मराठा आरक्षण; 55 हजार मराठा तरूण-तरूणींचा जीव टांगणीला  कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुण-तरुणींसमोर अंधकार पसरला आहे. जिल्ह्यातील 55 हजार 713 तरुण-तरुणींनी शिक्षण, नोकरीसाठी घेतलेले दाखले निराधार झाल्याची भावना अवस्थ करत आहे. तर, जिल्ह्यातील 798 तरुण-तरुणींचे मराठा जातीचे दाखले रद्द करण्यात आले आहेत. यातच महाराष्ट्र शासनाने 12 हजार पोलीसांची भरती करण्याचे जाहीर करुन मराठा समाजातील तरुण-तरूणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. आरक्षणाचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया थांबवली पाहिजे, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. मराठा आरक्षण जाहीर झाल्यापासून विविध शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी म्हणून जिल्ह्यातील 56 हजार 511 तरुण-तरुणींनी मराठा जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 55 हजार713 अर्ज वाटप झाले आहे. उर्वरित 798 दाखले अजून प्रलंबित आहे. यातच मराठा आरक्षणाला तात्पूरती स्थगिती मिळाल्याने दाखले घेवून शिक्षण घेणारे आणि याच दाखल्यावर नोकरी मिळवलेल्या जिल्ह्यातील 56 हजार 511 मराठा समजातील तरुण-तरुणींचा जीव टांगणीला लागला आहे. याशिवाय, आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळताच जिल्ह्यातील प्रांतकार्यालयाककडून मंजूर केल्या जाणाऱ्या दाखल्यांना रिजिक्‍ट केले जात आहे. हे दाखल काढण्यासाठी गोर-गरीब तरुणांनी महाईसेवा केंद्रात शेकडो रुपये भरले आहेत. आता त्यांना दाखलेही मिळणार नाहीत आणि पैसेही मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.    मराठा जातीचे दाखले देण्याची सुरुवात झाल्यापासून आजअखेर पर्यंतची माहिती अशी :  उपविभाग* मंजूरीसाठी आलेले अर्ज* एकूण वाटप झालेले दाखले* प्रलंबित व रद्द अर्ज  राधानगरी-कागल* 11513* 11513* 0  पन्हाळा* 13099* 12917* 182  आजरा-भुदरगड* 11487* 11262* 225  गडहिंग्लज* 11971* 11903* 68  इचलकरंजी* 4565* 4386* 179  करवीर* 3876* 3732* 144  एकूण* 56511* 55713* 798    हे पण वाचा - ...अन्यथा राज्य सरकारशी संघर्ष अटळ ; मराठा समाजाचा इशारा    पोलीस भरती स्थगित करावी  एकीकडे मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. दुसरीकडे पोलीस भरती होत आहे. यामुळे मराठा समाजातील तरुण-तरुणींवर अन्याय होणार आहे. त्यामुळे ही भरती स्थगित करावी.  -खासदार संभाजीराजे छत्रपती.  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, September 17, 2020

मराठा आरक्षण; 55 हजार मराठा तरूण-तरूणींचा जीव टांगणीला  कोल्हापूर : मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा समाजातील तरुण-तरुणींसमोर अंधकार पसरला आहे. जिल्ह्यातील 55 हजार 713 तरुण-तरुणींनी शिक्षण, नोकरीसाठी घेतलेले दाखले निराधार झाल्याची भावना अवस्थ करत आहे. तर, जिल्ह्यातील 798 तरुण-तरुणींचे मराठा जातीचे दाखले रद्द करण्यात आले आहेत. यातच महाराष्ट्र शासनाने 12 हजार पोलीसांची भरती करण्याचे जाहीर करुन मराठा समाजातील तरुण-तरूणींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. आरक्षणाचा अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत पोलीस भरतीची प्रक्रिया थांबवली पाहिजे, अशी भूमिका खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. मराठा आरक्षण जाहीर झाल्यापासून विविध शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी म्हणून जिल्ह्यातील 56 हजार 511 तरुण-तरुणींनी मराठा जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 55 हजार713 अर्ज वाटप झाले आहे. उर्वरित 798 दाखले अजून प्रलंबित आहे. यातच मराठा आरक्षणाला तात्पूरती स्थगिती मिळाल्याने दाखले घेवून शिक्षण घेणारे आणि याच दाखल्यावर नोकरी मिळवलेल्या जिल्ह्यातील 56 हजार 511 मराठा समजातील तरुण-तरुणींचा जीव टांगणीला लागला आहे. याशिवाय, आरक्षणाला तात्पुरती स्थगिती मिळताच जिल्ह्यातील प्रांतकार्यालयाककडून मंजूर केल्या जाणाऱ्या दाखल्यांना रिजिक्‍ट केले जात आहे. हे दाखल काढण्यासाठी गोर-गरीब तरुणांनी महाईसेवा केंद्रात शेकडो रुपये भरले आहेत. आता त्यांना दाखलेही मिळणार नाहीत आणि पैसेही मिळणार नाहीत, अशी परिस्थिती आहे.    मराठा जातीचे दाखले देण्याची सुरुवात झाल्यापासून आजअखेर पर्यंतची माहिती अशी :  उपविभाग* मंजूरीसाठी आलेले अर्ज* एकूण वाटप झालेले दाखले* प्रलंबित व रद्द अर्ज  राधानगरी-कागल* 11513* 11513* 0  पन्हाळा* 13099* 12917* 182  आजरा-भुदरगड* 11487* 11262* 225  गडहिंग्लज* 11971* 11903* 68  इचलकरंजी* 4565* 4386* 179  करवीर* 3876* 3732* 144  एकूण* 56511* 55713* 798    हे पण वाचा - ...अन्यथा राज्य सरकारशी संघर्ष अटळ ; मराठा समाजाचा इशारा    पोलीस भरती स्थगित करावी  एकीकडे मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. दुसरीकडे पोलीस भरती होत आहे. यामुळे मराठा समाजातील तरुण-तरुणींवर अन्याय होणार आहे. त्यामुळे ही भरती स्थगित करावी.  -खासदार संभाजीराजे छत्रपती.  संपादन - धनाजी सुर्वे    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iGjYNz

No comments:

Post a Comment