वसई-विरार शहर परिवहन सेवा बंदच; कंत्रादारावर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा  विरार ः वसई विरार महापालिका हद्दीतील पाच प्रमुख मार्गावर प्राथमिकतत्वावर परिवहन सेवा सुरु करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी कंत्राटदाराला दिले होते. मात्र पालिकेच्या आदेशानंतरही कंत्राटदाराने परिवहन सेवा सुरु न केल्याने पालिकेने कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केली.  राज्यातील कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत घणाघात वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा मे. भगीरथी ट्रान्सपोर्ट या खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाते. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून परिवहन सेवा बंद आहे. पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रुग्णांची ने-आण करण्यासाठी सुरू असलेल्या 25 बसगाड्या वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. इतर महापालिकांनी त्यांची परिवहन सेवा सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेनेही परिवहन सेवा सुरु करावी, अशी मागणी समोर येत होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातच पालिकेने कंत्राटदाराला परिवहन सेवा सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र, अनेक बसगाड्या नादुरूस्त असल्याने बससेवा सुरू करता येणार नाही. रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची वारेमाप लूट; दरेकर यांचा सरकारवर हल्ला गाड्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने आर्थिक मदत द्यावी, असा प्रस्ताव कंत्राटदाराने पालिकेला दिला होता. यावर पालिकेच्या अनेक बैठक झाल्या. त्यामध्ये या मागण्या मान्य नसल्याचे पालिकेने ठामपणे कंत्राटदाराला सांगितले होते. अखेर पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी शासन निर्णयानुसार 5 सप्टेंबर पासून प्राथमिक तत्वावर 5 मार्गावर सेवा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बस सेवा सुरु न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात म्हटले होते. मात्र तरीही कंत्राटदाराने बससेवा सुरु न केल्याने आता प्रशासन कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.    परिवहन सेवा पूर्वीपासूनच तोट्यात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे ती अधिकच तोट्यात आली आहे. त्यामुळे परिवहन सेवा पुन्हा सुरु करायची असल्यास पालिकेने आर्थिक मदत करावी. त्यानंतरच पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार 5 मार्गावर सेवा सुरु करण्यात येईल.  - मनोहर सकपाळ, संचालक, मे. भगीरथी ट्रान्सपोर्ट.   पालिकेने यापूर्वीच कंत्राटदाराला कोणतीही आर्थिक मदत देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच पालिकेने 5 मार्गावर सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही ही सेवा सुरु न केल्याने कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अन्यथा पालिका दुसरी निविदा प्रक्रिया करून दुसरा कंत्राटदार नेमण्यासाठी प्रक्रिया सुरू करेल. मात्र पालिका कोणतीही आर्थिक मदत कंत्राटदाराला करणार नाही.  - विश्वनाथ तळेकर, सहायक आयुक्त, परिवहन सेवा. ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणेे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 8, 2020

वसई-विरार शहर परिवहन सेवा बंदच; कंत्रादारावर कारवाई करण्याचा प्रशासनाचा इशारा  विरार ः वसई विरार महापालिका हद्दीतील पाच प्रमुख मार्गावर प्राथमिकतत्वावर परिवहन सेवा सुरु करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी कंत्राटदाराला दिले होते. मात्र पालिकेच्या आदेशानंतरही कंत्राटदाराने परिवहन सेवा सुरु न केल्याने पालिकेने कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरु केली.  राज्यातील कोव्हिड सेंटर्स भ्रष्ट्राचाराचे कुरण; देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत घणाघात वसई विरार महापालिकेची परिवहन सेवा मे. भगीरथी ट्रान्सपोर्ट या खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाते. लॉकडाऊनमुळे अनेक दिवसांपासून परिवहन सेवा बंद आहे. पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि रुग्णांची ने-आण करण्यासाठी सुरू असलेल्या 25 बसगाड्या वगळता सर्व सेवा बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. इतर महापालिकांनी त्यांची परिवहन सेवा सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महापालिकेनेही परिवहन सेवा सुरु करावी, अशी मागणी समोर येत होती. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातच पालिकेने कंत्राटदाराला परिवहन सेवा सुरु करण्याचे आदेश दिले. मात्र, अनेक बसगाड्या नादुरूस्त असल्याने बससेवा सुरू करता येणार नाही. रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची वारेमाप लूट; दरेकर यांचा सरकारवर हल्ला गाड्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेने आर्थिक मदत द्यावी, असा प्रस्ताव कंत्राटदाराने पालिकेला दिला होता. यावर पालिकेच्या अनेक बैठक झाल्या. त्यामध्ये या मागण्या मान्य नसल्याचे पालिकेने ठामपणे कंत्राटदाराला सांगितले होते. अखेर पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी शासन निर्णयानुसार 5 सप्टेंबर पासून प्राथमिक तत्वावर 5 मार्गावर सेवा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बस सेवा सुरु न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही या आदेशात म्हटले होते. मात्र तरीही कंत्राटदाराने बससेवा सुरु न केल्याने आता प्रशासन कारवाईचा बडगा उचलण्याच्या तयारीत आहे.    परिवहन सेवा पूर्वीपासूनच तोट्यात आहे. त्यात लॉकडाऊनमुळे ती अधिकच तोट्यात आली आहे. त्यामुळे परिवहन सेवा पुन्हा सुरु करायची असल्यास पालिकेने आर्थिक मदत करावी. त्यानंतरच पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार 5 मार्गावर सेवा सुरु करण्यात येईल.  - मनोहर सकपाळ, संचालक, मे. भगीरथी ट्रान्सपोर्ट.   पालिकेने यापूर्वीच कंत्राटदाराला कोणतीही आर्थिक मदत देणार नसल्याचे सांगितले आहे. तसेच पालिकेने 5 मार्गावर सेवा देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र तरीही ही सेवा सुरु न केल्याने कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अन्यथा पालिका दुसरी निविदा प्रक्रिया करून दुसरा कंत्राटदार नेमण्यासाठी प्रक्रिया सुरू करेल. मात्र पालिका कोणतीही आर्थिक मदत कंत्राटदाराला करणार नाही.  - विश्वनाथ तळेकर, सहायक आयुक्त, परिवहन सेवा. ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणेे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2R4yBhv

No comments:

Post a Comment