कुणी केला पोलिसांसह गोरगरीबांचाही कोरोनापासून बचाव? वाचा सविस्तर नागपूर : कोरोनामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. या भयग्रस्त वातावरणात डॉ. राजेश मुरकुटे गरिबांना बचावासाठी मोफत आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करीत करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते स्वतःचे क्लिनिक सांभाळत ही मोहीम राबवीत आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनला दर महिन्याला ते आवश्यक तेवढ्या गोळ्या पुरवीत आहेत. शहरात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून पोलिसांच्या बचावासाठी डॉ. राजेश मुरकुटे त्यांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करणे सुरू केला. सुरुवातीला महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही त्यांनी डोज दिले. पोलिसांना औषध देण्याची त्यांची मोहीम अद्यापही सुरू आहे. शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये गोळ्यांचे वाटप केल्यानंतर नुकताच त्यांनी भरोसा सेलमध्येही गोळ्यांचे वितरण केले. महाल, सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. आंबेडकर चौक आणि बर्डी येथील तीन क्लिनिकचा भार सांभाळतानाच ते १२ ते १३ तास राबत आहेत. शहरातील मोठे उद्योजक, पोलिस व इतर विभागातील उच्चपदस्थ अधिकारी त्याच्याकडून नियमित आरोग्याचा सल्ला तसेच औषधी घेतात. उद्योजक, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा उपचार करतानाच डॉ. मुरकुटे गरीबांसाठीही तेवढ्याच मायेने वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये उद्योजक, अधिकाऱ्यांप्रमाणे गरीब नागरिकही जातात. अनेकदा या गरिबांवर ते मोफत उपचार करतात, त्यांना रोग प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या देतात. अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर एवढेच नव्हे एखादा गंभीर गरीब रुग्ण असेल तर फळ आदी खरेदीसाठी जवळचे पैसेही देऊन माणुसकी जपत आहेत. मदतीदरम्यान स्वतःला कोरोनाची लागण होईल, याकडेही ते दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कोरोना होईल, या भीतीने काम केले तर लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भीती न बाळगता गरजूंना आनंदाने सेवा देत असल्याचे डॉ. मुरकुटे यांनी सांगितले. उपचारासाठी हॉस्पिटल सुरू करणार शहरात हॉस्पिटल्सच्याबाबत पूर्व नागपूर खूप माघारलेले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गरीब नागरिक आहेत. त्यांना माफक दरात किंवा खूपच गरीब असेल तर मोफतही आरोग्य सेवा देता यावी, यासाठी हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. मुरकुटे यांनी नमूद केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 11, 2020

कुणी केला पोलिसांसह गोरगरीबांचाही कोरोनापासून बचाव? वाचा सविस्तर नागपूर : कोरोनामुळे संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. या भयग्रस्त वातावरणात डॉ. राजेश मुरकुटे गरिबांना बचावासाठी मोफत आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करीत करीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते स्वतःचे क्लिनिक सांभाळत ही मोहीम राबवीत आहेत. एवढेच नव्हे तर शहरातील प्रत्येक पोलिस स्टेशनला दर महिन्याला ते आवश्यक तेवढ्या गोळ्या पुरवीत आहेत. शहरात कोरोनाचा प्रवेश झाल्यापासून पोलिसांच्या बचावासाठी डॉ. राजेश मुरकुटे त्यांना रोगप्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करणे सुरू केला. सुरुवातीला महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनाही त्यांनी डोज दिले. पोलिसांना औषध देण्याची त्यांची मोहीम अद्यापही सुरू आहे. शहरातील सर्व पोलिस स्टेशनमध्ये गोळ्यांचे वाटप केल्यानंतर नुकताच त्यांनी भरोसा सेलमध्येही गोळ्यांचे वितरण केले. महाल, सेंट्रल एव्हेन्यूवरील डॉ. आंबेडकर चौक आणि बर्डी येथील तीन क्लिनिकचा भार सांभाळतानाच ते १२ ते १३ तास राबत आहेत. शहरातील मोठे उद्योजक, पोलिस व इतर विभागातील उच्चपदस्थ अधिकारी त्याच्याकडून नियमित आरोग्याचा सल्ला तसेच औषधी घेतात. उद्योजक, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा उपचार करतानाच डॉ. मुरकुटे गरीबांसाठीही तेवढ्याच मायेने वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्या क्लिनिकमध्ये उद्योजक, अधिकाऱ्यांप्रमाणे गरीब नागरिकही जातात. अनेकदा या गरिबांवर ते मोफत उपचार करतात, त्यांना रोग प्रतिकार क्षमता वाढविणाऱ्या गोळ्या देतात. अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर एवढेच नव्हे एखादा गंभीर गरीब रुग्ण असेल तर फळ आदी खरेदीसाठी जवळचे पैसेही देऊन माणुसकी जपत आहेत. मदतीदरम्यान स्वतःला कोरोनाची लागण होईल, याकडेही ते दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. कोरोना होईल, या भीतीने काम केले तर लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भीती न बाळगता गरजूंना आनंदाने सेवा देत असल्याचे डॉ. मुरकुटे यांनी सांगितले. उपचारासाठी हॉस्पिटल सुरू करणार शहरात हॉस्पिटल्सच्याबाबत पूर्व नागपूर खूप माघारलेले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गरीब नागरिक आहेत. त्यांना माफक दरात किंवा खूपच गरीब असेल तर मोफतही आरोग्य सेवा देता यावी, यासाठी हॉस्पिटल सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. मुरकुटे यांनी नमूद केले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32kyULu

No comments:

Post a Comment