पावसाची राजधानी उन्हाळ्यात तहानलेलीच  आंबोली (सिंधुदुर्ग) - तळ कोकणात राज्यातील सर्वाधिक पाऊस होतो. त्यात आंबोली देशात टॉप फाईव्हमध्ये येते. असे असूनही येथे जमिनीचे संधारण कमी आहे. त्याशिवाय निसर्गचक्र बिघडलेले आणि नैसर्गिक संसाधनांकडे झालेले दुर्लक्ष आणि बंधाऱ्यांच्या कामाकडे पावसाळ्यापूर्वी आणि नंतर झालेले दुर्लक्ष, शिवाय भविष्यातील योग्य नियोजन नसणे ही उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची कारणे आहेत.  राज्यात सर्वाधिक पाऊस पडूनही आंबोलीत उन्हाळ्यात पावसाचे दुर्भिक्ष्य दहा वर्षांत दिसत आहे. भूगर्भीय हालचाल आणि वातावरणात बदल आणि जांभ्या दगडात पाणी निचरा होत नसल्याने ते समुद्रात वाहून जाते. पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पाणी पातळी खालावते. असे असले तरी मानवीय हस्तक्षेपामुळे त्याचा जास्त परिणाम झाल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांचे आहे.  याचे कारण पूर्वी आंबोलीत उन्हाळी रब्बी वायंगणी शेती केली जायची. इथे नदीत नांगरून शेती केली जायची आणि लेव्हल केली जायची व पाण्यासाठी सारण सोडली जायची. संपूर्ण उन्हाळाभर त्याला पाणी असायचे; मात्र 10 ते 15 वर्षांत जंगली प्राण्यांमुळे नुकसान, अशाश्‍वत शेती, कमी उत्पन्न, रोख पैशाकडे असणारा ओढा, रेशन धान्य, मनुष्यबळ कमी, ज्योत न मिळणे, खर्च आणि उत्पन्न यात तफावत, वाढते पर्यटन, वाहतुकीची वाढती साधने, तंत्रज्ञानामुळे जवळ आलेले विश्‍व या सर्वांमुळे शेती उद्योगातून लोक बाजूला होऊन कमी कमी क्षेत्र होऊन ती बंद झाली; मात्र शेती असल्याने दरवर्षी लेव्हल व्हायची. आता शेती नसल्याने तण वाढून वाढून दरवर्षी त्यात गाळ साठून भरून लेव्हल वर आली.  पूर्वी मेरे असल्याने पाणी त्यात मुरायचे आणि ठराविक खोली कायम राहायची. आता गाळ भरल्याने पाणी टिकत नाही. दुसरी गोष्ट पूर्वी बऱ्याच ठिकाणी कोंडी होत्या, डोह होते. डोंगरावरील वृक्षतोड, प्लॉटिंग, पाला पाचोळा, दगड, माती भरून ते डोह बुजून गेले. नदीचीही तीच अवस्था आहे. नदीत गाळ भरून पाणी राहत नाही. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पाणी आटून जाते. शिवाय पाण्यासाठी बंधारे घातले जातात. ते पावसाळ्यापूर्वी फोडले जात नसल्याने त्यात गाळ साचतो आणि उन्हाळ्यात उशिरा बंधारे घालून त्यात साठलेला गाळ न काढणे हे कारण आहे.  आंबोलीत पूर्वी ही सगळी व्यवस्था एकमेकांवर अवलंबून होती; मात्र रब्बी शेती बंद केल्याने या समस्या निर्माण झाल्या. परिणामी पाणी पातळी घटून विहिरींचे पाणी खोल जाते. यासाठी 5 वर्षांपूर्वी आंबोली नदीपात्रातील गाळ काढून रोजगार हमी योजनेखाली नदीची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतीत अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी ठराव घेऊन राज्य सरकारकडे पाठवला. दीपक केसरकर पालकमंत्री असूनही त्या ठरावाला पुढे मंजुरी मिळाली नाही. रोजगार हमीखाली हे काम झाले असते तर गावातील लोकांना रोजगारही मिळाला असता.  14 लाख मंजूर तरीही...  