सांगलीकरांना दिलासा; चाचण्या आणि रूग्णसंख्याही होतेय कमी  सांगली : कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांची संख्या गेल्या आठवड्यात कमी झाली आहे. तसेच दुसरीकडे कोरोना बाधित रूग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आठवड्यातील रूग्णसंख्या सहाशे ते आठशेच्या पटीत आल्याचे दिसून येते. कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरवातीला आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. त्यासाठी नाकातून व घशातून स्वॅब घेतला जातो. त्याचा अहवाल 24 ते 48 तासात येतो. अचूक व खात्रीशीर निदानासाठी ही चाचणी उपयोगी आहे. परंतू या चाचण्यांना वेळ लागत असल्यामुळे त्याच्याबरोबरीने ऍन्टीजेन चाचण्यांद्वारे कोरोना निदान करण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी नाकातून स्वॅब घेतला जातो. अर्ध्या तासात या चाचणीतून निदान समजते. लवकर निदान व्हावे तसेच बाधित रूग्णांचे विलगीकरण सोपे जावे यासाठी या चाचण्यांची संख्या वाढवली गेली. परंतू या चाचण्यांच्या निदानाबाबत आजही अनेकांच्या मनात संभ्रम आहे.  जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असताना आणि चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्यामुळे खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यास परवानगी दिली गेली. चाचणी केंद्र वाढवल्यामुळे दररोज तीन ते साडे तीन हजार चाचण्या होऊ लागल्या. तर दुसरीकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात रूग्ण संख्या वाढल्याचेही चित्र दिसून आले. जिल्ह्यात आठवड्यापूर्वीपर्यंत आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या 3 हजारहून अधिक होती. तर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजारच्या पटीत निष्पन्न झाली.  परंतू आठवड्यापासून आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या पाचशे ते सहाशेच्या पटीत कमी झाली आहे. त्याचबरोबर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजार ऐवजी सहाशे ते आठशेच्या पटीत निष्पन्न झाली आहे. सध्यातरी रूग्ण संख्या कमी होऊ लागल्यामुळे तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोना बाधित रूग्णांची संख्या खरोखरच कमी होत आहे काय? हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागेल.  दिनांक........आरटीपीआर/ऍन्टीजेन चाचणी............जिल्ह्यातील बाधित  15/9-----------2616-----------------------749  16/9-----------3316---------------------- 865  17/9-----------3130----------------------1028  18/9-----------3098----------------------1010  19/9-----------2603-----------------------830  20/9-----------2335-----------------------811  21/9-----------2417-----------------------690  22/9-----------2481-----------------------697  23/9-----------2928-----------------------821  24/9-----------2691-----------------------685  25/9-----------2795-----------------------607  26/9-----------2542-----------------------615    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 27, 2020

सांगलीकरांना दिलासा; चाचण्या आणि रूग्णसंख्याही होतेय कमी  सांगली : कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांची संख्या गेल्या आठवड्यात कमी झाली आहे. तसेच दुसरीकडे कोरोना बाधित रूग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आठवड्यातील रूग्णसंख्या सहाशे ते आठशेच्या पटीत आल्याचे दिसून येते. कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरवातीला आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. त्यासाठी नाकातून व घशातून स्वॅब घेतला जातो. त्याचा अहवाल 24 ते 48 तासात येतो. अचूक व खात्रीशीर निदानासाठी ही चाचणी उपयोगी आहे. परंतू या चाचण्यांना वेळ लागत असल्यामुळे त्याच्याबरोबरीने ऍन्टीजेन चाचण्यांद्वारे कोरोना निदान करण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी नाकातून स्वॅब घेतला जातो. अर्ध्या तासात या चाचणीतून निदान समजते. लवकर निदान व्हावे तसेच बाधित रूग्णांचे विलगीकरण सोपे जावे यासाठी या चाचण्यांची संख्या वाढवली गेली. परंतू या चाचण्यांच्या निदानाबाबत आजही अनेकांच्या मनात संभ्रम आहे.  जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असताना आणि चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्यामुळे खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यास परवानगी दिली गेली. चाचणी केंद्र वाढवल्यामुळे दररोज तीन ते साडे तीन हजार चाचण्या होऊ लागल्या. तर दुसरीकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात रूग्ण संख्या वाढल्याचेही चित्र दिसून आले. जिल्ह्यात आठवड्यापूर्वीपर्यंत आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या 3 हजारहून अधिक होती. तर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजारच्या पटीत निष्पन्न झाली.  परंतू आठवड्यापासून आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या पाचशे ते सहाशेच्या पटीत कमी झाली आहे. त्याचबरोबर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजार ऐवजी सहाशे ते आठशेच्या पटीत निष्पन्न झाली आहे. सध्यातरी रूग्ण संख्या कमी होऊ लागल्यामुळे तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोना बाधित रूग्णांची संख्या खरोखरच कमी होत आहे काय? हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागेल.  दिनांक........आरटीपीआर/ऍन्टीजेन चाचणी............जिल्ह्यातील बाधित  15/9-----------2616-----------------------749  16/9-----------3316---------------------- 865  17/9-----------3130----------------------1028  18/9-----------3098----------------------1010  19/9-----------2603-----------------------830  20/9-----------2335-----------------------811  21/9-----------2417-----------------------690  22/9-----------2481-----------------------697  23/9-----------2928-----------------------821  24/9-----------2691-----------------------685  25/9-----------2795-----------------------607  26/9-----------2542-----------------------615    संपादन : प्रफुल्ल सुतार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2S2j3Lp

No comments:

Post a Comment