सावधान! मास्क न वापरणाऱ्यांवर आता पोलिसही करणार कारवाई  नागपूर : शहरात कोरोनाची स्थिती गंभीर असून दररोज बाधित रुग्ण तसेच बळींची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू असून, यात आता मनपा व पोलिसही एकत्र येऊन काम करणार आहे. मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर आता पोलिसही कारवाई करणार आहेत.  पोलिस आयुक्त कार्यालयात महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांवर बंधनाची गरज व्यक्त केली. मनपाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सोबत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता भर दिला जात आहे. पोलिस आयुक्तसुद्धा मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम सुरू करीत आहेत. पोलिस आयुक्तांसोबत ‘जनता कर्फ्यू’संदर्भात पण चर्चा झाली. कोरोनाविरोधात एकत्रित लढा उभारून कोरोनाला नागपुरातून हद्दपार करायचे, असेही बैठकीत ठरले. कोरोनायोद्धा असलेल्या पोलिसांना जर कोरोनाचे संक्रमण झाले तर त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भातही पावले उचलत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी या वेळी सांगितले.  हेही वाचा : कुख्यात आंबेकरच्या साम्राज्याला सुरुंग, मुहानगरपालिकेने केली ही मोठी कारवाई मास्क न लावणाऱ्या ५०१ जणांवर दंड  महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मास्क न लावता फिरणाऱ्या ५०१ जणांवर आज दंडात्मक कारवाई केली. एकाच दिवशी एक लाख रुपये दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ११३६ नागरिकांविरुदद्ध केलेल्या दंडात्मक कारवातून २ लाख २७ हजार रुपये वसूल करण्यात आले.  सोमवारी शोध पथकाने लक्ष्मीनगर झोनमध्ये २६, धरमपेठमध्ये १०२, हनुमाननगरमध्ये ४३, धंतोलीमध्ये ५२, नेहरूनगर झोनमध्ये ४० जणांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारला. गांधीबाग झोनअंतर्गत ३८, सतरंजीपुरा झोनमध्ये १८, लकडगंज ५०, आशीनगर ६२, मंगळवारी झोनमध्ये ६३ जणांवर कारवाई करण्यात आली. महापालिका मुख्यालयातही ७ जण मास्कशिवाय आढळून आले. संपादन-मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, September 7, 2020

सावधान! मास्क न वापरणाऱ्यांवर आता पोलिसही करणार कारवाई  नागपूर : शहरात कोरोनाची स्थिती गंभीर असून दररोज बाधित रुग्ण तसेच बळींची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रणासाठी प्रशासन स्तरावर प्रयत्न सुरू असून, यात आता मनपा व पोलिसही एकत्र येऊन काम करणार आहे. मास्क न वापरणे तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांवर आता पोलिसही कारवाई करणार आहेत.  पोलिस आयुक्त कार्यालयात महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोरोनावर नियंत्रणासाठी नागरिकांवर बंधनाची गरज व्यक्त केली. मनपाने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. सोबत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता भर दिला जात आहे. पोलिस आयुक्तसुद्धा मास्क न लावणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम सुरू करीत आहेत. पोलिस आयुक्तांसोबत ‘जनता कर्फ्यू’संदर्भात पण चर्चा झाली. कोरोनाविरोधात एकत्रित लढा उभारून कोरोनाला नागपुरातून हद्दपार करायचे, असेही बैठकीत ठरले. कोरोनायोद्धा असलेल्या पोलिसांना जर कोरोनाचे संक्रमण झाले तर त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भातही पावले उचलत असल्याचे महापौर संदीप जोशी यांनी या वेळी सांगितले.  हेही वाचा : कुख्यात आंबेकरच्या साम्राज्याला सुरुंग, मुहानगरपालिकेने केली ही मोठी कारवाई मास्क न लावणाऱ्या ५०१ जणांवर दंड  महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी मास्क न लावता फिरणाऱ्या ५०१ जणांवर आज दंडात्मक कारवाई केली. एकाच दिवशी एक लाख रुपये दंड वसूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत ११३६ नागरिकांविरुदद्ध केलेल्या दंडात्मक कारवातून २ लाख २७ हजार रुपये वसूल करण्यात आले.  सोमवारी शोध पथकाने लक्ष्मीनगर झोनमध्ये २६, धरमपेठमध्ये १०२, हनुमाननगरमध्ये ४३, धंतोलीमध्ये ५२, नेहरूनगर झोनमध्ये ४० जणांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंड आकारला. गांधीबाग झोनअंतर्गत ३८, सतरंजीपुरा झोनमध्ये १८, लकडगंज ५०, आशीनगर ६२, मंगळवारी झोनमध्ये ६३ जणांवर कारवाई करण्यात आली. महापालिका मुख्यालयातही ७ जण मास्कशिवाय आढळून आले. संपादन-मेघराज मेश्राम   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3h8PNwP

No comments:

Post a Comment