भारत-चीन तणाव निवळणार; ‘पंचसूत्री’वर झाली सहमती नवी दिल्ली - सीमावादावरून भारत आणि चीनदरम्यान टोकाला पोहोचलेला तणाव परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीनंतर निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सीमेवरील शांततेसाठी संवाद, दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये सुरक्षित अंतर, सर्वोच्च नेत्यांमधील सहमतीचा आधार, परस्पर विश्वासवृद्धी आणि विशेष प्रतिनिधी पातळीवरील वाटाघाटी सुरू ठेवणे या पंचसूत्रीवर भारत आणि चीनची सहमती झाली आहे. दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान लष्करी पातळीवर आज पुन्हा सुमारे चार तास चर्चा झाली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मॉस्कोत शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने काल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात सीमावादावर चर्चा झाली.  तसेच भारत, चीन व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही स्वतंत्र बैठक मॉस्कोमध्ये झाली. चिनी सैन्याची आतापर्यंतची आक्रस्ताळी भूमिका पाहता भारतीय भूमीवरून माघार आणि ताबारेषेवर एप्रिल पूर्वीची स्थिती कायम करण्यावर भारताचा भर आहे.  धक्कादायक! देशात मे महिन्यात होते ६४ लाख रुग्ण; ICMR सिरो सर्वेक्षणाची माहिती पॅंगाँग सरोवराच्या फिंगर क्षेत्रात घुसखोरीनंतर चिनी सैन्याचा आडमुठेपणा आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने दक्षिण भागात सामरिकदृष्ट्या मोक्याच्या जागांवर सैन्य तैनात करून चीनला धक्का दिला. सोबतच फिंगर चार क्षेत्रातही महत्त्वाच्या सुळक्यांवर भारतीय सैन्याने आपली पकड मजबूत करतानाच चीनला चर्चेसाठी येण्यास भाग पाडल्याचे सामरिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंतच्या चर्चांतून तणाव कमी करण्याबाबत तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. या निर्णायक बैठकीमुळे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचा दरवाजा काहीसा किलकिला झाला आहे. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करून सीमावादावरील ‘पंचसूत्री’वर सहमती व्यक्त केली. मोदी सरकारला मोठा झटका; ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समधून भारत 100 मधून बाहेर चीनचा कांगावा सुरूच दोन महाकाय शेजारी देश असलेल्या भारत आणि चीनला संघर्षाची, संशयाची नव्हे तर परस्पर सहकार्याची आणि विश्वासाची आवश्यकता आहे, अशी सारवासारव चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केली आहे. दोन्ही देशांचे संबंध दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचा दावा करताना सीमेवर गोळीबार किंवा तत्सम प्रक्षोभक कारवाया रोखण्याची तातडीने निकड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच, घुसखोरी केलेल्या सर्व सैनिकांनी उपकरणांसह तातडीने मागे जाणे आवश्यक आहे, तसेच समोरासमोर उभ्या ठाकलेल्या सैन्यतुकड्यांनी तणाव कमी करण्यासाठी त्वरित माघार घ्यावी, अशी मखलाशी करताना वांग यी यांनी चिनी सैन्याच्या माघारीबाबत थेट उल्लेख निवेदनात टाळला आहे.  