पाण्यानं हिरावली पिंपरी-चिंचवडकरांची झोप  पिंपरी : शहरातील आठ प्रभागांमध्ये मिळून तब्बल 62 भागांमध्ये सध्या रात्रीचा पाणीपुरवठा सुरू आहे. शहराला समन्याय पद्धतीने पाणी मिळावे या हेतूने पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, सोसायटी परिसर वगळता गावठाण व चाळीच्या भागांमध्येही रात्रीचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाची अवेळी पाण्याने सुखाची झोपच हिरावून घेतली आहे. दिवसा काम करून रात्रभर पाण्यासाठी पहारा द्यावा लागतोय, अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे समोर आले आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये 'धन्वंतरी'वरून आयुक्त विरुद्ध कर्मचारी  शहरात 25 नोव्हेंबरपासून समन्याय पद्धतीने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळू नये तसेच सोसायटीमध्ये पाण्याची साठवण क्षमता अधिक असल्याने रात्रीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले. रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, रात्री नऊ ते बारा, बारा ते अडीच व अडीच ते साडेचार या वेळेत पाणी येणाऱ्या नागरिकांची धांदल उडत आहे. सोसायट्यांप्रमाणे पाण्याची अद्ययावत सुविधा चाळी, मध्यमवर्गीय घरे व झोपडपट्टी भागांत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. प्रत्येक घरामागे दहा हजार लिटर पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता असणे गरजेचे आहे. मात्र, चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक परिसरात पाणी साठवण क्षमता अपुरी असल्याने पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बांधकामांना परवानगी देताना पाणी साठवण क्षमता पाहणे अत्यावश्‍यक आहे.  या भागात होतोय रात्रीचा पाणीपुरवठा  चिंचवड : बालाजीनगर ईएसआर 1, 2,3, रेलविहार, गिरिराज नगर, एल्प्रो: 1, 2, तानाजीनगर, डीलक्‍स टॅंक, अशोक थिएटर, पिंपळे सौदागर - कुंदन सोसायटी, मिलेनियम, कल्पतरू, सुदर्शन नगर, काशिदपार्क, सुवर्णयोग.  थेरगाव : सत्संग रोड, लक्ष्मण नगर, पडवळ नगर, पवना नगर, रहाटणी-विशालनगर, पिंपळे निलख, गोकूळ स्वीटस, कुणाल आयकॉन, बालेवाडी स्टेडिअम, चौधरी पार्क  भोसरी : शिवमबाग, सॅंडविक कॉलनी, मॅगझीन चौक, गजानन नगर, सई नगर, खंडोबा माळ  चिखली : घरकुल हौसिंग सोसायटी, पूर्णानगर, शिवतेज नगर कॉलनी, नक्षत्रम सोसायटी, शनी मंदिर, पूजा कॉर्नर, शिवसाई  पिंपरी : अजमेरा कॉलनी, मासूळकर कॉलनी, मोरवाडी, म्हाडा, खराळवाडी, गांधीनगर झोपडपट्टी, कासारवाडी, फुगेवाडी, संत तुकाराम नगर टाकी परिसर  दिघी : चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, महादेव नगर, सदगुरू नगर  मोशी : बोऱ्हाडेवाडी, आदर्शनगर, गंधर्वनगर, उडविल्हे:1,2,3, टेकाळेवस्ती, गणेश नगर, नागेश्‍वरनगर, नंदनवन    बिजलीनगर चिंचवड सेक्‍टर नंबर 156/157 परिसरात अपरात्री पाणी येते. ही वेळ चुकीची आहे. सकाळी नऊ ते दोन पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण झाली नाही तर ज्येष्ठ नागरिक प्रभाग 'ब' अध्यक्षा करुणा चिंचवडे यांच्या घरी उपोषणाला ठाण मांडून बसू. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी सहीशिवाय ज्येष्ठ नागरिक हलणार नाही.  - सुनीता जयवंत, ज्येष्ठ नागरिक संघ, बिजली नगर  सर्वांना सकाळी पाणी वाटप शक्‍य नाही  धरण शंभर टक्के भरले असले तरी दहा वर्षांचा विचार करता पाणीपुरवठा अद्याप पुरेसा नाही. दर तासाला वीस एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वांना सकाळी 6 ते 9 यावेळेत पाणीपुरवठा करणे शक्‍य नाही. जलशुद्दीकरण क्षमता 500 दशलक्ष लिटर आहे. तीन तासांत साडेपाचशे एमएल पाणी पुरवू शकतो. सध्या दर तासाला 275 एमएलडी पाण्याची गरज आहे. ती पुरवू शकत नाही. पाणी क्षमतेवर दाब निर्माण होत असल्याने हे शक्‍य नसल्याचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 10, 2020

