कोणामुळे पडले महापालिकेच्या ॲम्बुलन्स यंत्रणेचे पितळ उघडे? वाचा सविस्तर नागपूर : महापालिकेने गाजावाजा करीत प्रत्येक झोनमध्ये चार ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. मात्र, नगरसेविका विद्या मडावी यांनी एका ऑक्सीजनची गरज असलेल्या बाधितांसाठी ॲम्बुलन्सकरिता फोन केल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेचे पितळ उघडे पडले. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिलेच, शिवाय पाऊण तासानंतरही चारपैकी एकही ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे हिंगण्यावरून ॲम्बुलन्स बोलावण्याची वेळ नगरसेविकेवर आली. या काळात बाधिताचा ऑक्सिजनच्या अभावाने मृत्यू झाला असता तर जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत बुधवारी २५ ॲम्बुलन्सची भर पडल्याने आता ६५ ॲम्बुलन्स आहेत. महापालिकेने प्रत्येक झोनसाठी चार ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे दहाही झोनमध्ये ॲम्बुलन्ससाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून तेथील फोन क्रमांकही जाहीर केले. ॲम्बुलन्सची गरज पडल्यास झोनमधील नियंत्रण कक्षात फोन करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र, ही संपूर्ण यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे काल, नगरसेविका विद्या मडावी यांच्या ॲम्बुलन्स मिळविण्याच्या अपयशी प्रयत्नातून दिसून आले. प्रभाग २९ मध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले. काल, शुक्रवारी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या मात्रेत घट झाली. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाने नगरसेविका विद्या मडावी यांच्याशी संपर्क साधून ॲम्बुलन्स व ऑक्सीजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करून मागितली. रुग्णाची गंभीर स्थिती बघता नगरसेविका विद्या मडावी यांनी हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्तांना फोन केला. त्यांनी झोनमधील नियंत्रण कक्षात फोन करण्याचा सल्ला दिल्याचे नगरसेविका मडावी यांनी सांगितले. नियंत्रण कक्षात फोन केल्यानंतर ॲम्बुलन्सबाबत अधिकाऱ्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्यानंतर लगेच पाठवतो, असे म्हणत फोन ठेवला. ॲम्बुलन्स न आल्याने पुन्हा फोन केला, परंंतु फोन घेण्याचे टाळण्यात आले. कोरोना कुणालाही होऊ शकतो. परंतु मृत्यूच होतो हे मनातून काढून टाका.. रुग्ण आणखी गंभीर होत असताना महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने मडावी संतप्त झाल्या. त्यांंनी १०८ क्रमांकावर फोन लावला. अखेर हिंगणा येथून ॲम्बुलन्स आली, परंतु त्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. रुग्णाने मदत मागितल्यानंतर जवळपास तीन तासांनी ॲम्बुलन्स मिळाली. या तीन तासांत रुग्णांचा मृत्यू झाला असता तर जबाबदारी कुणी घेतली असती? हीच काय महापालिकेची यंत्रणा असे प्रश्न निर्माण झाले आहे.   नगरसेविकेलाच फटका, सामान्य नागरिकांचे काय? नगरसेविका असताना अधिकारी मला उडवाउडवीचे उत्तर देतात, तेथे सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याचा अंदाज न लावलेलाच बरा, असे नगरसेविका विद्या मडावी म्हणाल्या. त्यांनी महापालिकेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 12, 2020

कोणामुळे पडले महापालिकेच्या ॲम्बुलन्स यंत्रणेचे पितळ उघडे? वाचा सविस्तर नागपूर : महापालिकेने गाजावाजा करीत प्रत्येक झोनमध्ये चार ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. मात्र, नगरसेविका विद्या मडावी यांनी एका ऑक्सीजनची गरज असलेल्या बाधितांसाठी ॲम्बुलन्सकरिता फोन केल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेचे पितळ उघडे पडले. नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने उडवाउडवीचे उत्तर दिलेच, शिवाय पाऊण तासानंतरही चारपैकी एकही ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे हिंगण्यावरून ॲम्बुलन्स बोलावण्याची वेळ नगरसेविकेवर आली. या काळात बाधिताचा ऑक्सिजनच्या अभावाने मृत्यू झाला असता तर जबाबदार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेत बुधवारी २५ ॲम्बुलन्सची भर पडल्याने आता ६५ ॲम्बुलन्स आहेत. महापालिकेने प्रत्येक झोनसाठी चार ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिल्याचा दावा केला होता. एवढेच नव्हे दहाही झोनमध्ये ॲम्बुलन्ससाठी नियंत्रण कक्ष स्थापन करून तेथील फोन क्रमांकही जाहीर केले. ॲम्बुलन्सची गरज पडल्यास झोनमधील नियंत्रण कक्षात फोन करण्याचे आवाहन महापालिकेने केले होते. मात्र, ही संपूर्ण यंत्रणा केवळ कागदावरच असल्याचे काल, नगरसेविका विद्या मडावी यांच्या ॲम्बुलन्स मिळविण्याच्या अपयशी प्रयत्नातून दिसून आले. प्रभाग २९ मध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले. काल, शुक्रवारी त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनच्या मात्रेत घट झाली. त्यामुळे या ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाने नगरसेविका विद्या मडावी यांच्याशी संपर्क साधून ॲम्बुलन्स व ऑक्सीजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध करून मागितली. रुग्णाची गंभीर स्थिती बघता नगरसेविका विद्या मडावी यांनी हनुमाननगर झोनच्या सहायक आयुक्तांना फोन केला. त्यांनी झोनमधील नियंत्रण कक्षात फोन करण्याचा सल्ला दिल्याचे नगरसेविका मडावी यांनी सांगितले. नियंत्रण कक्षात फोन केल्यानंतर ॲम्बुलन्सबाबत अधिकाऱ्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्यानंतर लगेच पाठवतो, असे म्हणत फोन ठेवला. ॲम्बुलन्स न आल्याने पुन्हा फोन केला, परंंतु फोन घेण्याचे टाळण्यात आले. कोरोना कुणालाही होऊ शकतो. परंतु मृत्यूच होतो हे मनातून काढून टाका.. रुग्ण आणखी गंभीर होत असताना महापालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याने मडावी संतप्त झाल्या. त्यांंनी १०८ क्रमांकावर फोन लावला. अखेर हिंगणा येथून ॲम्बुलन्स आली, परंतु त्यासाठी दोन तासांचा अवधी लागला. रुग्णाने मदत मागितल्यानंतर जवळपास तीन तासांनी ॲम्बुलन्स मिळाली. या तीन तासांत रुग्णांचा मृत्यू झाला असता तर जबाबदारी कुणी घेतली असती? हीच काय महापालिकेची यंत्रणा असे प्रश्न निर्माण झाले आहे.   नगरसेविकेलाच फटका, सामान्य नागरिकांचे काय? नगरसेविका असताना अधिकारी मला उडवाउडवीचे उत्तर देतात, तेथे सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याचा अंदाज न लावलेलाच बरा, असे नगरसेविका विद्या मडावी म्हणाल्या. त्यांनी महापालिकेच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35tRHWE

No comments:

Post a Comment