अन् ‘तपस्या` सोडून मुंढे निघाले! वाचा सविस्तर नागपूर : नागपूरकरांना कोरोनाच्या मिठीतून सोडविण्यासाठी गेली सात महिने जणू तपस्या करणारे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सकाळी कुटुंबीयांसह बंगला सोडला. मुंढे यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांची गर्दी नागपूरकरांनी प्रथमच अनुभवली. कोरोनावर नियंत्रणासाठी मध्यरात्रीपर्यंत मुंढे यांनी ज्या बंगल्यात सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेतले, तोच ‘तपस्या` बंगला सोडताना त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तीही पुढे आला. ‘गुड बाय एनएमसी, थॅंक्यू नागपूरकर' असे भावनिक होऊन ते आज मुंबईला रवाना झाले. मुंढे आज सकाळी नऊ वाजत मुंबईला रवाना होणार असल्याचे वृत्त कालपासूनच त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचले. आज सकाळी सिव्हिल लाइन येथील आयुक्तांच्या ‘तपस्या` बंगल्यावर त्यांच्या चाहत्यांनी सकाळी सहा वाजतापासून गर्दी केली. त्यांच्या शिस्तप्रियतेमुळे तपस्या बंगलाही चांगलाच चर्चेत आला. याच बंगल्यात त्यांनी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर १४ दिवस विलगीकरणाचा अवधीही पूर्ण केला. शहरासंबंधी अनेक निर्णयाची सुरुवात याच तपस्यातून झाली. मुंढे यांना भेटण्यासाठी अनेकांनी तपस्यात जाण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. त्यामुळे पोलिसांची दमछाक झाली. नऊ वाजेपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूने चाहते मुंढे यांच्या समर्थनार्थ फलक घेऊन उभे झाले. चाहत्यांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने घोषणाबाजी थांबविण्याची विनंती केली. मात्र पुन्हा जोरदार घोषणा सुरू झाल्या. काही वेळातच रवाना होण्यासाठी मुंढे कुटुंबीयांसह बाहेर पडले. ते प्रवेशद्वारातून बाहेर येताच अनेकांनी त्यांच्या पाया पडण्यास सुरुवात केली, काहींनी त्यांना आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. काहींनी फलक घेऊन नागपूर वाचवा, जाऊ नका, अशी साद दिली. मुंढे गाडीकडे जात असताना काहींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर तरुणाईने पुष्प संपताच पुन्हा रविनगर चौकात धाव घेतली. पुन्हा फुले आणली, मुंढे यांच्यावर वर्षाव केला. मोठ्या प्रमाणात घोषणा सुरू असल्याने मुंढे यांनी नागरिकांना घोषणा बंद करण्यास सांगितले. अखेर मुंढे कुटुंबीयांसह गाडीत बसले, त्यावेळी नागरिक त्यांच्या वाहनांकडे धावले. अनेकांनी वाहनाभोवती गराडा घातला. त्यामुळे आयुक्तांच्या ‘तपस्या` बंगल्यापासून लॉ कॉलेज चौकापर्यंत मुंढे यांची गाडी पोहोचण्यास अर्धा तास लागला. मुंढे जाताच सुरू केले राष्ट्रगीत मुंढे यांची गाडी पुढे गेल्यानंतर सारेच स्तब्ध चेहऱ्याने मार्गाकडे पाहत होते. त्याचवेळी पोलिस गर्दी आवरण्याचा प्रयत्न करीत होते. मुंढेंची गाडी चौकापर्यंत जाताच काही तरुणांनी मोबाईलवरून राष्ट्रगीत सुरू केले. त्यामुळे पोलिसांसह सर्वच स्तब्ध उभे राहिले. बंगल्यातील कर्मचारी कुटुंबीयांसह गेल्या सात महिन्यांपासून मुंढे यांच्या कुटुंबांसोबत रमलेले बंगल्यातील कर्मचारीही भावुक झाले. बंगल्यातील अनेक कर्मचारी कुटुंबीयांसह मुंढे यांना निरोप देण्यासाठी आले. यावेळी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मुंढे यांच्या पाया पडले तर काहींनी त्यांच्यासोबत फोटो काढून आठवणी जपून ठेवल्या. पोलिस व्हॅनमध्ये सारे उत्स्फूर्तपणे चढले नागरिक जुमानत नसल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली. यावेळी मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करीत असलेल्या काही तरुणांना पोलिसांनी व्हॅनमध्ये टाकले. त्याचवेळी इतर नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे व्हॅनमध्ये बसण्यास तयार झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले. मुंढे म्हणाले... आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही. कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतल्याचे त्यांनी पोस्ट केले News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 11, 2020

