हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई ! औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे काही हॉस्पिटलचा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. वारंवारच्या या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या हॉस्पिटलला दंड लावला जात आहे. मात्र यापुढे ज्या भागातील हॉस्‍पिटलचा कचरा रस्त्यावर आढळून येईल, त्या भागातील स्वच्छता निरीक्षक, जवानांनाही दंड लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणे व हा कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोचता करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. तसेच हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी आहे. मात्र काही हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. विशेष म्हणजे यात कोरोना उपाययोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या पार्श्‍वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक मुरली रेड्डी व हर्ष रेड्डी व विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, सचिन भालेराव, नागरिक मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ज्या भागात हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्या झोनचे जवान, स्वच्छता निरीक्षक यांना दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्वरित नागरिक मित्र पथकाला माहिती द्यावी, हे पथक संबंधित हॉस्पिटलला दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक एक, दोन व तीनचा सुका कचरा सेंट्रल नाका येथे न्यावा. प्रभाग चार, पाचचा चिकलठाणा प्रक्रिया केंद्र, प्रभाग सहामधील रामनगर-विठ्ठलनगर येथे तर प्रभाग ससात, आठ व नऊमधील सुका कचरा कांचनवाडी येथे नेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बैठकीतील निर्णय  -बायोमेडिकल वेस्ट घरगुती कचऱ्यासोबत घ्यायचे नाही.  -ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे प्रमाण वाढवावे.  -प्रत्येक वॉर्डातून शंभर टक्के वर्गीकरण करून कचरा उचलावा.  -झोनअंतर्गत आवश्यकतेनुसार घंटागाड्यांची संख्या वाढवावी.  -प्रत्येक घंटागाडीवरील सर्व भोंगे चालू ठेवणे.    (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 30, 2020

हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर आला, तर जवानांवर होणार कारवाई ! औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे काही हॉस्पिटलचा कचरा थेट रस्त्यावर येत आहे. वारंवारच्या या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या हॉस्पिटलला दंड लावला जात आहे. मात्र यापुढे ज्या भागातील हॉस्‍पिटलचा कचरा रस्त्यावर आढळून येईल, त्या भागातील स्वच्छता निरीक्षक, जवानांनाही दंड लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करणे व हा कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत पोचता करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. तसेच हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्ट जमा करण्यासाठी स्वतंत्र एजन्सी आहे. मात्र काही हॉस्पिटलचा कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. विशेष म्हणजे यात कोरोना उपाययोजनांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या पार्श्‍वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी रेड्डी कंपनीचे व्यवस्थापक मुरली रेड्डी व हर्ष रेड्डी व विभागीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात, सचिन भालेराव, नागरिक मित्र पथकाचे प्रमोद जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ज्या भागात हॉस्पिटलचे बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्या झोनचे जवान, स्वच्छता निरीक्षक यांना दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला. बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर सापडल्यास त्वरित नागरिक मित्र पथकाला माहिती द्यावी, हे पथक संबंधित हॉस्पिटलला दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच प्रभाग क्रमांक एक, दोन व तीनचा सुका कचरा सेंट्रल नाका येथे न्यावा. प्रभाग चार, पाचचा चिकलठाणा प्रक्रिया केंद्र, प्रभाग सहामधील रामनगर-विठ्ठलनगर येथे तर प्रभाग ससात, आठ व नऊमधील सुका कचरा कांचनवाडी येथे नेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. बैठकीतील निर्णय  -बायोमेडिकल वेस्ट घरगुती कचऱ्यासोबत घ्यायचे नाही.  -ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याचे प्रमाण वाढवावे.  -प्रत्येक वॉर्डातून शंभर टक्के वर्गीकरण करून कचरा उचलावा.  -झोनअंतर्गत आवश्यकतेनुसार घंटागाड्यांची संख्या वाढवावी.  -प्रत्येक घंटागाडीवरील सर्व भोंगे चालू ठेवणे.    (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/34blu49

No comments:

Post a Comment