कोकणवासीयांचे आधिच नुकसान, आता आणखी दक्षतेचा इशारा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍याला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. आज सकाळपासूनच मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. त्याबाबत प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून जिल्ह्यामध्ये तुरळक मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. यादृष्टीने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.  गेले कित्येक दिवस ऊन-पाऊस असा खेळ सुरू होता. सकाळच्या सुमारास ऊन व रात्री पाऊस असे चित्र गेले काही दिवस पहावयास मिळते होते; मात्र आज तालुक्‍यात पावसाने सकाळपासूनच आपली रिपरिप कायम ठेवली. काही ठिकाणी कमी व मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस दिसून आला. गेले चार दिवस तालुक्‍यामध्ये ढगांच्या गडगडाटासह विजेचा लखलखाट सायंकाळच्या सुमारास दिसून येत होता. वातावरणीय बदलाचा मानवी आरोग्यावर हे काहीसा परिणाम दिसून आला. आज सकाळपासूनच तालुक्‍यांमध्ये कोठेही ऊन दिसले नाही; मात्र अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून आली. दुपारच्या सुमारास काही ठिकाणी ग्रामीण भागासह शहरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम दिसून आला.  वाहतूक संथ  या पावसामुळे वाहतूक व्यवस्था संथ गतीने सुरू असलेली दिसून आली. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून पुढील पाच दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले असून उद्या (ता.12) जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुरळक व मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 13 ते 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  शिरोड्यात भात पीक भूईसपाट  शिरोडा - पाऊस आणि वादळी वारा यामुळे दशक्रोशीतील काही भागातील भातपीक जमिनीवर पडले असून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्‍त केली जात आहे. यंदा पावसाळी हंगामातील सर्व नक्षत्रे व्यवस्थित लागली. त्यामुळे भातपीक समाधानकारक होते. दोन तीन दिवसांपूर्वी विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला सोबत वादळी वारा सुटला. परिणामी स्थानिक बियांण्याची भात रोटे आडवी झाली. काही ठिकाणी तर रोपातील कणसे बाहेर पडण्याची प्रक्रिया चालू झाली होती. रोपे आडवी झाल्याने त्याच्या परिणाम दाण्यांवर होणार असून पिक घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. महसूल खात्याने याची नोंद घ्यावी, अशी मागणी आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, September 11, 2020

कोकणवासीयांचे आधिच नुकसान, आता आणखी दक्षतेचा इशारा सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍याला पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. आज सकाळपासूनच मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला. त्याबाबत प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून जिल्ह्यामध्ये तुरळक मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. यादृष्टीने दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.  गेले कित्येक दिवस ऊन-पाऊस असा खेळ सुरू होता. सकाळच्या सुमारास ऊन व रात्री पाऊस असे चित्र गेले काही दिवस पहावयास मिळते होते; मात्र आज तालुक्‍यात पावसाने सकाळपासूनच आपली रिपरिप कायम ठेवली. काही ठिकाणी कमी व मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा असा पाऊस दिसून आला. गेले चार दिवस तालुक्‍यामध्ये ढगांच्या गडगडाटासह विजेचा लखलखाट सायंकाळच्या सुमारास दिसून येत होता. वातावरणीय बदलाचा मानवी आरोग्यावर हे काहीसा परिणाम दिसून आला. आज सकाळपासूनच तालुक्‍यांमध्ये कोठेही ऊन दिसले नाही; मात्र अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप दिसून आली. दुपारच्या सुमारास काही ठिकाणी ग्रामीण भागासह शहरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. अधूनमधून पडणाऱ्या पावसाचा वाहतूक व्यवस्थेवर परिणाम दिसून आला.  वाहतूक संथ  या पावसामुळे वाहतूक व्यवस्था संथ गतीने सुरू असलेली दिसून आली. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून पुढील पाच दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले असून उद्या (ता.12) जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तुरळक व मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. 13 ते 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  शिरोड्यात भात पीक भूईसपाट  शिरोडा - पाऊस आणि वादळी वारा यामुळे दशक्रोशीतील काही भागातील भातपीक जमिनीवर पडले असून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्‍त केली जात आहे. यंदा पावसाळी हंगामातील सर्व नक्षत्रे व्यवस्थित लागली. त्यामुळे भातपीक समाधानकारक होते. दोन तीन दिवसांपूर्वी विजेच्या गडगडाटासह पाऊस झाला सोबत वादळी वारा सुटला. परिणामी स्थानिक बियांण्याची भात रोटे आडवी झाली. काही ठिकाणी तर रोपातील कणसे बाहेर पडण्याची प्रक्रिया चालू झाली होती. रोपे आडवी झाल्याने त्याच्या परिणाम दाण्यांवर होणार असून पिक घटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. महसूल खात्याने याची नोंद घ्यावी, अशी मागणी आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2GUh3CQ

No comments:

Post a Comment