आंबोलीत चौदाव्या वित्त आयोगातून 14 लाख रुपये मंजूर झाले. त्याचा उपयोग पाणी योजनेसाठी करायचा होता. त्यासाठी जुनी पाईपलाईन बदलून त्या जागी नवीन पाईपलाईन घालायचा ठराव सर्वानुमते ग्रामसभेत घेण्यात आला. पाण्याच्या सोर्सचे काम करण्याचा ठरावही 200 लोकांनी ग्रामपंचायतीत घेतला; मात्र सत्ताधाऱ्यांना ते करता आले नाही.  विधायक कामे महत्त्वाची  आंबोलीत एका ठिकाणी हॉटेल्सवाल्यांच्या वाढत्या विंधण विहिरी 300 मीटरपर्यंत खोलीवर जात आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आंबोलीत इतका पाऊस होऊनही उन्हाळ्यात टंचाई होते. त्यासाठी प्रशासनाने फक्त रक्कम खर्ची घालण्याकडे लक्ष न देता विधायक कामे होण्याकडे प्रामाणिक लक्ष देणे आवश्‍यक आहे.  पाऊस असा...  25 वर्षांत सरासरी आंबोलीत साधारण जवळपास 300 इंचांच्या दरम्यान पाऊस पडतो. गेल्यावर्षी 433 इंच आणि यावर्षी आतापर्यंत 367 म्हणजे 400 चा टप्पा ओलांडणार आहे. जूनमध्ये अवघा 40 इंच असणारा पाऊस यावर्षी 200 होईल, असा अंदाज होता; मात्र 2 महिन्यांत 300 इंच सरासरी ओलांडून पुढे गेला. गेल्यावर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस पडला; मात्र यंदा तशी स्थिती नाही.    आंबोलीत दहा वर्षांत जलसंधारणाकडे दुर्लक्ष झाले आहे. बदलत्या व्यवस्थेमुळे भविष्यात पाणीटंचाई बिकट होऊ शकते. त्यासाठी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून नदी स्वच्छ करून गाळ काढण्यासाठी शासनाने योग्य नियोजन करावे. निधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा.  - शशिकांत गावडे, प्रमुख गावकरी-आंबोली.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 22, 2020

पावसाची राजधानी उन्हाळ्यात तहानलेलीच  आंबोली (सिंधुदुर्ग) - तळ कोकणात राज्यातील सर्वाधिक पाऊस होतो. त्यात आंबोली देशात टॉप फाईव्हमध्ये येते. असे असूनही येथे जमिनीचे संधारण कमी आहे. त्याशिवाय निसर्गचक्र बिघडलेले आणि नैसर्गिक संसाधनांकडे झालेले दुर्लक्ष आणि बंधाऱ्यांच्या कामाकडे पावसाळ्यापूर्वी आणि नंतर झालेले दुर्लक्ष, शिवाय भविष्यातील योग्य नियोजन नसणे ही उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची कारणे आहेत.  राज्यात सर्वाधिक पाऊस पडूनही आंबोलीत उन्हाळ्यात पावसाचे दुर्भिक्ष्य दहा वर्षांत दिसत आहे. भूगर्भीय हालचाल आणि वातावरणात बदल आणि जांभ्या दगडात पाणी निचरा होत नसल्याने ते समुद्रात वाहून जाते. पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने पाणी पातळी खालावते. असे असले तरी मानवीय हस्तक्षेपामुळे त्याचा जास्त परिणाम झाल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांचे आहे.  याचे कारण पूर्वी आंबोलीत उन्हाळी रब्बी वायंगणी शेती केली जायची. इथे नदीत नांगरून शेती केली जायची आणि लेव्हल केली जायची व पाण्यासाठी सारण सोडली जायची. संपूर्ण उन्हाळाभर त्याला पाणी असायचे; मात्र 10 ते 15 वर्षांत जंगली प्राण्यांमुळे नुकसान, अशाश्‍वत शेती, कमी उत्पन्न, रोख पैशाकडे असणारा ओढा, रेशन धान्य, मनुष्यबळ कमी, ज्योत न मिळणे, खर्च आणि उत्पन्न यात तफावत, वाढते पर्यटन, वाहतुकीची वाढती साधने, तंत्रज्ञानामुळे जवळ आलेले विश्‍व या सर्वांमुळे शेती उद्योगातून लोक बाजूला होऊन कमी कमी क्षेत्र होऊन ती बंद झाली; मात्र शेती असल्याने दरवर्षी लेव्हल व्हायची. आता शेती नसल्याने तण वाढून वाढून दरवर्षी त्यात गाळ साठून भरून लेव्हल वर आली.  