेशोत्सव काळात पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने सावंतवाडी तालुक्‍यात भात पीक जोमात आले आहे. सातार्डा, साटेली, न्हावेली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, निगुडे, कास, शेर्ले गावात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे कापणी खोळंबली आहे. हातातोंडाशी आलेले पीक धोक्‍यात आल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. वाया जाऊ नये, यासाठी पीक शेतातच झोडण्याची लगबग सुरू आहे.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SlqsG2

No comments:

Post a Comment