भारताने ठणकावले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर भारताची बाजू ठाम शब्दात मांडली. ‘‘ताबारेषेजवळ घातक शस्त्रांसह मोठ्या संख्येने जमा झालेला चिनी फौजफाटा चिंताजनक असून अशा प्रकारची सैन्यजमवाजमव दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १९९३ आणि १९९६ च्या करारांना हरताळ फासणारी आहे. एवढेच नव्हे तर, या कृतीसाठी चीनकडून कोणतेही विश्वासार्ह स्पष्टीकरणही देण्यात आले नाही. आणि सीमेवर तैनात चिनी तुकड्यांची कृती प्रक्षोभक आणि द्वीपक्षीय करार, शिष्टाचार धाब्यावर बसविणारी आहे. मात्र, भारत शांततेसाठी कटिबद्ध असून ताबारेषेमध्ये कोणत्याही प्रकारे एकतर्फी बदल होऊ देणार नाही. तणाव निवळण्यासाठी, सर्व संघर्ष स्थानावरून तातडीने सैन्यतुकड्या माघारी बोलवल्या जाव्यात, जेणेकरून भविष्यात संघर्षाची स्थिती उद्‍भवणार नाही,’’ अशा शब्दांत जयशंकर यांनी ठणकावल्याचे सूत्रांनी सांगितले.  यावर सहमती दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये झालेली सहमती आधारभूत मानली जावी.  सीमेवरील सद्यःस्थिती दोन्हीही देशांच्या हिताची नाही. दोन्ही बाजूंच्या सैन्यदलांनी परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच तत्काळ माघारीसाठी संवादातही सातत्य राखावे. संबंधित सर्व विद्यमान करार, नियमांच्या चौकटीतच सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. सरहद्दीवर शांतता आणि सलोखा राखतानाच, तणाव वाढविणारी कृती टाळावी. सीमावाद सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी विशेष प्रतिनिधी पातळीवरील वाटाघाटी नियमितपणे सुरू ठेवाव्यात. तसेच, संवाद आणि समन्वयासाठीचा कृतिगट असलेल्या ‘डब्ल्यूएमसीसी’च्या बैठकाही सुरू राहाव्यात. तणाव कमी होताच दोन्ही देशांनी सरहद्दीवरील शांतता, सलोखा कायम राखण्यासाठी नव्याने विश्वासवृद्धी उपाययोजना राबवाव्यात. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 11, 2020

भारत-चीन तणाव निवळणार; ‘पंचसूत्री’वर झाली सहमती नवी दिल्ली - सीमावादावरून भारत आणि चीनदरम्यान टोकाला पोहोचलेला तणाव परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीनंतर निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सीमेवरील शांततेसाठी संवाद, दोन्ही बाजूंच्या सैन्यांमध्ये सुरक्षित अंतर, सर्वोच्च नेत्यांमधील सहमतीचा आधार, परस्पर विश्वासवृद्धी आणि विशेष प्रतिनिधी पातळीवरील वाटाघाटी सुरू ठेवणे या पंचसूत्रीवर भारत आणि चीनची सहमती झाली आहे. दरम्यान, दोन्ही देशांदरम्यान लष्करी पातळीवर आज पुन्हा सुमारे चार तास चर्चा झाली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मॉस्कोत शांघाय सहकार्य संघटनेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या निमित्ताने काल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात सीमावादावर चर्चा झाली.  तसेच भारत, चीन व रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही स्वतंत्र बैठक मॉस्कोमध्ये झाली. चिनी सैन्याची आतापर्यंतची आक्रस्ताळी भूमिका पाहता भारतीय भूमीवरून माघार आणि ताबारेषेवर एप्रिल पूर्वीची स्थिती कायम करण्यावर भारताचा भर आहे.  धक्कादायक! देशात मे महिन्यात होते ६४ लाख रुग्ण; ICMR सिरो सर्वेक्षणाची माहिती पॅंगाँग सरोवराच्या फिंगर क्षेत्रात घुसखोरीनंतर चिनी सैन्याचा आडमुठेपणा आणि प्रत्युत्तरादाखल भारतीय लष्कराने दक्षिण भागात सामरिकदृष्ट्या मोक्याच्या जागांवर सैन्य तैनात करून चीनला धक्का दिला. सोबतच फिंगर चार क्षेत्रातही महत्त्वाच्या सुळक्यांवर भारतीय सैन्याने आपली पकड मजबूत करतानाच चीनला चर्चेसाठी येण्यास भाग पाडल्याचे सामरिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंतच्या चर्चांतून तणाव कमी करण्याबाबत तोडगा निघाला नव्हता. त्यामुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीकडे लक्ष लागले होते. या निर्णायक बैठकीमुळे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचा दरवाजा काहीसा किलकिला झाला आहे. दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी करून सीमावादावरील ‘पंचसूत्री’वर सहमती व्यक्त केली. मोदी सरकारला मोठा झटका; ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समधून भारत 100 मधून बाहेर चीनचा कांगावा सुरूच दोन महाकाय शेजारी देश असलेल्या भारत आणि चीनला संघर्षाची, संशयाची नव्हे तर परस्पर सहकार्याची आणि विश्वासाची आवश्यकता आहे, अशी सारवासारव चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी केली आहे. दोन्ही देशांचे संबंध दूरगामी परिणाम करणाऱ्या निर्णायक वळणावर येऊन ठेपल्याचा दावा करताना सीमेवर गोळीबार किंवा तत्सम प्रक्षोभक कारवाया रोखण्याची तातडीने निकड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोबतच, घुसखोरी केलेल्या सर्व सैनिकांनी उपकरणांसह तातडीने मागे जाणे आवश्यक आहे, तसेच समोरासमोर उभ्या ठाकलेल्या सैन्यतुकड्यांनी तणाव कमी करण्यासाठी त्वरित माघार घ्यावी, अशी मखलाशी करताना वांग यी यांनी चिनी सैन्याच्या माघारीबाबत थेट उल्लेख निवेदनात टाळला आहे.  भारताने ठणकावले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चिनी परराष्ट्र मंत्र्यांसमोर भारताची बाजू ठाम शब्दात मांडली. ‘‘ताबारेषेजवळ घातक शस्त्रांसह मोठ्या संख्येने जमा झालेला चिनी फौजफाटा चिंताजनक असून अशा प्रकारची सैन्यजमवाजमव दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १९९३ आणि १९९६ च्या करारांना हरताळ फासणारी आहे. एवढेच नव्हे तर, या कृतीसाठी चीनकडून कोणतेही विश्वासार्ह स्पष्टीकरणही देण्यात आले नाही. आणि सीमेवर तैनात चिनी तुकड्यांची कृती प्रक्षोभक आणि द्वीपक्षीय करार, शिष्टाचार धाब्यावर बसविणारी आहे. मात्र, भारत शांततेसाठी कटिबद्ध असून ताबारेषेमध्ये कोणत्याही प्रकारे एकतर्फी बदल होऊ देणार नाही. तणाव निवळण्यासाठी, सर्व संघर्ष स्थानावरून तातडीने सैन्यतुकड्या माघारी बोलवल्या जाव्यात, जेणेकरून भविष्यात संघर्षाची स्थिती उद्‍भवणार नाही,’’ अशा शब्दांत जयशंकर यांनी ठणकावल्याचे सूत्रांनी सांगितले.  यावर सहमती दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेतृत्वामध्ये झालेली सहमती आधारभूत मानली जावी.  सीमेवरील सद्यःस्थिती दोन्हीही देशांच्या हिताची नाही. दोन्ही बाजूंच्या सैन्यदलांनी परस्परांपासून सुरक्षित अंतर राखण्याबरोबरच तत्काळ माघारीसाठी संवादातही सातत्य राखावे. संबंधित सर्व विद्यमान करार, नियमांच्या चौकटीतच सीमावादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. सरहद्दीवर शांतता आणि सलोखा राखतानाच, तणाव वाढविणारी कृती टाळावी. सीमावाद सोडविण्यासाठी दोन्ही बाजूंनी विशेष प्रतिनिधी पातळीवरील वाटाघाटी नियमितपणे सुरू ठेवाव्यात. तसेच, संवाद आणि समन्वयासाठीचा कृतिगट असलेल्या ‘डब्ल्यूएमसीसी’च्या बैठकाही सुरू राहाव्यात. तणाव कमी होताच दोन्ही देशांनी सरहद्दीवरील शांतता, सलोखा कायम राखण्यासाठी नव्याने विश्वासवृद्धी उपाययोजना राबवाव्यात. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32n5mgj

No comments:

Post a Comment