लढतो आहोत, हरणार नाही;पंतप्रधानांबरोबरील बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्धार  नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यात एक किंवा दोन दिवसांची टाळेबंदी परिणामकारक ठरतीय का, याचा फेरआढावा घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेमुळे येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि रुग्णवाढीचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल,’ असे मोदींना सांगितले. आम्ही लढतो आहोत, हरणार नाही, असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी मोदी म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी आणि व्यवहारही सुरु ठेवण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांवर अधिक लक्ष दिले जावे. राज्यांनी चाचण्या, रुग्ण शोध, उपचार, निरीक्षण याचा प्रभावी वापर करतानाच जनतेमध्येही जागरुकता निर्माण करावी. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आणून देताना मोदींनी जनतेमध्ये चाचण्यांबाबत अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांना दिला.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची माहिती देतानाच राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील, हे आम्ही पाहणार आहोत असे ते म्हणाले. कोविडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र के लोग बहादूर  ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असे सांगून पंतप्रधानांनी कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे उदाहरण दिले. नव्याने चष्मा लागल्यावर सुरुवातीला त्याचा त्रास होतो नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही. पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असे सांगितले.  उद्धव ठाकरे म्हणाले..  - दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणार  - राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था  - या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक  - खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले  - चाचण्यांचे दर नियंत्रित केले.  - गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या  - ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे.  - अनलॉक प्रक्रियेनंतर ९५ टक्के उद्योग सुरु  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 23, 2020

लढतो आहोत, हरणार नाही;पंतप्रधानांबरोबरील बैठकीत मुख्यमंत्र्यांचा निर्धार  नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यात एक किंवा दोन दिवसांची टाळेबंदी परिणामकारक ठरतीय का, याचा फेरआढावा घ्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेमुळे येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि रुग्णवाढीचा दर कमी झालेला आपल्याला दिसेल,’ असे मोदींना सांगितले. आम्ही लढतो आहोत, हरणार नाही, असा विश्‍वास ठाकरे यांनी व्यक्त केला.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भारतात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रतिनिधींबरोबर पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब , तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी मोदी म्हणाले की, संसर्ग रोखण्यासाठी आणि व्यवहारही सुरु ठेवण्यासाठी सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्रांवर अधिक लक्ष दिले जावे. राज्यांनी चाचण्या, रुग्ण शोध, उपचार, निरीक्षण याचा प्रभावी वापर करतानाच जनतेमध्येही जागरुकता निर्माण करावी. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आणून देताना मोदींनी जनतेमध्ये चाचण्यांबाबत अफवा पसरणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांना दिला.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधानांना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची माहिती देतानाच राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील, हे आम्ही पाहणार आहोत असे ते म्हणाले. कोविडनंतर देखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र के लोग बहादूर  ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असे सांगून पंतप्रधानांनी कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करून संसर्ग कमी केल्यास देशाच्या कोरोना आकडेवारीवर परिणाम होईल अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी मास्कची सवय कशी अंगी बाणवावी याविषयी बोलताना चष्म्याच्या सवयीचे उदाहरण दिले. नव्याने चष्मा लागल्यावर सुरुवातीला त्याचा त्रास होतो नंतर तो इतका सवयीचा भाग झाला आहे की आज त्याचा त्रास होत नाही. पंतप्रधानांना हे उदाहरण इतके आवडले की त्यांनी बैठकीच्या समारोपाच्या भाषणात ठाकरे यांनी दिलेल्या उदाहरणाचा उल्लेख केला व पुढील काळात मास्क ही आपली अपरिहार्यता आहे असे सांगितले.  उद्धव ठाकरे म्हणाले..  - दररोज दीड लाखापर्यंत चाचण्या वाढविणार  - राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलीआयसीयू व्यवस्था  - या लसीच्या वितरणाचे योग्य नियोजन आवश्यक  - खासगी रुग्णालयात ८० टक्के बेड्स राखीव ठेवणे बंधनकारक केले  - चाचण्यांचे दर नियंत्रित केले.  - गावोगावी कोरोना ग्राम दक्षता समित्या  - ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे.  - अनलॉक प्रक्रियेनंतर ९५ टक्के उद्योग सुरु  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2FY60Ih

No comments:

Post a Comment