व्हिप बजावुनही सभेला गैरहजर, चौघा नगरसेवकांना नोटिस  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेच्या मासिक बैठकीला व्हिप बजावुनही गैरहजर राहिलेल्यांमधून चौघांना शिवसेनेकडून आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात शिवसेनेचे दोन तर एक अपक्ष व एक भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. तशी माहिती ज्येष्ठ नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी दिली. पक्षाच्या विरोधात जाणाऱ्यांविरोधात शिवसेना भवनातूनच आदेश आल्यानंतर याबाबतचे आक्रमक पाऊल उचलल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.  येथील पालिकेची सभा 10 सप्टेंबरला झाली. या सभेत सत्ताधारी भाजपने बीओटी तत्वावर मॉल उभारण्याचा विषय ठेवला होता. पालिकेचे नुकसान करणारा आणि जनहितविरोधी निर्णय असल्याने या विषयाच्या ठरावाला विरोध करण्यासाठी गटातील सात नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहून विरोध करण्यासंदर्भातील व्हीप गटनेत्या या नात्याने लोबो यांनी बजावला होता.  गटातील उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर यांना व्हीप बजावण्यात आला होता. यावेळी नेवगी यांनी स्वतः व्हिप न स्विकारल्याने त्याच्या घराच्या दरवाज्यावर व्हिप बजावण्यात आला होता. यापैकी सुकी, सावंत, उपनगराध्यक्षा कोरगावकर व भाजपाचे नगरसेवक नेवगी हे सभेला उपस्थित नव्हते. घरात कोरोना रूग्ण असल्याने बांदेकर, माधुरी वाडकर ऑनलाईन सभेसाठी तयार होते; परंतु ऑफलाईन सभा झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली नाही. सुकी तसेच सावंत यांनी लोबो यांच्याकडे आजारी असल्याबाबत अर्ज दिला होता, असे असताना त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोरगावकर, नेवगी हे भाजपवासी झाले आहेत; मात्र गट स्थापन करताना गटाबरोबर असल्याने या दोन नगरसेवकांना व्हीप लागू होतो. तरीही या दोन नगरसेवकांनी व्हीपचे उल्लघंन केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.  लोबो यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ""आम्ही अनुपस्थित सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत, हे त्याचवेळीच स्पष्ट केले होते. नोटिस दिलेल्या चौघांमधील सेनेच्या सावंत व सुकी यांनी आजारी होतो असे सांगितले होते तर याबाबत सुकी यांनी तसे पत्रही दिले होते; मात्र नोटिशीला तसे उत्तर त्यांनी देणे आवश्‍यक आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, September 16, 2020

व्हिप बजावुनही सभेला गैरहजर, चौघा नगरसेवकांना नोटिस  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेच्या मासिक बैठकीला व्हिप बजावुनही गैरहजर राहिलेल्यांमधून चौघांना शिवसेनेकडून आज कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यात शिवसेनेचे दोन तर एक अपक्ष व एक भाजप नगरसेवकांचा समावेश आहे. तशी माहिती ज्येष्ठ नगरसेविका तथा गटनेत्या अनारोजीन लोबो यांनी दिली. पक्षाच्या विरोधात जाणाऱ्यांविरोधात शिवसेना भवनातूनच आदेश आल्यानंतर याबाबतचे आक्रमक पाऊल उचलल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले.  येथील पालिकेची सभा 10 सप्टेंबरला झाली. या सभेत सत्ताधारी भाजपने बीओटी तत्वावर मॉल उभारण्याचा विषय ठेवला होता. पालिकेचे नुकसान करणारा आणि जनहितविरोधी निर्णय असल्याने या विषयाच्या ठरावाला विरोध करण्यासाठी गटातील सात नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहून विरोध करण्यासंदर्भातील व्हीप गटनेत्या या नात्याने लोबो यांनी बजावला होता.  गटातील उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, सुरेंद्र बांदेकर, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, दीपाली सावंत, आनंद नेवगी, बाबू कुडतरकर यांना व्हीप बजावण्यात आला होता. यावेळी नेवगी यांनी स्वतः व्हिप न स्विकारल्याने त्याच्या घराच्या दरवाज्यावर व्हिप बजावण्यात आला होता. यापैकी सुकी, सावंत, उपनगराध्यक्षा कोरगावकर व भाजपाचे नगरसेवक नेवगी हे सभेला उपस्थित नव्हते. घरात कोरोना रूग्ण असल्याने बांदेकर, माधुरी वाडकर ऑनलाईन सभेसाठी तयार होते; परंतु ऑफलाईन सभा झाल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस बजावली नाही. सुकी तसेच सावंत यांनी लोबो यांच्याकडे आजारी असल्याबाबत अर्ज दिला होता, असे असताना त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. कोरगावकर, नेवगी हे भाजपवासी झाले आहेत; मात्र गट स्थापन करताना गटाबरोबर असल्याने या दोन नगरसेवकांना व्हीप लागू होतो. तरीही या दोन नगरसेवकांनी व्हीपचे उल्लघंन केल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे.  लोबो यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ""आम्ही अनुपस्थित सर्व नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहोत, हे त्याचवेळीच स्पष्ट केले होते. नोटिस दिलेल्या चौघांमधील सेनेच्या सावंत व सुकी यांनी आजारी होतो असे सांगितले होते तर याबाबत सुकी यांनी तसे पत्रही दिले होते; मात्र नोटिशीला तसे उत्तर त्यांनी देणे आवश्‍यक आहे.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/35KCr7J

No comments:

Post a Comment