सावंतवाडीत लवकच वीस बेडचे कोविड हॉस्पिटल सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात वीस बेडचे डेडिकेटर कोविड हॉस्पिटल सेंटर उभारण्यात येत आहे. पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले "ते' नऊही व्हेंटिलेटर याच हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात येणार असून या हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या आठ दिवसांत ही सुविधा या ठिकाणी सुरू होणार आहे.  जिल्ह्यात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. जिल्हा रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना उपचार देण्यासाठी बेडही उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार होत नसल्याने जिल्हावासीयांमधून संतापही व्यक्त होत आहे; मात्र प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांवर उपचार व्हावेत, त्यांना वेळीच बेड व्हेटिलेंटर उपलब्ध व्हावा, यासाठी शासनस्तरावरुन खासगी रुग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सेंटर उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.  मुळात केंद्र व राज्य शासनाची शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याची सूचना असताना येथील उपजिल्हा रुग्णालयात मात्र हे सेंटर अद्यापही सुरू करण्यात आले नव्हते. सुरवातीला याबाबत हालचाली झाल्या; मात्र जनतेतून झालेला विरोध लक्षात घेता प्रशासनाने त्याबाबत माघार घेतली. त्यावेळी कोविडचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असल्याने आणि तशी गरज या ठिकाणी भासत नसल्याने कोविड सेंटरबाबत प्रशासन जनतेच्या बाजूने राहिले; मात्र आता हे सेंटर उभारणे गरजेचे असल्याने त्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मुळात उपजिल्हा रुग्णालयात या कोविड हॉस्पिटलसाठी नऊ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. ते वापराविना पडून असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेताना जिल्हा प्रशासनाकडून या कोविड हॉस्पिटल सेंटर उभारण्याबाबत हालचाली झाल्यानंतर प्रसूती विभागाच्या बाजूला असलेल्या महिला वॉर्डच्या जागेत हे हॉस्पिटल सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले.  रुग्णसंख्या वाढल्याने खबरदारी  याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ""केंद्र व राज्य शासनाकडून कोविड हॉस्पिटल सेंटर करण्याच्या सूचना सुरुवातीलाच मिळाल्या होत्या; मात्र त्यावेळी हॉस्पिटल उभारण्याची तशी गरज नव्हती. कारण रुग्णसंख्या फारच कमी होती; मात्र रुग्णसंख्या वाढल्याने आता हे हॉस्पिटल उभारणे आवश्‍यक झाले आहे.''  आठ दिवसांत हॉस्पिटल सुरू  या हॉस्पिटलमध्ये एकूण 20 बेड आहेत. यामध्ये पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले नऊ व्हेंटिलेटर जोडण्यात येणार आहेत. शिवाय ऑक्‍सिजनची सुविधा असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर व नर्स हा स्टाफसुद्धा वेगळा राहणार आहे. बाहेरील लोकांचा संपर्क येऊ नये, यासाठी हॉस्पिटल पूर्णतः बंदिस्त असणार आहे. शौचालयाची स्वतंत्र सुविधाही असेल. आठ दिवसांत हॉस्पिटल सुरू होईल, असे पाटील म्हणाले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 26, 2020

सावंतवाडीत लवकच वीस बेडचे कोविड हॉस्पिटल सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात वीस बेडचे डेडिकेटर कोविड हॉस्पिटल सेंटर उभारण्यात येत आहे. पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले "ते' नऊही व्हेंटिलेटर याच हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित करण्यात येणार असून या हॉस्पिटलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या आठ दिवसांत ही सुविधा या ठिकाणी सुरू होणार आहे.  जिल्ह्यात कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत तर दुसरीकडे मृत्यूचे प्रमाणही चिंताजनक आहे. जिल्हा रुग्णालयात तसेच जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना उपचार देण्यासाठी बेडही उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार होत नसल्याने जिल्हावासीयांमधून संतापही व्यक्त होत आहे; मात्र प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. रुग्णांवर उपचार व्हावेत, त्यांना वेळीच बेड व्हेटिलेंटर उपलब्ध व्हावा, यासाठी शासनस्तरावरुन खासगी रुग्णालयेही अधिग्रहित करण्यात येत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात कोविड हॉस्पिटल सेंटर उभारण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.  मुळात केंद्र व राज्य शासनाची शासकीय रुग्णालयाच्या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्याची सूचना असताना येथील उपजिल्हा रुग्णालयात मात्र हे सेंटर अद्यापही सुरू करण्यात आले नव्हते. सुरवातीला याबाबत हालचाली झाल्या; मात्र जनतेतून झालेला विरोध लक्षात घेता प्रशासनाने त्याबाबत माघार घेतली. त्यावेळी कोविडचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असल्याने आणि तशी गरज या ठिकाणी भासत नसल्याने कोविड सेंटरबाबत प्रशासन जनतेच्या बाजूने राहिले; मात्र आता हे सेंटर उभारणे गरजेचे असल्याने त्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. मुळात उपजिल्हा रुग्णालयात या कोविड हॉस्पिटलसाठी नऊ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. ते वापराविना पडून असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेताना जिल्हा प्रशासनाकडून या कोविड हॉस्पिटल सेंटर उभारण्याबाबत हालचाली झाल्यानंतर प्रसूती विभागाच्या बाजूला असलेल्या महिला वॉर्डच्या जागेत हे हॉस्पिटल सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले.  रुग्णसंख्या वाढल्याने खबरदारी  याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक उत्तम पाटील यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ""केंद्र व राज्य शासनाकडून कोविड हॉस्पिटल सेंटर करण्याच्या सूचना सुरुवातीलाच मिळाल्या होत्या; मात्र त्यावेळी हॉस्पिटल उभारण्याची तशी गरज नव्हती. कारण रुग्णसंख्या फारच कमी होती; मात्र रुग्णसंख्या वाढल्याने आता हे हॉस्पिटल उभारणे आवश्‍यक झाले आहे.''  आठ दिवसांत हॉस्पिटल सुरू  या हॉस्पिटलमध्ये एकूण 20 बेड आहेत. यामध्ये पीएम केअर फंडातून प्राप्त झालेले नऊ व्हेंटिलेटर जोडण्यात येणार आहेत. शिवाय ऑक्‍सिजनची सुविधा असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्‍टर व नर्स हा स्टाफसुद्धा वेगळा राहणार आहे. बाहेरील लोकांचा संपर्क येऊ नये, यासाठी हॉस्पिटल पूर्णतः बंदिस्त असणार आहे. शौचालयाची स्वतंत्र सुविधाही असेल. आठ दिवसांत हॉस्पिटल सुरू होईल, असे पाटील म्हणाले.   संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/366SxJj

No comments:

Post a Comment