गहाण ठेवलेली कार परस्पर विकली नागपूर : मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने जवळ असलेली कार गहाण ठेवून दीड लाखाचे कर्ज १० टक्के व्याजाने घेतले. व्याज म्हणून ५० हजार रुपये परत केल्यावरसुद्धा आरोपीने परस्पर ती कार साथीदारांच्या मदतीने विकून फसवणूक केली. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. राजेश पुरुषोत्तम बोरकर (५१) रा. वंदना अपार्टमेंट, प्रतापनगर असे फिर्यादीचे नाव आहे.  प्राप्त माहितीनुसार, राजेश यांना मुलीच्या शिक्षणाकरिता पैशांची गरज होती. त्यांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी आपली इनोवा कार दर महिन्याकरिता १० टक्के व्याजाने आरोपी सतीश धारगावे, रा. आरमोर टाउनशिप, समता नगर याच्याकडे गहाण ठेवली. या कारची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी सिक्युरिटी म्हणून १०० रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर राजेश यांनी स्वाक्षरी केली. गाडीचे आरसी बुक आणि टीटीओ कोऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी केल्यावर त्याचे कागदपत्र दिले. त्यानंतर आरोपी सतीश धारगावे याने त्याच दिवशी राजेश यांना १ लाख ५० हजार रुपये दिले.  हेही वाचा : कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ! या व्याजाचे कर्जाची परतफेड म्हणून राजेश यांनी आरोपीला ५० हजार रुपये व्याजाचे परत केले. तरीसुद्धा आरोपी सतीश याने आपला साथीदार पायल मोटार्सचा एजंट अतुल इंगळे आणि नितीन धारगावे या दोघांच्या मदतीने राजेश यांची कार राजेंद्र दहीकर, रा. नंदनवन यांना विकून राजेश यांची फसवणूक केली. या प्रकरणी राजेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. संपादन - मेघराज मेश्राम  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 23, 2020

गहाण ठेवलेली कार परस्पर विकली नागपूर : मुलीच्या शिक्षणासाठी पैशांची अत्यंत गरज असल्याने जवळ असलेली कार गहाण ठेवून दीड लाखाचे कर्ज १० टक्के व्याजाने घेतले. व्याज म्हणून ५० हजार रुपये परत केल्यावरसुद्धा आरोपीने परस्पर ती कार साथीदारांच्या मदतीने विकून फसवणूक केली. ही घटना प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. राजेश पुरुषोत्तम बोरकर (५१) रा. वंदना अपार्टमेंट, प्रतापनगर असे फिर्यादीचे नाव आहे.  प्राप्त माहितीनुसार, राजेश यांना मुलीच्या शिक्षणाकरिता पैशांची गरज होती. त्यांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी आपली इनोवा कार दर महिन्याकरिता १० टक्के व्याजाने आरोपी सतीश धारगावे, रा. आरमोर टाउनशिप, समता नगर याच्याकडे गहाण ठेवली. या कारची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यावेळी सिक्युरिटी म्हणून १०० रुपयांच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर राजेश यांनी स्वाक्षरी केली. गाडीचे आरसी बुक आणि टीटीओ कोऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी केल्यावर त्याचे कागदपत्र दिले. त्यानंतर आरोपी सतीश धारगावे याने त्याच दिवशी राजेश यांना १ लाख ५० हजार रुपये दिले.  हेही वाचा : कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ! या व्याजाचे कर्जाची परतफेड म्हणून राजेश यांनी आरोपीला ५० हजार रुपये व्याजाचे परत केले. तरीसुद्धा आरोपी सतीश याने आपला साथीदार पायल मोटार्सचा एजंट अतुल इंगळे आणि नितीन धारगावे या दोघांच्या मदतीने राजेश यांची कार राजेंद्र दहीकर, रा. नंदनवन यांना विकून राजेश यांची फसवणूक केली. या प्रकरणी राजेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. संपादन - मेघराज मेश्राम  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iXQhrb

No comments:

Post a Comment