वीज ग्राहकांना दरवाढीसह सरासरी बिलाचा शॉक; सरकारला ग्राहकांना दिलासा देण्याची संधी मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत विजेची बिले अंदाजापेक्षा अधिक आल्याने वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तीन महिने मीटर रिडींग न घेताच सरासरी वीज बिले देण्यात आल्याने बहुतांश ग्राहकांचे वीज बिलाची रक्कम पाहून डोळे फिरले. यातच 1 एप्रिलपासून वीज विजेचे दर वाढल्याने बिलाच्या रक्कमेत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना दुहेरी शॉक बसला. ग्राहकांना सवलत देण्याची अनोखी संधी सरकारकडे असल्याचे वीज तज्ज्ञ सागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील वीज कंपन्यांनी विजेची मीटर रिडींग न घेताच सरासरी बिले दिली. सरासरी बिले देताना ग्राहकांना हिवाळ्यातील वापरापाप्रमाणे बिले दिल्याने ग्राहकांना बिले कमी आली. परंतु याच कालावधीत ग्राहकांना वाढीव दरानुसार बिले देण्यात आली. त्यामुळेही बिलाच्या रक्कमेत वाढ झाल्याचे, वीज तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच 1 एप्रिलपासून लागू केलेली वीज दरवाढ थांबवून ग्राहकांना दिलासा देता आला असता, असेही होगाडे म्हणाले. महत्त्वाची बातमी : लोकल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला सूचना वीज बिलातील स्थिर आकार पूर्वी दरमहा 90 रुपये होता. तो आता 100 रुपये झालेला आहे. वहन आकार पूर्वी 1.28 रुपये प्रति युनिट होता. तो आता 1.45 रुपये झाला आहे. वीज आकार पहिल्या 100 युनिटसाठी पूर्वी 3.05 रुपये प्रति युनिट होता. तो आता 3.46 रुपये प्रति युनिट झालेला आहे. 100 युनिट्सच्या पुढील 101 ते 300 युनिट्सपर्यंतचा दर पूर्वी 6.95 रुपये प्रति युनिट होता. तो आता 7.43 रु प्रति युनिट झालेला आहे. 300 युनिट्सच्या पुढील 301 ते 500 युनिट्स पर्यंतचा दर पूर्वी 9.90 रुपये प्रति युनिट होता. तो आता 10.32 रुपये प्रति युनिट झालेला आहे. त्यानुसार स्थिर आकार, वहन आकार व वीज आकार ही एकूण वाढ 100 युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी 16 टक्के आहे. व 100 युनिट्सच्या वरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी दरवाढ 13 टक्के आहे. आणि या वाढीव वीज दराने ग्राहकांना प्रथमच बिले आलेली आहेत. सरासरी वीज बिले देण्यात आली त्यावेळी साधारण अडीच महिने ग्राहकांना अधिक रक्कमेची बिले आली आहेत. वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणतात, सरासरी वीज बिले आणि वीज दरवाढ यामुळे ग्राहकांना वीज बिले अधिक आली आहेत. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने सवलत दिल्यास ती सरकारसाठी लाभदायक ठरू शकते. विविध राज्ये नागरिकांना विविध पद्धतीने दिलासा देत आहेत. मात्र राज्य सरकार कोणासही दिलासा देण्यास तयार नाही. हे लक्षण योग्य नाही. कठीण काळात सरकारने जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे. महत्त्वाची बातमी : पायल घोषचा 'यु टर्न'; रिचा चड्ढाची बिनशर्त माफी मागण्यास तयार तर वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे म्हणतात, हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांपुढे जगायचे कसे हा प्रश्न आहे. त्यांना दिलासा द्यायचा ठरविल्यास सरकार देऊ शकते. पण शेवटी वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. बिलांच्या रक्कमा थकल्यास वीज कंपन्यांना वीज खरेदीचे पैसे कसे देणार हा प्रश्न आहेच. यावर्षीची वीज दरवाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. ( संपादन - सुमित बागुल ) electricity users got shock of bills due to average billing and increased rates News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, October 7, 2020