पाण्यानं हिरावली पिंपरी-चिंचवडकरांची झोप  पिंपरी : शहरातील आठ प्रभागांमध्ये मिळून तब्बल 62 भागांमध्ये सध्या रात्रीचा पाणीपुरवठा सुरू आहे. शहराला समन्याय पद्धतीने पाणी मिळावे या हेतूने पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, सोसायटी परिसर वगळता गावठाण व चाळीच्या भागांमध्येही रात्रीचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. काबाडकष्ट करणाऱ्या वर्गाची अवेळी पाण्याने सुखाची झोपच हिरावून घेतली आहे. दिवसा काम करून रात्रभर पाण्यासाठी पहारा द्यावा लागतोय, अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याचे समोर आले आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये 'धन्वंतरी'वरून आयुक्त विरुद्ध कर्मचारी  शहरात 25 नोव्हेंबरपासून समन्याय पद्धतीने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळू नये तसेच सोसायटीमध्ये पाण्याची साठवण क्षमता अधिक असल्याने रात्रीचा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले. रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत बऱ्याच भागांमध्ये पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, रात्री नऊ ते बारा, बारा ते अडीच व अडीच ते साडेचार या वेळेत पाणी येणाऱ्या नागरिकांची धांदल उडत आहे. सोसायट्यांप्रमाणे पाण्याची अद्ययावत सुविधा चाळी, मध्यमवर्गीय घरे व झोपडपट्टी भागांत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. प्रत्येक घरामागे दहा हजार लिटर पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता असणे गरजेचे आहे. मात्र, चाळीस टक्‍क्‍यांहून अधिक परिसरात पाणी साठवण क्षमता अपुरी असल्याने पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. बांधकामांना परवानगी देताना पाणी साठवण क्षमता पाहणे अत्यावश्‍यक आहे.  या भागात होतोय रात्रीचा पाणीपुरवठा  चिंचवड : बालाजीनगर ईएसआर 1, 2,3, रेलविहार, गिरिराज नगर, एल्प्रो: 1, 2, तानाजीनगर, डीलक्‍स टॅंक, अशोक थिएटर, पिंपळे सौदागर - कुंदन सोसायटी, मिलेनियम, कल्पतरू, सुदर्शन नगर, काशिदपार्क, सुवर्णयोग.  थेरगाव : सत्संग रोड, लक्ष्मण नगर, पडवळ नगर, पवना नगर, रहाटणी-विशालनगर, पिंपळे निलख, गोकूळ स्वीटस, कुणाल आयकॉन, बालेवाडी स्टेडिअम, चौधरी पार्क  भोसरी : शिवमबाग, सॅंडविक कॉलनी, मॅगझीन चौक, गजानन नगर, सई नगर, खंडोबा माळ  चिखली : घरकुल हौसिंग सोसायटी, पूर्णानगर, शिवतेज नगर कॉलनी, नक्षत्रम सोसायटी, शनी मंदिर, पूजा कॉर्नर, शिवसाई  पिंपरी : अजमेरा कॉलनी, मासूळकर कॉलनी, मोरवाडी, म्हाडा, खराळवाडी, गांधीनगर झोपडपट्टी, कासारवाडी, फुगेवाडी, संत तुकाराम नगर टाकी परिसर  दिघी : चक्रपाणी वसाहत, शास्त्री चौक, महादेव नगर, सदगुरू नगर  मोशी : बोऱ्हाडेवाडी, आदर्शनगर, गंधर्वनगर, उडविल्हे:1,2,3, टेकाळेवस्ती, गणेश नगर, नागेश्‍वरनगर, नंदनवन    बिजलीनगर चिंचवड सेक्‍टर नंबर 156/157 परिसरात अपरात्री पाणी येते. ही वेळ चुकीची आहे. सकाळी नऊ ते दोन पाणी पुरवठ्याची मागणी पूर्ण झाली नाही तर ज्येष्ठ नागरिक प्रभाग 'ब' अध्यक्षा करुणा चिंचवडे यांच्या घरी उपोषणाला ठाण मांडून बसू. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी सहीशिवाय ज्येष्ठ नागरिक हलणार नाही.  - सुनीता जयवंत, ज्येष्ठ नागरिक संघ, बिजली नगर  सर्वांना सकाळी पाणी वाटप शक्‍य नाही  धरण शंभर टक्के भरले असले तरी दहा वर्षांचा विचार करता पाणीपुरवठा अद्याप पुरेसा नाही. दर तासाला वीस एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वांना सकाळी 6 ते 9 यावेळेत पाणीपुरवठा करणे शक्‍य नाही. जलशुद्दीकरण क्षमता 500 दशलक्ष लिटर आहे. तीन तासांत साडेपाचशे एमएल पाणी पुरवू शकतो. सध्या दर तासाला 275 एमएलडी पाण्याची गरज आहे. ती पुरवू शकत नाही. पाणी क्षमतेवर दाब निर्माण होत असल्याने हे शक्‍य नसल्याचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी सांगितले.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3m6VLlw

No comments:

Post a Comment