अन् ‘तपस्या` सोडून मुंढे निघाले! वाचा सविस्तर नागपूर : नागपूरकरांना कोरोनाच्या मिठीतून सोडविण्यासाठी गेली सात महिने जणू तपस्या करणारे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज सकाळी कुटुंबीयांसह बंगला सोडला. मुंढे यांना निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चाहत्यांची गर्दी नागपूरकरांनी प्रथमच अनुभवली. कोरोनावर नियंत्रणासाठी मध्यरात्रीपर्यंत मुंढे यांनी ज्या बंगल्यात सर्व घटकांचा विचार करून निर्णय घेतले, तोच ‘तपस्या` बंगला सोडताना त्यांच्यातील संवेदनशील व्यक्तीही पुढे आला. ‘गुड बाय एनएमसी, थॅंक्यू नागपूरकर' असे भावनिक होऊन ते आज मुंबईला रवाना झाले. मुंढे आज सकाळी नऊ वाजत मुंबईला रवाना होणार असल्याचे वृत्त कालपासूनच त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचले. आज सकाळी सिव्हिल लाइन येथील आयुक्तांच्या ‘तपस्या` बंगल्यावर त्यांच्या चाहत्यांनी सकाळी सहा वाजतापासून गर्दी केली. त्यांच्या शिस्तप्रियतेमुळे तपस्या बंगलाही चांगलाच चर्चेत आला. याच बंगल्यात त्यांनी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर १४ दिवस विलगीकरणाचा अवधीही पूर्ण केला. शहरासंबंधी अनेक निर्णयाची सुरुवात याच तपस्यातून झाली. मुंढे यांना भेटण्यासाठी अनेकांनी तपस्यात जाण्यासाठी पोलिसांकडे आग्रह धरला. त्यामुळे पोलिसांची दमछाक झाली. नऊ वाजेपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूने चाहते मुंढे यांच्या समर्थनार्थ फलक घेऊन उभे झाले. चाहत्यांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने घोषणाबाजी थांबविण्याची विनंती केली. मात्र पुन्हा जोरदार घोषणा सुरू झाल्या. काही वेळातच रवाना होण्यासाठी मुंढे कुटुंबीयांसह बाहेर पडले. ते प्रवेशद्वारातून बाहेर येताच अनेकांनी त्यांच्या पाया पडण्यास सुरुवात केली, काहींनी त्यांना आलिंगन देण्याचा प्रयत्न केला. काहींनी फलक घेऊन नागपूर वाचवा, जाऊ नका, अशी साद दिली. मुंढे गाडीकडे जात असताना काहींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अखेर मुंढेंच्या मनासारखे काय झाले? वाचा सविस्तर तरुणाईने पुष्प संपताच पुन्हा रविनगर चौकात धाव घेतली. पुन्हा फुले आणली, मुंढे यांच्यावर वर्षाव केला. मोठ्या प्रमाणात घोषणा सुरू असल्याने मुंढे यांनी नागरिकांना घोषणा बंद करण्यास सांगितले. अखेर मुंढे कुटुंबीयांसह गाडीत बसले, त्यावेळी नागरिक त्यांच्या वाहनांकडे धावले. अनेकांनी वाहनाभोवती गराडा घातला. त्यामुळे आयुक्तांच्या ‘तपस्या` बंगल्यापासून लॉ कॉलेज चौकापर्यंत मुंढे यांची गाडी पोहोचण्यास अर्धा तास लागला. मुंढे जाताच सुरू केले राष्ट्रगीत मुंढे यांची गाडी पुढे गेल्यानंतर सारेच स्तब्ध चेहऱ्याने मार्गाकडे पाहत होते. त्याचवेळी पोलिस गर्दी आवरण्याचा प्रयत्न करीत होते. मुंढेंची गाडी चौकापर्यंत जाताच काही तरुणांनी मोबाईलवरून राष्ट्रगीत सुरू केले. त्यामुळे पोलिसांसह सर्वच स्तब्ध उभे राहिले. बंगल्यातील कर्मचारी कुटुंबीयांसह गेल्या सात महिन्यांपासून मुंढे यांच्या कुटुंबांसोबत रमलेले बंगल्यातील कर्मचारीही भावुक झाले. बंगल्यातील अनेक कर्मचारी कुटुंबीयांसह मुंढे यांना निरोप देण्यासाठी आले. यावेळी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मुंढे यांच्या पाया पडले तर काहींनी त्यांच्यासोबत फोटो काढून आठवणी जपून ठेवल्या. पोलिस व्हॅनमध्ये सारे उत्स्फूर्तपणे चढले नागरिक जुमानत नसल्याने पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवावी लागली. यावेळी मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करीत असलेल्या काही तरुणांना पोलिसांनी व्हॅनमध्ये टाकले. त्याचवेळी इतर नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे व्हॅनमध्ये बसण्यास तयार झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना सोडून दिले. मुंढे म्हणाले... आयुक्त म्हणून कर्तव्य बजावलेला सात महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप काही शिकविणारा ठरला. या काळातील अनुभव आयुष्यभरासाठी शिदोरी म्हणून कामात येईल, यात शंका नाही. कठोर निर्णय घेतले. त्यावर टीका झाली. काही कटू अनुभव असतीलही; मात्र त्यातूनही बोध घेतल्याचे त्यांनी पोस्ट केले News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bQsKpl

No comments:

Post a Comment