पूर्वी मेरे असल्याने पाणी त्यात मुरायचे आणि ठराविक खोली कायम राहायची. आता गाळ भरल्याने पाणी टिकत नाही. दुसरी गोष्ट पूर्वी बऱ्याच ठिकाणी कोंडी होत्या, डोह होते. डोंगरावरील वृक्षतोड, प्लॉटिंग, पाला पाचोळा, दगड, माती भरून ते डोह बुजून गेले. नदीचीही तीच अवस्था आहे. नदीत गाळ भरून पाणी राहत नाही. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत पाणी आटून जाते. शिवाय पाण्यासाठी बंधारे घातले जातात. ते पावसाळ्यापूर्वी फोडले जात नसल्याने त्यात गाळ साचतो आणि उन्हाळ्यात उशिरा बंधारे घालून त्यात साठलेला गाळ न काढणे हे कारण आहे.  आंबोलीत पूर्वी ही सगळी व्यवस्था एकमेकांवर अवलंबून होती; मात्र रब्बी शेती बंद केल्याने या समस्या निर्माण झाल्या. परिणामी पाणी पातळी घटून विहिरींचे पाणी खोल जाते. यासाठी 5 वर्षांपूर्वी आंबोली नदीपात्रातील गाळ काढून रोजगार हमी योजनेखाली नदीची व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतीत अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी ठराव घेऊन राज्य सरकारकडे पाठवला. दीपक केसरकर पालकमंत्री असूनही त्या ठरावाला पुढे मंजुरी मिळाली नाही. रोजगार हमीखाली हे काम झाले असते तर गावातील लोकांना रोजगारही मिळाला असता.  14 लाख मंजूर तरीही...  आंबोलीत चौदाव्या वित्त आयोगातून 14 लाख रुपये मंजूर झाले. त्याचा उपयोग पाणी योजनेसाठी करायचा होता. त्यासाठी जुनी पाईपलाईन बदलून त्या जागी नवीन पाईपलाईन घालायचा ठराव सर्वानुमते ग्रामसभेत घेण्यात आला. पाण्याच्या सोर्सचे काम करण्याचा ठरावही 200 लोकांनी ग्रामपंचायतीत घेतला; मात्र सत्ताधाऱ्यांना ते करता आले नाही.  विधायक कामे महत्त्वाची  आंबोलीत एका ठिकाणी हॉटेल्सवाल्यांच्या वाढत्या विंधण विहिरी 300 मीटरपर्यंत खोलीवर जात आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आंबोलीत इतका पाऊस होऊनही उन्हाळ्यात टंचाई होते. त्यासाठी प्रशासनाने फक्त रक्कम खर्ची घालण्याकडे लक्ष न देता विधायक कामे होण्याकडे प्रामाणिक लक्ष देणे आवश्‍यक आहे.  पाऊस असा...  25 वर्षांत सरासरी आंबोलीत साधारण जवळपास 300 इंचांच्या दरम्यान पाऊस पडतो. गेल्यावर्षी 433 इंच आणि यावर्षी आतापर्यंत 367 म्हणजे 400 चा टप्पा ओलांडणार आहे. जूनमध्ये अवघा 40 इंच असणारा पाऊस यावर्षी 200 होईल, असा अंदाज होता; मात्र 2 महिन्यांत 300 इंच सरासरी ओलांडून पुढे गेला. गेल्यावर्षी डिसेंबरपर्यंत पाऊस पडला; मात्र यंदा तशी स्थिती नाही.    आंबोलीत दहा वर्षांत जलसंधारणाकडे दुर्लक्ष झाले आहे. बदलत्या व्यवस्थेमुळे भविष्यात पाणीटंचाई बिकट होऊ शकते. त्यासाठी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून नदी स्वच्छ करून गाळ काढण्यासाठी शासनाने योग्य नियोजन करावे. निधी देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा.  - शशिकांत गावडे, प्रमुख गावकरी-आंबोली.    संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iYbCAM

No comments:

Post a Comment