आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन विशेष : 'आस्था' ने दिला हक्काचा निवारा  औरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तरुणांना घरातील जेष्ठ व्यक्तींना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. या ज्येष्ठांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी ‘आनंददायी वृद्धापकाळ’ ही संकल्पना घेवून आस्था फाऊंडेशन सेवाभावी संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! अपुरा पोषक आहार, परावलंबित्व, एकटेपणा, घरात मिळणारी वागणूक असे ज्येष्ठांचे अनेक प्रश्न असतात. वृद्धापकाळातील स्मृतीविषयक मोठ्या तक्रारी असतात. यात सौम्य विसराळूपणा ते तीव्र स्वरूपाचे स्मृतिभ्रंशासारखे आजार आढळून येतात. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठांची परवड होते. घरातील तरुणमंडळीकडून या ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करतात. या बदलांचे भान विचारात घेऊन १२ वर्षांपूर्वी काही तरुणांनी एकत्र येवून आस्था फाउंडेशनची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्था वृद्धांसाठी हक्काचा निवारा बनले आहे. संस्थेचे विश्वस्त सुनील अग्रवाल यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेला तीन एकर जागा दान दिली. या जागेवर ‘बसंतप्रभा विसावा’ ही वास्तू वृद्धांसाठी उभारली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कोरोनाकाळात शास्त्रशुद्ध काळजी  नव्याने वृद्धाश्रमात दाखल होणाऱ्या ज्येष्ठांना त्यांच्या आजाराची कल्पना दिली जाते. तिथे रहाणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठांचे नियमित पल्स, तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासली जाते. घरातील प्रत्येकाला मास्क, सॅनेटायझर, देवून त्याचा उपयोग कसा करावा याबाबत माहिती दिली जाते. आस्थाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य घराला नियमित भेट देवून वृद्धांचे मनोबल वाढवितात. सर्व आजी-आजोबांशी संवाद साधतात. संपूर्ण परीसर निर्जंतुक केले जात असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनिता तगारे यांनी सांगीतले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वृद्धांसाठी उपक्रम  शारीरिक आरोग्यासोबत या सर्वांची विचारातील सकारात्मकता, मनोबल वाढविण्यासाठी वर्षभरातील सण समारंभ पण साजरे केले जातात. यात संक्रांतीला पतंग उडविणे, १५ ऑगस्टला देशभक्तीपर गीते, गणपती उत्सव, बागकाम, संगीत, वेगवेगळे खेळ घेतले जातात.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सकाळ’च्या बातमीचा केला पाठपुरावा  ८५ वर्षाच्या पटवर्धन दांम्पत्याला हैदराबाद येथील आश्रमातून बाहेर काढण्यात आले होते. कोरोनाच्या काळात या दांम्पत्यांना कुठेही आधार मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी परवड ‘सकाळ’मधून प्रकाशित करण्यात आली होती. नंतर या दाम्पत्याची ‘आस्था फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने जबाबदारी घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून सन्मानपूर्वक आस्थाच्या घरात प्रवेश दिला.    (संंपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 30, 2020

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिन विशेष : 'आस्था' ने दिला हक्काचा निवारा  औरंगाबाद : आजच्या तरुण पिढीला मानसिक ताणतणाव, नोकरी व्यवसायातील अस्थिरता, बदल्या, परदेशी वास्तव्य, आर्थिक नियोजनाची ओढाताण, संसार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तरुणांना घरातील जेष्ठ व्यक्तींना वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. या ज्येष्ठांना वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी ‘आनंददायी वृद्धापकाळ’ ही संकल्पना घेवून आस्था फाऊंडेशन सेवाभावी संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..! अपुरा पोषक आहार, परावलंबित्व, एकटेपणा, घरात मिळणारी वागणूक असे ज्येष्ठांचे अनेक प्रश्न असतात. वृद्धापकाळातील स्मृतीविषयक मोठ्या तक्रारी असतात. यात सौम्य विसराळूपणा ते तीव्र स्वरूपाचे स्मृतिभ्रंशासारखे आजार आढळून येतात. त्यामुळे अनेकदा ज्येष्ठांची परवड होते. घरातील तरुणमंडळीकडून या ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करतात. या बदलांचे भान विचारात घेऊन १२ वर्षांपूर्वी काही तरुणांनी एकत्र येवून आस्था फाउंडेशनची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्था वृद्धांसाठी हक्काचा निवारा बनले आहे. संस्थेचे विश्वस्त सुनील अग्रवाल यांनी वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संस्थेला तीन एकर जागा दान दिली. या जागेवर ‘बसंतप्रभा विसावा’ ही वास्तू वृद्धांसाठी उभारली आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कोरोनाकाळात शास्त्रशुद्ध काळजी  नव्याने वृद्धाश्रमात दाखल होणाऱ्या ज्येष्ठांना त्यांच्या आजाराची कल्पना दिली जाते. तिथे रहाणाऱ्या प्रत्येक ज्येष्ठांचे नियमित पल्स, तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासली जाते. घरातील प्रत्येकाला मास्क, सॅनेटायझर, देवून त्याचा उपयोग कसा करावा याबाबत माहिती दिली जाते. आस्थाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र वैद्य घराला नियमित भेट देवून वृद्धांचे मनोबल वाढवितात. सर्व आजी-आजोबांशी संवाद साधतात. संपूर्ण परीसर निर्जंतुक केले जात असल्याचे वरिष्ठ व्यवस्थापक सुनिता तगारे यांनी सांगीतले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. वृद्धांसाठी उपक्रम  शारीरिक आरोग्यासोबत या सर्वांची विचारातील सकारात्मकता, मनोबल वाढविण्यासाठी वर्षभरातील सण समारंभ पण साजरे केले जातात. यात संक्रांतीला पतंग उडविणे, १५ ऑगस्टला देशभक्तीपर गीते, गणपती उत्सव, बागकाम, संगीत, वेगवेगळे खेळ घेतले जातात.  औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. ‘सकाळ’च्या बातमीचा केला पाठपुरावा  ८५ वर्षाच्या पटवर्धन दांम्पत्याला हैदराबाद येथील आश्रमातून बाहेर काढण्यात आले होते. कोरोनाच्या काळात या दांम्पत्यांना कुठेही आधार मिळत नसल्यामुळे त्यांची होणारी परवड ‘सकाळ’मधून प्रकाशित करण्यात आली होती. नंतर या दाम्पत्याची ‘आस्था फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेने जबाबदारी घेतली. त्यांची वैद्यकीय तपासणी करून सन्मानपूर्वक आस्थाच्या घरात प्रवेश दिला.    (संंपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3l0ZzDt

No comments:

Post a Comment