वीज ग्राहकांना दरवाढीसह सरासरी बिलाचा शॉक; सरकारला ग्राहकांना दिलासा देण्याची संधी मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत विजेची बिले अंदाजापेक्षा अधिक आल्याने वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तीन महिने मीटर रिडींग न घेताच सरासरी वीज बिले देण्यात आल्याने बहुतांश ग्राहकांचे वीज बिलाची रक्कम पाहून डोळे फिरले. यातच 1 एप्रिलपासून वीज विजेचे दर वाढल्याने बिलाच्या रक्कमेत मोठी वाढ झाल्याने ग्राहकांना दुहेरी शॉक बसला. ग्राहकांना सवलत देण्याची अनोखी संधी सरकारकडे असल्याचे वीज तज्ज्ञ सागत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील वीज कंपन्यांनी विजेची मीटर रिडींग न घेताच सरासरी बिले दिली. सरासरी बिले देताना ग्राहकांना हिवाळ्यातील वापरापाप्रमाणे बिले दिल्याने ग्राहकांना बिले कमी आली. परंतु याच कालावधीत ग्राहकांना वाढीव दरानुसार बिले देण्यात आली. त्यामुळेही बिलाच्या रक्कमेत वाढ झाल्याचे, वीज तज्ज्ञ सांगत आहेत. तसेच 1 एप्रिलपासून लागू केलेली वीज दरवाढ थांबवून ग्राहकांना दिलासा देता आला असता, असेही होगाडे म्हणाले. महत्त्वाची बातमी : लोकल रेल्वे गाड्यांची संख्या वाढवावी, मुंबई उच्च न्यायालयाची सरकारला सूचना वीज बिलातील स्थिर आकार पूर्वी दरमहा 90 रुपये होता. तो आता 100 रुपये झालेला आहे. वहन आकार पूर्वी 1.28 रुपये प्रति युनिट होता. तो आता 1.45 रुपये झाला आहे. वीज आकार पहिल्या 100 युनिटसाठी पूर्वी 3.05 रुपये प्रति युनिट होता. तो आता 3.46 रुपये प्रति युनिट झालेला आहे. 100 युनिट्सच्या पुढील 101 ते 300 युनिट्सपर्यंतचा दर पूर्वी 6.95 रुपये प्रति युनिट होता. तो आता 7.43 रु प्रति युनिट झालेला आहे. 300 युनिट्सच्या पुढील 301 ते 500 युनिट्स पर्यंतचा दर पूर्वी 9.90 रुपये प्रति युनिट होता. तो आता 10.32 रुपये प्रति युनिट झालेला आहे. त्यानुसार स्थिर आकार, वहन आकार व वीज आकार ही एकूण वाढ 100 युनिट्सच्या आतील ग्राहकांसाठी सरासरी 16 टक्के आहे. व 100 युनिट्सच्या वरील ग्राहकांसाठी एकूण सरासरी दरवाढ 13 टक्के आहे. आणि या वाढीव वीज दराने ग्राहकांना प्रथमच बिले आलेली आहेत. सरासरी वीज बिले देण्यात आली त्यावेळी साधारण अडीच महिने ग्राहकांना अधिक रक्कमेची बिले आली आहेत. वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणतात, सरासरी वीज बिले आणि वीज दरवाढ यामुळे ग्राहकांना वीज बिले अधिक आली आहेत. ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने सवलत दिल्यास ती सरकारसाठी लाभदायक ठरू शकते. विविध राज्ये नागरिकांना विविध पद्धतीने दिलासा देत आहेत. मात्र राज्य सरकार कोणासही दिलासा देण्यास तयार नाही. हे लक्षण योग्य नाही. कठीण काळात सरकारने जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे आवश्यक आहे. महत्त्वाची बातमी : पायल घोषचा 'यु टर्न'; रिचा चड्ढाची बिनशर्त माफी मागण्यास तयार तर वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे म्हणतात, हातावर पोट असलेल्या गोरगरीब मजुरांपुढे जगायचे कसे हा प्रश्न आहे. त्यांना दिलासा द्यायचा ठरविल्यास सरकार देऊ शकते. पण शेवटी वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न आहे. बिलांच्या रक्कमा थकल्यास वीज कंपन्यांना वीज खरेदीचे पैसे कसे देणार हा प्रश्न आहेच. यावर्षीची वीज दरवाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी आहे. ( संपादन - सुमित बागुल ) electricity users got shock of bills due to average billing and increased rates News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30HNsUj

No comments:

Post a Comment