'मातृवंदना' महिलांसाठी ठरतेय वरदान !  औरंगाबाद : प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बाल मृत्यूचे प्रमाण टाळता यावे म्हणून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना आता गर्भवती महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी केले आहे. मातृ वंदना योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने त्यांच्या वैयक्तीक बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यावर जमा करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   तीन टप्प्यात मातांना मिळते मदत  योजनेंतर्गत पहिल्या जिवंत बाळाकरिता गरोदर मातेस बुडीत मजुरीचा लाभ म्हणुन रू.५ हजार देण्यात येतात. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत ६० हजार ७४४ महिलांच्या खात्यात हा निधी जमा झाला असून पहिल्या आपत्यासाठी गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकर म्हणजे १०० दिवसाच्या आत नोंदणी करताच १ हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर परंतू किमान गरोदरपणास एक तपासणी झाल्यानंतर रू. २ हजार व तिसऱ्या टप्प्यात तिसरा हप्ता बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर तसेच बाळाला १४ आठवड्यापर्यंत किमान बी.सी.जी., ओ.पी.व्ही., डी.पी.टी,पेन्टाहॅलेंट आणि हिपॅटायटीसचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर रू. २ हजार अखेरचा टप्पा दिला जातो असे डॉ. गंडाळ यांनी स्पष्ट केले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ग्रामीणभागासह शहरी भागातील मातां मिळतो लाभ  या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पद्धतीने त्यांच्या वैयक्तीक बँक अथवा पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येत असल्याने लॉकडाऊनच्या काळात गरोदर मातांसाठी ही मदत लाख मोलाची ठरली असल्याचा दावा डॉ. गंडाळ यांनी केला आहे. ही योजना केवळ सध्या ग्रामीण भागांपुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागाप्रमाणेच नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील राबविण्यात येत असल्याचेही डॉ. गंडाळ यांनी सांगितले.    (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 8, 2020

'मातृवंदना' महिलांसाठी ठरतेय वरदान !  औरंगाबाद : प्रत्येक मातेची सुरक्षित प्रसूती व्हावी आणि बाल मृत्यूचे प्रमाण टाळता यावे म्हणून प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना आता गर्भवती महिलांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त गरोदर मातांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ यांनी केले आहे. मातृ वंदना योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ थेट हस्तांतरण पद्धतीने त्यांच्या वैयक्तीक बँक किंवा पोस्ट ऑफिस बचत खात्यावर जमा करण्यात येतात असेही त्यांनी सांगितले.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   तीन टप्प्यात मातांना मिळते मदत  योजनेंतर्गत पहिल्या जिवंत बाळाकरिता गरोदर मातेस बुडीत मजुरीचा लाभ म्हणुन रू.५ हजार देण्यात येतात. नोकरदार महिला वगळता सर्व स्तरातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत ६० हजार ७४४ महिलांच्या खात्यात हा निधी जमा झाला असून पहिल्या आपत्यासाठी गरोदर मातांना पाच हजारांची मदत तीन टप्प्यात अदा केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा. पहिल्या टप्प्यात गरोदरपणाची लवकर म्हणजे १०० दिवसाच्या आत नोंदणी करताच १ हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यानंतर परंतू किमान गरोदरपणास एक तपासणी झाल्यानंतर रू. २ हजार व तिसऱ्या टप्प्यात तिसरा हप्ता बाळाच्या जन्माची नोंद झाल्यानंतर तसेच बाळाला १४ आठवड्यापर्यंत किमान बी.सी.जी., ओ.पी.व्ही., डी.पी.टी,पेन्टाहॅलेंट आणि हिपॅटायटीसचे प्राथमिक लसीकरण झाल्यानंतर रू. २ हजार अखेरचा टप्पा दिला जातो असे डॉ. गंडाळ यांनी स्पष्ट केले.  देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा ग्रामीणभागासह शहरी भागातील मातां मिळतो लाभ  या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थींना लाभ हा थेट हस्तांतरण पद्धतीने त्यांच्या वैयक्तीक बँक अथवा पोस्ट ऑफिस खात्यावर जमा करण्यात येत असल्याने लॉकडाऊनच्या काळात गरोदर मातांसाठी ही मदत लाख मोलाची ठरली असल्याचा दावा डॉ. गंडाळ यांनी केला आहे. ही योजना केवळ सध्या ग्रामीण भागांपुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागाप्रमाणेच नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका क्षेत्रामध्ये देखील राबविण्यात येत असल्याचेही डॉ. गंडाळ यांनी सांगितले.    (संपादन-प्रताप अवचार) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Zf0UOH

No comments:

Post a Comment