UnlockEffect: प्रदूषणामुळे खाडीचा श्वास कोंडला; पाणी प्रदुषित झाल्याने जलचर व पर्यावरणाला धोका   ठाणे ः कोरोनामुळे गेले पाच-सहा महिने वाहने, उद्योगधंदे आदी ठप्प असल्याने वातावरणातील प्रदुषण घटले होते. त्यातच पर्यावरणभिमुख उत्सवासाठी आग्रही असलेल्या ठाणे महापालिकेने दरवर्षीप्राणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून खाडी आणि तलावातील पाण्याचे प्रदूषण होण्यापासून रोखले होते. मात्र, हळूहळू सर्वत्र अनलॉक होत असल्याने  कारखान्यांमुळे खाडीतील पाणी प्रदुषित होऊ लागले आहे. भरतीच्या वेळी तर राडारोडा आणि केरकचरा खाडीकिनारी पसरत असल्याने जलचरांसह पर्यावरण आणि मानवी वस्तीला धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द तलावांचे शहर असलेल्या ठाण्याला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. गेले काही महिने लॉकडाऊनमुळे खाडी निर्मळ आणि स्वच्छ झाली होती. त्यानंतर गणेशोत्सवातदेखील ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केलेल्या पर्यावरणपुरक उपाययोजनामुळे खाडी व तलावातील प्रदुषण रोखण्यास मदत झाली. परंतु,आता टप्याटप्याने होत असलेल्या अनलॉकमुळे उद्योगव्यवसाय व कारखाने सुरू झाल्याने कारखान्यातील रसायने, सांडपाणी, मलमूत्र आदी थेट पाण्यात मिसळल्याने खाडी प्रदुषणाच्या खाईत लोटली गेली आहे. त्यामुळे खाडीतील प्राणवायू कमी होऊन मासे, खेकडे, कोळंबी, कासव, पाणसाप आदी जलचर प्रजाती तसेच, खारफुटी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे निरिक्षण पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.   अनलॉकनंतर सुरू झालेल्या उद्योग व्यवसायांमुळे खाडीचे पाणी प्रदुषित झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही ठाणे महापालिकेमार्फत खाडी संवर्धनाबाबतच्या उपाययोजना नियमितपणे राबवल्या जात आहेत. किंबहुना, भरतीच्या वेळांमध्ये खाडीकिनारी फेकलेला कचरा वाहत येत असल्यानेही प्रदुषणात भर पडण्याची शक्यता आहे. - मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, महापालिका   कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पर्यावरण स्वच्छ झाले होते. मात्र, आता अनलॉक होऊ लागल्याने वाहनांची वर्दळ वाढली असून हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे. गुरूवारी ठाणे खाडीत भरतीच्या पाण्यात केरकचरा व अनेक प्रदुषित घटक आढळले.  - भरत मोरे, पर्यावरण मित्र --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 10, 2020

UnlockEffect: प्रदूषणामुळे खाडीचा श्वास कोंडला; पाणी प्रदुषित झाल्याने जलचर व पर्यावरणाला धोका   ठाणे ः कोरोनामुळे गेले पाच-सहा महिने वाहने, उद्योगधंदे आदी ठप्प असल्याने वातावरणातील प्रदुषण घटले होते. त्यातच पर्यावरणभिमुख उत्सवासाठी आग्रही असलेल्या ठाणे महापालिकेने दरवर्षीप्राणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून खाडी आणि तलावातील पाण्याचे प्रदूषण होण्यापासून रोखले होते. मात्र, हळूहळू सर्वत्र अनलॉक होत असल्याने  कारखान्यांमुळे खाडीतील पाणी प्रदुषित होऊ लागले आहे. भरतीच्या वेळी तर राडारोडा आणि केरकचरा खाडीकिनारी पसरत असल्याने जलचरांसह पर्यावरण आणि मानवी वस्तीला धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील बड्या अधिकाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरूच; तुकाराम मुंढे यांची बदली रद्द तलावांचे शहर असलेल्या ठाण्याला लाभलेल्या विस्तीर्ण खाडी किनाऱ्यामुळे शहराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. गेले काही महिने लॉकडाऊनमुळे खाडी निर्मळ आणि स्वच्छ झाली होती. त्यानंतर गणेशोत्सवातदेखील ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने केलेल्या पर्यावरणपुरक उपाययोजनामुळे खाडी व तलावातील प्रदुषण रोखण्यास मदत झाली. परंतु,आता टप्याटप्याने होत असलेल्या अनलॉकमुळे उद्योगव्यवसाय व कारखाने सुरू झाल्याने कारखान्यातील रसायने, सांडपाणी, मलमूत्र आदी थेट पाण्यात मिसळल्याने खाडी प्रदुषणाच्या खाईत लोटली गेली आहे. त्यामुळे खाडीतील प्राणवायू कमी होऊन मासे, खेकडे, कोळंबी, कासव, पाणसाप आदी जलचर प्रजाती तसेच, खारफुटी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे निरिक्षण पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.   अनलॉकनंतर सुरू झालेल्या उद्योग व्यवसायांमुळे खाडीचे पाणी प्रदुषित झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही ठाणे महापालिकेमार्फत खाडी संवर्धनाबाबतच्या उपाययोजना नियमितपणे राबवल्या जात आहेत. किंबहुना, भरतीच्या वेळांमध्ये खाडीकिनारी फेकलेला कचरा वाहत येत असल्यानेही प्रदुषणात भर पडण्याची शक्यता आहे. - मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण अधिकारी, महापालिका   कोरोनाच्या लॉकडाऊन काळात पर्यावरण स्वच्छ झाले होते. मात्र, आता अनलॉक होऊ लागल्याने वाहनांची वर्दळ वाढली असून हवेतील प्रदुषणात वाढ झाली आहे. गुरूवारी ठाणे खाडीत भरतीच्या पाण्यात केरकचरा व अनेक प्रदुषित घटक आढळले.  - भरत मोरे, पर्यावरण मित्र --------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3miN7AH

No comments:

Post a Comment